Skip to content

Slander बद्दल बायबलमधील वचने

116 वचने · 71 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. शिवाय, त्या आळशी बनण्यात व घरोघर फिरून गप्पागोष्टी करण्यात आणि इतर लोकांच्या कामकाजात लुडबुड करण्यात आपला वेळ घालविण्याची शक्यता आहे.

  2. तर तो अहंकारी आहे व त्याला काहीच समजत नाही. त्याला शब्दयुद्ध व वादविवाद यांची विकृत आवड आहे. यांच्यापासूनच हेवा, कलह, कोणाची बदनामी होईल असे बोलणे, दुष्ट संशय,

  3. त्याचप्रमाणे वयस्क स्त्रिया आदरयुक्त असाव्या; त्या इतरांच्या चहाड्या करीत फिरणार्‍या किंवा मद्यपानासक्त नसाव्या; त्या सुशिक्षण देणार्‍या असाव्या;

  4. आपल्या लोकांना आठवण करून दे की, सत्ता व अधिकारी यांच्या अधीन राहून आज्ञापालन करावे आणि चांगल्या कार्याकरिता नेहमी सिद्ध असावे,

  5. त्यांनी कोणाची निंदा करू नये व भांडण करू नये, तर सर्वांशी सौम्यतेने आणि आदराने वागावे.

  6. जे स्वतःला भक्त समजतात परंतु आपल्या जिभेवर ताबा ठेवीत नाहीत, ते स्वतःलाच फसवितात व त्यांची भक्ती व्यर्थ आहे.

  7. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, एकमेकांची चहाडी करू नका. जो कोणी आपल्या बंधू किंवा भगिनी विरुद्ध बोलतो अथवा त्यांचा न्याय करतो, तो नियमाविरुद्ध बोलतो व न्याय करतो, जेव्हा तुम्ही नियमांविरुद्ध न्याय करता आणि ते पाळीत नाही, तर न्याय करणारे व्हाल.

  8. नियमशास्त्र देणारे आणि न्यायाधीश एकच आहेत, तेच उद्धार आणि नाश करू शकतात. परंतु आपल्या शेजार्‍याचा न्याय करणारा तू कोण?

  9. यास्तव, सर्व वैरभाव आणि सर्व खोटेपणा, ढोंग, मत्सर आणि प्रत्येक प्रकारच्या दुर्भाषणाचा त्याग करा.

  10. अनीतिमान लोकांमध्ये अशा प्रकारचे चांगले जीवन जगा, की अयोग्य कृत्ये करण्याचा ते तुमच्यावर आरोप करीत असतील, तरी ते तुमची चांगली कामे पाहतील आणि परमेश्वराच्या येण्याच्या दिवशी ते त्यांचे गौरव करतील.

  11. कारण, “जो जीवनावर प्रीती करतो आणि चांगले दिवस पाहण्याची अपेक्षा करतो, तर त्यांनी आपली जीभ वाईटापासून आणि आपले ओठ कपट बोलण्यापासून राखावे.

  12. आदरयुक्त, शुद्ध विवेकबुद्धीला अनुसरून राहा, म्हणजे ख्रिस्तामधील तुमच्या चांगल्या वागणुकीविरुद्ध जे लोक द्वेषभावाने बोलतात, त्यांना निंदानालस्तीची लाज वाटेल.

  13. त्यांना आश्चर्य वाटते की तुम्ही आता त्यांच्या बेपर्वा, वाईट जीवनात सामील होत नाही आणि ते तुमची निंदा करतात.

  14. विशेषकरून अशा लोकांसाठी हे खरे आहे जे देहाच्या भ्रष्ट अभिलाषांच्या मागे लागतात आणि अधिकारास तुच्छ मानतात. धाडसी आणि उद्धट असून ते स्वर्गीय प्राण्यांची निंदा करण्यास घाबरत नाहीत;

  15. अगदी त्याच प्रकारे, हे अनीतिमान लोक आपल्या स्वप्नाच्या जोरावर, स्वतःचे शरीर विटाळवितात, अधिकार नाकारतात आणि स्वर्गीय प्राणिमात्रांची निंदा करतात.

  16. तेव्हा स्वर्गातून आलेली एक उच्च स्वरातील वाणी मी ऐकली. ती म्हणाली, “परमेश्वराचे तारण, सामर्थ्य व त्यांचे राज्य आणि त्यांच्या ख्रिस्ताचा अधिकार यांचा उदय झाला आहे; कारण आमच्या बंधुजनावर आरोप ठेवणार्‍याला स्वर्गातून पृथ्वीवर ढकलून दिले आहे. तो रात्रंदिवस आमच्या परमेश्वरासमोर त्यांच्यावर दोषारोप करीत असे!