मुख्य मजकुरावर जा

Psalms बद्दल बायबलमधील वचने

896 वचने · 16 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. हे लक्षात ठेवा, विश्वासू सेवकांस याहवेहने स्वतःसाठी निवडून बाजूला ठेवले आहे; मी जेव्हा त्यांचा धावा करेन, तेव्हा ते माझे ऐकतील.

  2. भीती बाळगा आणि पाप करू नका. बिछान्यावर असता शांत अंतःकरणाने त्यांचे चिंतन करा. सेलाह

  3. त्यांना नीतियुक्त यज्ञार्पणे करा. आणि याहवेहवर विश्वास ठेवा.

  4. “आमचे कल्याण कोण करणार,” असे अनेकजण म्हणतात, हे याहवेह, तुमच्या चेहर्‍याचा प्रकाश आम्हावर पाडा.

  5. विपुल धान्य व द्राक्षारस देतो त्या आनंदापेक्षाही कितीतरी अधिक आनंद तुम्ही माझ्या हृदयात दिला आहे.

  6. मी शांतचित्ताने झोपी जाईन, कारण हे याहवेह तुम्हीच मला सुरक्षित ठेवता.

  7. संगीत दिग्दर्शकासाठी; वाजंत्र्याच्या साथीने गावयाचे दावीदाचे स्तोत्र. याहवेह, माझ्या शब्दांकडे कान द्या, माझ्या विलापाकडे लक्ष द्या.

  8. हे माझ्या राजा, माझ्या परमेश्वरा, माझ्या रडण्याकडे कान द्या, कारण मी तुमच्याकडे प्रार्थना करतो.

  9. याहवेह, दररोज सकाळी तुम्ही माझी वाणी ऐकता; सकाळी मी माझ्या प्रार्थना तुम्हाला सादर करतो व अपेक्षेने तुमची वाट पाहतो.

  10. तुम्ही असे परमेश्वर नाहीत, ज्यांना दुष्टाईत आनंद होतो; दुष्टांचे तुम्ही स्वागत करीत नाही.

  11. तुमच्या उपस्थितीत गर्विष्ठ उभे राहू शकत नाही. अनीतीने वागणार्‍या सर्वांचा तुम्हाला वीट आहे.

  12. खोटे बोलणाऱ्यांचा तुम्ही त्यांना नाश करता. खुनी आणि कपटींचा याहवेहला तिरस्कार आहे.

  13. परंतु तुमच्या महान प्रीतीद्वारे, मी तुमच्या भवनात येईन; अत्यंत आदराने तुमच्या पवित्र मंदिरात तुम्हाला नमन करतो.

  14. याहवेह, मला तुमच्या नीतिमार्गाने चालवा, माझ्या शत्रूंमुळे— माझ्यासमोर तुमचा सरळ मार्ग मला दाखवा.

  15. त्यांच्या मुखातून निघालेल्या एकाही शब्दावर विश्वास ठेऊ शकत नाही; त्यांचे हृदय द्वेषाने भरलेले आहे. त्यांचे कंठ उघड्या कबरेप्रमाणे आहे; त्यांच्या जिभेने ते खोटे बोलतात.

  16. परमेश्वर, त्यांना दोषी घोषित करा! त्यांच्या कारस्थानामुळेच त्यांचे पतन होवो. त्यांच्या अनेक अपराधांमुळे त्यांना तुमच्यापासून दूर घालवून द्या, कारण त्यांनी तुमच्याविरुद्ध बंड केले आहे.

  17. परंतु जे सर्व तुमच्याठायी आश्रय घेतात ते आनंदित होवोत; त्यांना सदैव हर्षगीते गाऊ द्या. तुम्ही त्यांचे रक्षण करता, ज्यांना तुमचे नाव प्रिय आहे, त्यांनी तुमच्यामध्ये आनंद करावा.

  18. याहवेह, नीतिमानांना तुम्ही निश्चितच आशीर्वादित करता; तुमची कृपा एखाद्या ढालीप्रमाणे त्यांना वेढलेली असते.

  19. संगीत दिग्दर्शकासाठी; तंतुवाद्यावरचे शेमीनीथ वर आधारित दावीदाचे स्तोत्र. याहवेह, रागाने माझा निषेध करू नका, तीव्र क्रोधाने मला शासन करू नका.

  20. मजवर दया करा, कारण हे याहवेह, मी दुर्बल आहे; मला रोगमुक्त करा, कारण माझ्या हाडात तीव्र वेदना होत आहेत.

  21. माझा आत्मा अत्यंत यातनेत आहे. याहवेह, तुम्ही किती विलंब लावणार?

  22. याहवेह, परत येऊन मला सोडवा; तुमच्या दयेनुसार मला वाचवा.

  23. मृतलोकात तुमचे स्मरण नाही; गर्तेमध्ये तुमचे उपकारस्मरण कोण करणार?

  24. माझ्या कण्हण्याने मी खंगून गेलो आहे. रात्रभर रडण्याने मी माझे अंथरूण भिजून ओलेचिंब करतो. माझ्या अश्रूंनी माझा बिछाना भिजून जातो.

  25. दुःखाने माझे डोळे निस्तेज झाले आहेत; माझ्या शत्रूंमुळे माझी दृष्टी क्षीण झाली आहे.