मुख्य मजकुरावर जा

Psalms बद्दल बायबलमधील वचने

896 वचने · 16 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. दुष्टाई करणार्‍यांनो, येथून चालते व्हा, कारण याहवेहनी माझे रडणे ऐकले आहे.

  2. याहवेहनी माझ्या दयेची याचना ऐकली आहे; याहवेह माझ्या प्रार्थना स्वीकार करतील.

  3. माझे सर्व शत्रू भय आणि लज्जा पावतील; ते मागे फिरतील आणि तत्काळ लज्जित होतील.

  4. संगीत दिग्दर्शकासाठी. गित्तीथ वर आधारित दावीदाचे स्तोत्र. याहवेह, आमच्या प्रभो, संपूर्ण पृथ्वीवर तुमचे नाव किती वैभवी आहे! स्वर्गदेखील तुमचे गौरव प्रकट करते.

  5. लेकरे आणि तान्ह्या बालकांच्या स्तुतीद्वारे तुमचे शत्रू व विरोध्यांना शांत करण्यासाठी शत्रूविरुद्ध बळ स्थापित केले आहे.

  6. जेव्हा तुमच्या बोटांची रचना असलेल्या आकाशाकडे बघून मी विचार करतो, चंद्र आणि तारे यथास्थानी स्थापित केलेले पाहतो,

  7. मनुष्य तो काय की तुम्ही त्याची आठवण ठेवावी? मानवप्राणी तो काय की तुम्ही त्याची काळजी करावी?

  8. तुम्ही त्यांना देवदूतांपेक्षा किंचित कमी असे घडविले आहे. गौरव आणि सन्मान यांचा मुकुट तुम्ही त्यांच्या डोक्यावर ठेवला आहे.

  9. तुमच्या प्रत्येक हस्तकृतीवर तुम्ही त्यांना सत्ता दिली आहे; सर्वगोष्टी त्यांच्या पायाखाली ठेवल्या.

  10. सर्व कळप व गुरे, आणि वनपशू.

  11. आकाशातील पक्षी, आणि समुद्रातील मासे, सागरात संचार करणारे सर्व प्राणी.

  12. याहवेह, आमच्या प्रभो, संपूर्ण पृथ्वीवर तुमचे नाव किती वैभवी आहे!

  13. संगीत दिग्दर्शकासाठी; दावीदाचे स्तोत्र. मी याहवेहचा आश्रय घेतला आहे. तर मग तुम्ही मला असे का म्हणत आहात: “पक्ष्याप्रमाणे तू आपल्या डोंगराकडे उडून जा,”

  14. कारण पाहा, दुष्टांनी आपली धनुष्ये वाकविली आहेत, त्यावर आपले बाण चढविले आहेत की अंधारातून बाण मारून सरळ मनाच्या लोकांची हत्या करावी.

  15. जर पायाच नष्ट झाला, तर नीतिमान काय करणार?

  16. परंतु याहवेह आपल्या पवित्र मंदिरात आहेत; याहवेह आपल्या स्वर्गीय सिंहासनावर विराजमान आहेत. त्यांची दृष्टी सर्व मनुष्यास पाहते; पृथ्वीवर प्रत्येकास ते पारखतात.

  17. याहवेह नीतिमानाला पारखतात; परंतु दुष्ट, ज्यांना हिंसा प्रिय आहे, अशांचा याहवेह आवेशाने द्वेष करतात.

  18. जळते निखारे आणि तप्त गंधकाचा पाऊस ते दुष्टांवर पाडतील; आपल्या दाहक वार्‍याने त्यांना होरपळून टाकतील.

  19. कारण याहवेह नीतिमान आहेत, न्यायीपण त्यांना प्रिय आहे; जे नीतिमान आहेत, त्यांना त्यांचे दर्शन होईल.

  20. संगीत दिग्दर्शकासाठी; शमीनीथ वर आधारित दावीदाचे स्तोत्र. याहवेह, साहाय्य करा, भक्तिमान नाहीसे होत आहेत; विश्वासयोग्य लोक आता मनुष्यांमध्ये राहिलेले नाहीत.

  21. प्रत्येकजण त्यांच्या शेजार्‍यांशी लबाड बोलतो, ते त्यांच्या ओठांनी खुशामत करतात परंतु त्यांच्या हृदयात कपट असते.

  22. खुशामत करणारे सर्व ओठ, आणि प्रत्येक गर्विष्ठ जीभ याहवेह कापून टाको.

  23. ते बढाई मारतात आणि म्हणतात, “आम्ही आमच्या जिभेने प्रबल होऊ; आमचे ओठ आमचे संरक्षण करतील, आम्हावर धनी कोण?”

  24. याहवेह म्हणतात, “कारण गरिबांना लुटले आहे व गरजवंत कण्हत आहेत. म्हणून मी आता उठेन आणि त्यांची निंदा करणाऱ्यापासून त्यांना संरक्षण देईन.”

  25. शुद्ध केलेल्या चांदीप्रमाणे, सात वेळेस शुद्ध केलेल्या सोन्याप्रमाणे, याहवेहची वचने शुद्ध आहेत.