- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Psalms बद्दल बायबलमधील वचने: For God's mercies to individuals
For God's mercies to individuals बद्दल वचने
एक स्तोत्र. मंदिराच्या समर्पण सोहळ्यासाठी एक गाणे, दावीदाचे स्तोत्र याहवेह मी तुमची प्रशंसा करेन, कारण तुम्ही मला खोल दरीतून बाहेर काढले आहे आणि माझ्या शत्रूंना माझा उपहास करू दिला नाही.
हे याहवेह, माझ्या परमेश्वरा, मी तुम्हाला साहाय्यासाठी विनवणी केली आणि तुम्ही मला रोगमुक्त केले.
याहवेह तुम्ही मला अधोलोकातून बाहेर काढले; तुम्ही मला गर्तेत जाण्यापासून वाचविले.
अहो याहवेहच्या भक्तांनो, त्यांची स्तुतिस्तोत्रे गा, त्यांच्या पवित्र नावाला धन्यवाद द्या.
त्यांचा क्रोध क्षणभर टिकतो, पण त्यांची कृपा जन्मभर राहते. विलाप करणे केवळ रात्रभर राहील, परंतु प्रातःकाल उगवताच आनंद होईल.
माझ्या भरभराटीच्या वेळी मी म्हणालो, “मी कधीही डगमगणार नाही.”
याहवेह, तुमच्या कृपेने मला बळकट पर्वताप्रमाणे स्थिर केले होते, परंतु तुम्ही आपले मुख लपविले, तेव्हा मी भयभीत झालो.
याहवेह मी तुमचा धावा केला, मी प्रभूला कृपेची विनवणी केली.
मी चिरनिद्रीत होण्यापासून मी अधोलोकात जाण्यापासून काय लाभ? माती तुमची स्तुती करेल काय? ती तुमच्या विश्वासूपणाची साक्ष देईल काय?
याहवेह, माझे ऐका, मजवर दया करा; याहवेह मला साहाय्य करा.
तुम्ही माझ्या शोकाचे रूपांतर हर्षनृत्यात केले. तुम्ही माझे शोकाचे गोणपाट काढून मला उल्हासाची वस्त्रे घातली,
जेणेकरून मी शांत न राहता, माझ्या हृदयाने सदैव तुमची स्तुतिस्तोत्रे गात राहावे. याहवेह, माझ्या परमेश्वरा, मी सदासर्वकाळ तुमची प्रशंसा करीतच राहीन.
संगीत दिग्दर्शकासाठी. अल्तश्केथ या चालीवर आधारित. आसाफाचे एक स्तोत्र. एक गीत हे परमेश्वरा, आम्ही तुमची उपकारस्तुती करतो, तुमची उपकारस्तुती करतो, कारण तुमचे नाव समीप आहे; लोक तुमच्या अद्भुत कृत्यांचे वर्णन करतात.
तुम्ही म्हणाल, “मी निर्धारित वेळ निवडतो; मी सर्वांना रास्त न्याय देतो.
पृथ्वी आणि पृथ्वीवर राहणारे हादरले, तरी तिचे स्तंभ मीच स्थिर करून ठेवतो. सेला
मी गर्विष्ठांना म्हटले, ‘गर्व करू नका,’ आणि दुष्टांना म्हणालो, ‘आपले शिंग उंच करू नका.
आपले शिंग स्वर्गाविरुद्ध उंचावू नका; आपले मस्तक उंच करून बोलू नका.’ ”
पूर्वेकडून, पश्चिमेकडून किंवा जंगलातून मनुष्याला स्वतःची उन्नती करता येत नाही.
मात्र परमेश्वरच न्याय करणारे आहेत: ते एकाला खाली पाडतात आणि दुसर्यास उंच करतात.
कारण याहवेहच्या हातात मसाला मिश्रित फेसाळलेल्या द्राक्षारसाचा प्याला आहे; तो प्याला म्हणजे पृथ्वीवरील दुष्ट लोकांवर त्यांनी ओतलेला न्यायच आहे; सर्व दुष्टांना तो गाळासह निथळून प्यावा लागेल.
मी तर ही घोषणा सर्वदा करीत राहीन; मी याकोबाच्या परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे गाईन.
ते म्हणतात, “सर्व दुष्टांची शिंगे मी तोडून टाकीन, परंतु नीतिमान लोकांची शिंगे उंच करेन.”
एक गीत. दावीदाचे एक स्तोत्र. हे परमेश्वरा, माझे अंतःकरण खंबीर आहे; मी पूर्ण अंतःकरणाने गायन आणि वादन करेन.
अगे सारंगी आणि वीणे, जागृत व्हा! मी प्रातःकाळाला जागृत करेन.
हे याहवेह, प्रत्येक राष्ट्रात मी तुमची स्तुती करेन, मी सर्व लोकात तुमची स्तुतिस्तोत्रे गाईन.