मुख्य मजकुरावर जा

Psalms बद्दल बायबलमधील वचने

896 वचने · 16 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. माझ्या वाट्याला सीमारेषा सुखद ठिकाणी पडल्या आहेत; माझ्यासाठी खरोखरच एक सुंदर वारसा आहे.

  2. मी याहवेहची स्तुती करणार, ज्यांनी माझे मार्गदर्शन केले आहे; रात्रीच्या समयी माझे अंतःकरण मला बोध करते.

  3. मी आपली दृष्टी सतत याहवेहवर ठेवली आहे; ते माझ्या उजवीकडे आहेत, मी डळमळणार नाही.

  4. यास्तव माझे अंतःकरण उल्हासित आहे आणि माझी जीभ स्तुतिगान करीत आहे; माझे शरीर देखील सुरक्षिततेत विसावा घेईल.

  5. कारण तुम्ही मला अधोलोकात राहू देणार नाही; किंवा तुमच्या विश्वासणार्‍याला तुम्ही कुजणे पाहू देणार नाही.

  6. तुम्ही मला जीवनाचा मार्ग दाखवाल; तुमच्या समक्षतेत तुम्ही मला हर्षाने भराल, तुमच्या उजव्या हातात सर्वदा सौख्य आहे.

  7. दावीदाची एक प्रार्थना. याहवेह, ऐका माझी विनंती न्यायपूर्ण आहे, माझ्या आरोळीकडे लक्ष द्या. माझी प्रार्थना ऐका, जी कपटी ओठातून येत नाही.

  8. तुम्ही माझा रास्त न्याय करा; जे नीतियुक्त तेच तुमच्या दृष्टीस पडो.

  9. जरी तुम्ही माझे हृदय पारखले आहे, रात्रीच्या वेळी तुम्ही माझी झडती घेतली आहे, तुम्ही मला पारखून पाहिले, तरी माझ्यात तुम्हाला दोष आढळला नाही; माझ्या मुखाने मी अपराध केले नाही.

  10. जरी लोकांनी मला लाच देण्याचा प्रयत्न केला, तरी तुमच्या मुखातील वचनांच्या आदेशानुसार मी त्यांच्या हिंसक मार्गापासून स्वतःला अलिप्त ठेवले.

  11. माझ्या पावलांनी तुमचा मार्ग धरला आहेत, माझी पावले कधी घसरली नाहीत.

  12. मी तुम्हालाच हाक मारली आहे, कारण परमेश्वरा तुम्ही मला उत्तर द्याल; माझ्या विनंतीकडे कान देऊन माझी प्रार्थना ऐका.

  13. तुमचा आश्रय घेणार्‍यांना त्यांच्या शत्रूपासून उजव्या हाताने तुम्ही वाचविता, तुमच्या महान प्रीतीची अद्भुत कृत्ये मला प्रकट करा.

  14. तुमच्या पंखांच्या छायेखाली तुमच्या डोळ्याच्या बुबुळाप्रमाणे माझे रक्षण करा;

  15. मला ज्यांनी सर्व बाजूने घेरले आहे त्या माझ्या प्राणघातक शत्रूंपासून, जे दुष्ट लोक माझा नायनाट करण्यास तयार आहेत त्यांच्यापासून मला लपवा.

  16. त्यांचे हृदय निर्दयी आहे, त्यांच्या मुखाचे शब्द गर्विष्ठपणाचे असतात.

  17. त्यांनी माझा माग काढला व आता सर्व बाजूने मला घेरले आहे, मला धुळीस मिळविण्यासाठी त्यांनी माझ्यावर पाळत ठेवली आहे.

  18. शिकार करण्यास उत्सुक असलेल्या उपाशी सिंहासारखे, दबा धरून बसलेल्या उग्र सिंहाप्रमाणे ते आहेत.

  19. हे याहवेह, उठा, त्यांचा सामना करा, त्यांचा नाश करा; तुमच्या तलवारीने दुष्टांपासून माझा बचाव करा.

  20. याहवेह, तुमच्या हातांनी अशा लोकांपासून मला वाचवा, ज्यांना याच जीवनात प्रतिफळ आहे. जी शिक्षा तुम्ही दुष्टांसाठी साठवून ठेवलेली आहे त्यानेच त्यांचे पोट भरो, त्यांची संततीही तेच आधाशीपणे खाओ, आणि त्यांचे उरलेले पुढच्या संततीलाही मिळो.

  21. मी तर नीतिमत्वामुळे तुमच्या मुखाचे दर्शन करणार; मी जागा होईन, तेव्हा तुमच्या दर्शनाने माझे पूर्ण समाधान होईल.

  22. संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे स्तोत्र. आकाश परमेश्वराची महिमा वर्णिते; अंतराळ त्यांच्या अद्भुत हस्तकृतीची घोषणा करते.

  23. दिवसेंदिवस ते वार्तालाप करतात; प्रत्येक रात्री ते ज्ञान प्रगट करते.

  24. या प्रकियेत बोलणे नाही, शब्दही नाही, त्यात आवाजही नाही;

  25. तरीही पृथ्वीच्या दिगंतापर्यंत त्यांची वाणी जाते, कारण जगाच्या शेवटपर्यंत त्यांचा शब्द गेला आहे. परमेश्वराने सूर्यासाठी स्वर्गात मंडप तयार केला आहे.