मुख्य मजकुरावर जा

Psalms बद्दल बायबलमधील वचने

896 वचने · 16 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जेव्हा मनुष्याच्या दुष्टपणाचा आदर केला जातो, आणि दुष्ट सर्वत्र अहंकाराने फिरत असतात. याहवेह, तेव्हा तुम्हीच गरजवंताचे रक्षण करणार आणि तुम्हीच त्यांना या दुष्टापासून सुरक्षित ठेवाल.

  2. The wicked walk on every side, when the vilest men are exalted.

  3. संगीत दिग्दर्शकासाठी; दावीदाचे स्तोत्र. याहवेह, आणखी किती काळ? सर्वकाळ तुम्ही मला विसरणार का? किती काळ तुम्ही मजपासून तुमचे मुख लपविणार?

  4. मी किती काळ माझ्या विचारांशी द्वंद करावे? कुठवर दुःखाने रात्रंदिवस माझे हृदय व्यापून टाकावे? कुठवर माझ्या शत्रूंनी मजवर वरचढ व्हावे?

  5. याहवेह, माझ्या परमेश्वरा, मजकडे पाहा आणि मला उत्तर द्या. या अंधारात माझ्या डोळ्यांना प्रकाश द्या, नाहीतर मजवर चिरनिद्रा ओढवेल.

  6. माझे शत्रू म्हणतील “मी त्याला पराभूत केले आहे,” आणि माझ्या पतनाबद्दल ते आनंदित होतील.

  7. कारण तुमच्या निरंतर प्रीतीवर मी भरवसा ठेवला आहे; माझे हृदय तुमच्या तारणात हर्ष करीत आहे.

  8. मी याहवेहची स्तुती गाईन, कारण त्यांनी माझ्यावर उपकार केले आहेत.

  9. संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे स्तोत्र. मूर्ख आपल्या मनात म्हणतो, “परमेश्वर नाही.” ते बहकलेले असून त्यांची कृत्ये दुष्ट आहेत, सत्कर्म करणारा कोणी नाही.

  10. मानवांमध्ये कोणी समंजस आहे का? परमेश्वराचा शोध करणारे कोणी आहे का? हे पाहण्यासाठी याहवेह स्वर्गातून खाली पाहतात.

  11. प्रत्येकजण भटकून गेले आहेत; प्रत्येकजण भ्रष्ट झाला आहे; सत्कर्म करणारा कोणीच नाही, एकही नाही.

  12. दुष्कृत्य करणार्‍यांना हे ठाऊक नाही काय? भाकरी खाण्यासारखे ते माझ्या लोकांना गिळून फस्त करतील. ते कधीही याहवेहला हाक मारत नाहीत.

  13. पण पाहा, ते तिथे भयाने भरले आहेत, कारण परमेश्वर नीतिमानांच्या पक्षाचे आहेत.

  14. दुष्कर्मे करणारे, तुम्ही गरिबांच्या योजना उधळून लावता, परंतु याहवेह त्यांचा आश्रय असतात.

  15. अहाहा! सीयोनातून इस्राएलची सुटका होईल! जेव्हा याहवेह त्यांच्या प्रजेची पुनर्स्थापना करतील, तेव्हा याकोब हर्ष करो आणि इस्राएल आनंद करो!

  16. दावीदाचे स्तोत्र. याहवेह, तुमच्या पवित्र मंडपात कोण राहू शकेल? तुमच्या पवित्र डोंगरावर कोण राहू शकेल?

  17. ज्याचे चालणे निर्दोष आहे, जो धार्मिकतेचे आचरण करतो, जो आपल्या हृदयातून सत्य बोलतो;

  18. जो आपल्या जिभेने निंदा करीत नाही, जो आपल्या शेजार्‍यांचे वाईट करीत नाही, आणि इतरांना काळिमा लावत नाही;

  19. जो कुटिल मनुष्याचा तिरस्कार करतो, याहवेहचे भय धरणार्‍यांचा सन्मान करतो, आणि जो स्वतःचे नुकसान होत असले तरी दिलेले वचन पाळतो;

  20. जो व्याज न आकारता पैसे उसने देतो; जो निष्पाप लोकांविरुद्ध साक्ष देण्यासाठी लाच घेत नाही, जो कोणी या गोष्टी करतो तो कधीही ढळणार नाही.

  21. दावीदाचे मिक्ताम परमेश्वरा, माझे रक्षण करा, कारण मी तुमच्या आश्रयाला आलो आहे.

  22. मी याहवेहला म्हणालो, “तुम्हीच माझे प्रभू आहात; तुमच्याशिवाय दुसरे चांगले असे काहीच माझ्याकडे नाही.”

  23. पृथ्वीवरील लोक जे पवित्र आहेत, “ते आदरणीय आहेत, त्यांच्याठायी मी प्रसन्न आहे.”

  24. जे अन्य दैवतांच्या भजनी लागतात, ते अनेक दुःखांनी ग्रासले जातील. अशा दैवतांना मी रक्तमय पेयार्पणे अर्पिणार नाही किंवा त्यांची नावेही मी माझ्या ओठांनी उच्चारणार नाही.

  25. याहवेह तुम्हीच माझे वतन, माझा प्याला आहात; तुम्हीच माझा वाटा सुरक्षित करता.