मुख्य मजकुरावर जा

Psalms बद्दल बायबलमधील वचने

896 वचने · 16 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आपल्या मंडपातून निघालेल्या तेजस्वी वराप्रमाणे, जसा एखादा विजेता आपली धाव पूर्ण करण्यास उल्लासतो.

  2. तो आकाशाच्या एका टोकास उगवतो दुसर्‍या टोकापर्यंत परिक्रमा पूर्ण करतो; त्याच्या उष्णतेपासून काहीही लपून राहू शकत नाही.

  3. याहवेहचे नियम उत्कृष्ट आहेत; ते आत्म्याला ताजेतवाने करतात. याहवेहचे नियम विश्वसनीय आहेत, ते भोळ्यांना सुज्ञ करतात.

  4. याहवेहचे नियम योग्य आहेत, ते हृदयास आनंद देतात, याहवेहच्या आज्ञा तेजस्वी आहेत, त्या नेत्रांना प्रकाश देतात.

  5. याहवेहचे भय निर्मळ आहे, ते सर्वकाळ टिकणारे आहेत. याहवेहचे निर्णय स्थिर आहेत, आणि ते सर्व पूर्णतः नीतिमान आहेत.

  6. सोन्यापेक्षा ते अधिक मौल्यवान आहेत, अतिशुद्ध सोन्यापेक्षाही; ते मधापेक्षा मधुर आहेत, पोळ्यातील मधाहूनही ते अधिक गोड आहेत.

  7. कारण ते तुमच्या सेवकांस सावध करतात; त्याचे पालन करणार्‍यास मोठे प्रतिफळ मिळते.

  8. स्वतःच्या चुका कोणाला समजणार? माझ्या गुप्त दोषांबद्धल मला क्षमा करून निर्दोष ठरवा.

  9. तसेच जाणूनबुजून पाप करण्यापासून आपल्या सेवकास थांबवा; ते मला त्याच्या अधीन करू नये. तेव्हाच मी दोषमुक्त होईन, एखाद्या मोठ्या गुन्ह्याबाबत निर्दोष ठरेन.

  10. याहवेह, माझे खडक आणि माझे तारणहार, माझ्या मुखातून निघालेले शब्द आणि माझ्या अंतःकरणातील मनन तुमच्या नजरेत संतोष देणारे होवोत.

  11. संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे स्तोत्र. संकटाच्या समयी याहवेह तुझे ऐको; याकोबाच्या परमेश्वराचे नाम सर्व अरिष्टांपासून तुझे रक्षण करो.

  12. त्यांच्या पवित्रस्थानातून ते तुला मदत पाठवो आणि ते तुला सीयोनातून साहाय्य पाठवो.

  13. तू दिलेल्या सर्व अर्पणांचे त्यांना स्मरण होवो आणि तुझी होमार्पणे ते स्वीकारोत. सेला

  14. तुझ्या हृदयातील मनोरथ ते पूर्ण करो आणि तुझ्या सर्व योजना ते सिद्धीस नेवोत.

  15. तुझ्या विजयात आम्ही आनंदाने गर्जना करू आणि आपल्या परमेश्वराच्या नावाने आपला झेंडा उंचावू. याहवेह तुझे सर्व मनोरथ पूर्ण करोत.

  16. आता मला माहीत आहे: याहवेह आपल्या अभिषिक्तास विजय प्रदान करतात; पवित्र स्वर्गातून त्यांच्या तारणदात्या उजव्या हाताच्या सामर्थ्याने त्याला उत्तर देतात.

  17. कोणी रथांवर आणि कोणी घोड्यांवर भरवसा ठेवतात, परंतु आम्ही याहवेह आमच्या परमेश्वराच्या नावावर भरवसा ठेऊ.

  18. ती कोसळतील आणि नाश पावतील, पण आम्ही उठू आणि बळकटपणे उभे राहू.

  19. याहवेह, राजाला विजयी करा! जेव्हा आम्ही हाक मारू, तेव्हा आमचे ऐका!

  20. दावीदाचे एक स्तोत्र. पृथ्वी व तिच्यातील सर्वकाही याहवेहचे आहे. जग आणि त्यात राहणारे सारे त्यांचेच आहेत.

  21. कारण त्यांनीच तिचा पाया महासागरांवर घातला, आणि त्यांनीच तिला जलप्रवाहांवर स्थिर केले.

  22. याहवेहचा डोंगर कोण चढून जाईल? त्यांच्या पवित्रस्थानी कोण उभा राहील?

  23. ज्याचे हात निर्मळ आणि ज्याचे हृदय शुद्ध आहे, जो मूर्तींवर भरवसा ठेवत नाही, जो खोटी शपथ वाहत नाही.

  24. त्यांना याहवेहपासून आशीर्वाद लाभेल. त्यांचा तारणकर्ता परमेश्वर त्यांना नीतिमान ठरवेल.

  25. हीच अशी पिढी आहे जी याहवेहचा शोध घेत आहे, याकोबाच्या परमेश्वरा, जे तुमच्या दर्शनासाठी आतुर आहेत. सेला