- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Psalms बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
माझ्या आईवडिलांनी माझा त्याग केला. तरी याहवेह, माझा स्वीकार कराल.
याहवेह, मला तुमचे मार्ग शिकवा; माझी छळणूक करणाऱ्यांमुळे मला सरळ मार्गावर घेऊन चला.
मला माझ्या शत्रूंच्या तावडीत सापडू देऊ नका, कारण खोटी साक्ष देणारे आणि क्रूरपणाने फुत्कारणारे माझ्याविरुद्ध उठले आहेत.
मला हा पूर्णपणे विश्वास आहे: की मी या जीवनातच याहवेहच्या चांगुलपणाचा अनुभव घेणार.
याहवेहची प्रतीक्षा कर; हिंमत बांध, धैर्य धर; आणि याहवेहचीच प्रतीक्षा कर.
दावीदाचे स्तोत्र. याहवेह, मी तुम्हाला हाक मारत आहे; तुम्ही माझे आश्रयदुर्ग आहात. माझ्यासाठी आपले कान बंद करू नका; जर तुम्ही उत्तर दिले नाही, तर मी खड्ड्यात पडलेल्या लोकांसारखा होईन.
मी पवित्रस्थानाकडे माझे हात उंच करतो; साहाय्यासाठी तुम्हाला हाक मारतो; माझी दयेची आरोळी ऐका.
दुष्टांना दिलेल्या शिक्षेमध्ये मला ओढू नका, जे अन्याय करतात, शेजार्यांशी त्यांचे संभाषण अतिशय सलोख्याचे आहे, परंतु त्यांच्या हृदयात केवळ कपट असते.
जे शासन त्यासाठी उचित आहे, ते त्यांना पुरेपूर करा; त्यांच्या दुष्टाईच्या मानाने त्यांना यथायोग्य शासन करा; त्यांच्या सर्व दुष्ट कृत्यांबद्दल त्यांना योग्य परतफेड करा.
कारण याहवेहच्या महान कृत्यांचे व त्यांच्या हातांनी केलेल्या कार्याचे त्यांच्या दृष्टीने काही महत्त्व नाही. याहवेहच त्यांचा नाश करतील. मग ते पुन्हा कधीही पुन्हा उभे राहू शकणार नाही.
याहवेहची स्तुती करा, कारण त्यांनी माझी दयेची आरोळी ऐकली आहे.
याहवेह माझे सामर्थ्य आणि माझी ढाल आहेत; माझे हृदय त्यांच्यावर भरवसा ठेवते, तेच माझे साहाय्य करतात. माझे अंतःकरण आनंदाने उड्या मारत आहे, माझ्या गीताद्वारे मी त्यांचे स्तवन करेन.
याहवेह आपल्या प्रजेचे बल आहेत, आपल्या अभिषिक्ताच्या तारणाचे आश्रयदुर्ग आहेत.
तुम्ही आपल्या लोकांचे रक्षण करा आणि आपल्या वतनास आशीर्वाद द्या; त्यांचे मेंढपाळ होऊन त्यांना सदासर्वकाळ उचलून धरा.
दावीदाचे स्तोत्र. अहो दिव्यदूतांनो, याहवेहला गौरव आणि सामर्थ्य द्या.
याहवेहच्या नावाला योग्य ते गौरव द्या; पवित्रतेच्या वैभवाने याहवेहची उपासना करा.
याहवेहची वाणी जलांवर आहे; गौरवशाली याहवेहची वाणी महा जलाशयांवर गर्जत आहे.
याहवेहची वाणी प्रतापशाली आहे; प्रभावी आहे याहवेहचा स्वर.
याहवेहच्या गर्जनेने देवदारू वृक्ष मोडून पडतात; लबानोनमधील देवदारू वृक्ष दुभंगतात.
लबानोनचा डोंगर वासराप्रमाणे आणि सिर्योन तरुण रानबैलाप्रमाणे बागडतो;
याहवेहचा आवाज कडाडतो, विजा चमकल्यासारखा.
याहवेहच्या आवाजाचा गडगडाट वाळवंटे ढवळून काढतात; कादेशचे अरण्य याहवेह कंपित करतात.
याहवेहच्या आवाजाने हरिणी प्रसवतात आणि वने पर्णहीन होतात. आणि त्यांच्या मंदिरात सर्वजण म्हणतात: “याहवेहचा, महिमा असो.”
याहवेह जलप्रलयावर सिंहासनावर आरूढ झालेले आहेत; याहवेहच महाराज बनून सिंहासनावर सर्वकाळ स्थानबद्ध झालेले आहेत.
याहवेह आपल्या लोकांना सामर्थ्य देतात; याहवेह आपल्या लोकांना शांती देऊन आशीर्वादित करतात.