मुख्य मजकुरावर जा

Prayer बद्दल बायबलमधील वचने

720 वचने · 120 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. नंतर येशू आत गेल्यानंतर, शिष्यांनी खाजगी रीतीने विचारले, “त्याला आम्ही का काढू शकलो नाही?”

  2. त्याने उत्तर दिले, “असा प्रकार फक्त प्रार्थनेद्वारेच निघू शकतो.”

  3. यास्तव मी तुम्हाला सांगतो की, प्रार्थना करून जे काही मागाल, ते तुम्हाला मिळालेच आहे असा विश्वास ठेवा आणि ते तुम्हाला प्राप्त होईल.

  4. आणि जेव्हा तुम्ही प्रार्थना करावयास उभे राहता, तेव्हा तुमच्या मनात कोणाविरुद्ध काही असेल, तर त्याची क्षमा करा, म्हणजे तुमचा स्वर्गीय पिता तुम्हाला तुमच्या पातकांची क्षमा करतील.

  5. भोजन करीत असताना, येशूंनी भाकर घेतली, तिच्यावर आशीर्वाद मागितल्यावर, ती मोडली आणि आपल्या शिष्यांना देत ते म्हणाले, “ही घ्या, हे माझे शरीर आहे.”

  6. त्यांनी द्राक्षारसाचा प्याला हाती घेतला व त्याबद्दल आभार मानले आणि मग तो प्याला त्यांना दिला आणि मग ते सर्व त्यातून प्याले.

  7. त्या दिवसांमध्ये प्रार्थना करण्यासाठी येशू डोंगरावर गेले आणि त्यांनी तिथे रात्रभर परमेश्वराची प्रार्थना केली.

  8. त्या शताधिपतीने येशूंविषयी ऐकले तेव्हा त्याने काही यहूदी वडिलांना येशूंकडे पाठवून, त्यांना आपण येऊन सेवकाला बरे करावे अशी विनंती केली.

  9. येशूंनी त्या पाच भाकरी व दोन मासे घेतले आणि स्वर्गाकडे पाहून आभार मानले आणि त्या भाकरीचे तुकडे केले. नंतर त्यांनी ते शिष्यांजवळ लोकांना वाढण्यासाठी दिले.

  10. एके दिवशी येशू एका ठिकाणी प्रार्थना करीत होते. प्रार्थना संपल्यावर त्यांच्या शिष्यांपैकी एकाने त्यांना म्हटले, “प्रभूजी, योहानाने जशी त्याच्या शिष्यांना प्रार्थना करावयास शिकविले, त्याप्रमाणे तुम्हीही आम्हास शिकवा.”

  11. येशूंनी शिष्यांना सांगितले, “अशा रीतीने प्रार्थना करा: “ ‘हे पित्या, तुमचे नाव पवित्र मानिले जावो; तुमचे राज्य येवो.

  12. आमची रोजची भाकर प्रतिदिनी आम्हाला द्या.

  13. कारण जशी आम्ही आमच्या अपराध्यांस क्षमा करतो; तशी तुम्ही आमच्या पापांची क्षमा करा आम्हास परीक्षेत आणू नका.’ ”

  14. येशू त्यांना म्हणाले, “समजा तुमचा एक मित्र आहे, मध्यरात्री तुम्ही त्याच्याकडे जाऊन म्हणता, ‘मित्रा, मला तीन भाकरी उसन्या दे;

  15. माझा मित्र प्रवास करून घरी आला आहे, पण त्याला वाढण्यासाठी माझ्याजवळ काहीच नाही.’

  16. समजा तुमचा मित्र आतून उत्तर देईल, ‘मला त्रास देऊ नको. दार बंद झाले आहे आणि मी व माझी मुले अंथरुणात आहोत आणि आता मी उठून तुला काही देऊ शकत नाही.’

  17. परंतु मी तुम्हाला सांगतो की, जरी मैत्रीमुळे तो उठून त्याला भाकर देणार नाही, तरी तुमच्या आग्रहामुळे तो नक्कीच उठेल आणि जितकी तुमची गरज आहे तितके तो तुम्हाला देईल.

  18. “मी तुम्हाला सांगतो, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, दार ठोका म्हणजे ते उघडले जाईल.

  19. कारण जो कोणी मागतो त्याला मिळेल, जो कोणी शोधतो त्याला सापडेल आणि जो कोणी ठोकतो, त्याच्यासाठी दार उघडले जाईल.

  20. “तुमच्यातील कोण असे वडील आहेत, जर तुमच्या मुलाने तुमच्याजवळ मासा मागितला, तर तुम्ही त्याला साप द्याल?

  21. किंवा जर त्याने अंडे मागितले, तर त्याला विंचू द्याल?

  22. तर तुम्ही दुष्ट असताना तुमच्या लेकरांना चांगल्या देणग्या देण्याचे तुम्हाला समजते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात, त्यांना ते कितीतरी विपुलतेने पवित्र आत्मा देणार!”

  23. नंतर येशूंनी आपल्या शिष्यांना सतत प्रार्थना करावी व ती ही चिकाटीने करावी यासाठी एक दाखला सांगितला.

  24. येशू म्हणाले, “एका शहरात परमेश्वराचे भय न बाळगणारा आणि कोणाची पर्वा न करणारा एक न्यायाधीश होता.

  25. त्या शहरातील एक विधवा आपली विनंती घेऊन वारंवार त्या न्यायाधीशाकडे येऊन म्हणत असे, ‘माझ्या शत्रूपासून मला न्याय द्या.’