Skip to content

Parables बद्दल बायबलमधील वचने

452 वचने · 74 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “तेव्हा त्याने आणखी काही दास पाठविले, ‘ज्यांना आमंत्रित केले आहे त्यांना सांगा की मी मेजवानी तयार केली आहे, माझे बैल आणि पुष्ट गुरे कापली आहेत आणि सर्वकाही तयार आहे. लग्नाच्या मेजवानीस या.’

  2. “परंतु त्यांनी मुळीच लक्ष दिले नाही आणि एकजण आपल्या शेतावर, तर दुसरा आपल्या व्यापारासाठी निघून गेला.

  3. बाकीच्या आमंत्रितांनी तर राजाच्या दासांना पकडले, अपमानित वागणूक दिली आणि ठारही मारले.

  4. राजाला खूपच राग आला. त्याने आपले सैन्य पाठवून दासांना ठार करणार्‍यांचा नाश केला. त्यांची शहरे जाळून टाकली.

  5. “यानंतर राजा आपल्या दासांना म्हणाला, ‘लग्नाची मेजवानी तयार आहे, पण ज्यांना मी आमंत्रण दिले ते लोक या बहुमानास पात्र नाहीत.

  6. तेव्हा तुम्ही रस्त्यांच्या चौकामध्ये जा आणि तिथे जे दिसतील, त्यांना मेजवानीस घेऊन या.’

  7. राजाच्या आज्ञेप्रमाणे दास बाहेर गेले आणि चांगले वाईट, असे जे कोणी त्यांना रस्त्यांत सापडले, त्या सर्वांना ते मेजवानीस घेऊन आले आणि मेजवानीचा कक्ष आमंत्रितांनी भरून गेला.

  8. “राजा पाहुणे मंडळीस भेटावयास आला, त्यावेळी एक मनुष्य विवाहोत्सवाचा पोशाख न घालताच आलेला दिसला.

  9. राजाने त्या मनुष्याला विचारले, ‘मित्रा, लग्नाच्या पोषाखाशिवाय तू आत कसा आलास?’ तो मनुष्य स्तब्ध झाला.

  10. “मग राजा आपल्या नोकरास म्हणाला, ‘या मनुष्याचे हातपाय बांधा आणि त्याला बाहेरच्या अंधारात फेकून द्या. त्या ठिकाणी रडणे आणि दातखाणे चालेल.’

  11. “कारण बोलावलेले पुष्कळ आहेत, पण निवडलेले थोडके आहेत.”

  12. “आता अंजिराच्या झाडापासून हा बोध घ्या व शिका. त्या झाडाच्या डाहळ्या कोवळ्या झाल्या आणि त्यांना पालवी फुटू लागली म्हणजे उन्हाळा जवळ आला आहे, हे तुम्ही ओळखता.

  13. या सर्व घटना घडत असताना तुम्ही पाहाल, तेव्हा ते अगदी जवळ, दारातच आहे हे समजून घ्या.

  14. मी तुम्हाला निश्चित सांगतो की, या सर्वगोष्टी घडून आल्याशिवाय ही पिढी खात्रीने नाहीशी होणार नाही.

  15. पण एक गोष्ट नीट समजून घ्या की चोर रात्रीच्या कोणत्या घटकेला येणार ती घरधन्याला आधी समजली असती, तर त्याने पहारा ठेवला असता आणि आपले घर फोडू दिले नसते.

  16. “तुमच्यामध्ये प्रामाणिक व सुज्ञ कारभारी कोण आहे? ज्याच्यावर घरधनी त्याच्या कुटुंबीयांची देखभाल करण्याचे व अन्नाचे योग्य वेळी वाटप करण्याचे काम सोपवितो.

  17. धनी येईल, तेव्हा जो दास आपली कामगिरी बजावीत असताना त्याला आढळेल, तो धन्य होय.

  18. मी तुम्हाला निश्चित सांगतो की तो धनी आपल्या सर्व मालमत्तेवर त्याची नेमणूक करेल.

  19. परंतु समजा तो दुष्ट दास आपल्या मनात म्हणेल, ‘माझा धनी येण्यास पुष्कळ विलंब होत आहे,’

  20. आणि तो सोबतीच्या दासांना मारहाण करू लागेल आणि मद्यपीं बरोबर खाऊ आणि पिऊ लागेल.

  21. तर त्या दासाचा धनी, तो अपेक्षा करीत नाही आणि तो सावध नाही अशा घटकेला येईल.

  22. त्या दासाचे तुकडे करेल व ढोंग्यांबरोबर जिथे रडणे व दातखाणे होईल तिथे त्याला वाटा देईल.

  23. “त्यावेळी स्वर्गाचे राज्य, आपआपले दिवे घेऊन वराला सामोर्‍या जाणार्‍या दहा कुमारींसारखे होईल.

  24. त्यांच्यापैकी पाच मूर्ख होत्या व पाच शहाण्या होत्या.

  25. मूर्ख कुमारींनी दिव्यांबरोबर आपले तेल घेतले नाही.