मुख्य मजकुरावर जा

Parables बद्दल बायबलमधील वचने: Vine and branches

5 वचने · 74 पैलू

"Parables" साठी शोधा

Vine and branches बद्दल वचने

  1. “मी खरी द्राक्षवेल आहे आणि माझे पिता माळी आहेत.

  2. माझ्यातील प्रत्येक फांदी जी फळ देत नाही ती ते छाटून टाकतात आणि फळ न देणार्‍या प्रत्येक फांदीला अधिक फळ यावे म्हणून ते तिची छाटणी करतात.

  3. जे वचन मी तुम्हाला सांगितले आहे त्यामुळे तुम्ही आधी शुद्ध झालाच आहात.

  4. म्हणून मजमध्ये राहा व मी तुम्हामध्ये राहीन. कोणतीही फांदी स्वतःहून फळ देऊ शकत नाही; तिला वेलीमध्येच राहणे भाग आहे. तसेच माझ्यामध्ये राहिल्यावाचून तुम्हालाही फळ देता येणे शक्य नाही.

  5. “मी द्राक्षवेल आहे; तुम्ही फांद्या आहात. जर तुम्ही मजमध्ये राहाल व मी तुम्हामध्ये, तर तुम्ही मुबलक फळ द्याल; कारण माझ्यापासून वेगळे राहून तुम्हालाही काही करता येणार नाही.