Parables बद्दल बायबलमधील वचने: Lighted candle
Lighted candle बद्दल वचने
नंतर येशूंनी त्यांना म्हटले, “कोणी दिवा लावून मापाखाली किंवा खाटेखाली ठेवतो काय? त्याऐवजी, तुम्ही दिवठणीवर ठेवत नाही का?
“कोणी दिवा लावून त्याचा प्रकाश लपून राहील अशा ठिकाणी किंवा मापाखाली ठेवत नाही. उलट दिवठणीवर ठेवतात, यासाठी की आत येणार्यांनाही प्रकाश मिळावा.
तुझा डोळा शरीराचा दिवा आहे. तुझे डोळे निर्दोष असले म्हणजे तुझे सर्व शरीरही प्रकाशमय होईल. पण जर ते दोषी असतील तर तुझे शरीरही अंधकारमय असेल.
म्हणून तुझ्यामध्ये जो प्रकाश आहे, तो अंधार तर नाही ना, याविषयी काळजी घे.
यास्तव, जर तुझे सर्व शरीर प्रकाशाने भरलेले असले आणि कोणताही भाग अंधकारमय नसला, तर दिव्याचा प्रकाश तुझ्यावर पडेल तसे ते पूर्णपणे प्रकाशमय होईल.”