Skip to content

God बद्दल बायबलमधील वचने

662 वचने · 46 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मी माझे मस्तक उंच करू लागलो, की तुम्ही सिंहासारखी मजवर झडप घालणार आणि पुन्हा तुमच्या अद्भुत शक्तीचे माझ्याविरुद्ध प्रदर्शन करणार.

  2. तुम्ही माझ्याविरुद्ध नवीन साक्षीदार आणता, आणि आपला क्रोध माझ्याविरुद्ध वाढविता; तुमचे सामर्थ्य माझ्याविरुद्ध लाटांप्रमाणे एका पाठोपाठ येतात.

  3. “मग तुम्ही मला गर्भाशयातून बाहेर का आणले? कोणीही मला पाहण्यापूर्वी मला मरण आले असते तर बरे झाले असते.

  4. “परंतु प्राण्यांना विचार, ते तुला शिकवतील, किंवा आकाशातील पाखरे तुला सांगतील;

  5. अथवा पृथ्वीशी बोलावे आणि ती तुला शिकवेल; किंवा सागरातील माशांनी तुला माहिती देऊ दे.

  6. या सर्वापैकी कोणासही ठाऊक नाही का की याहवेहच्या हाताने हे केले आहे?

  7. कारण प्रत्येक प्राण्याचा जीव, आणि सर्व मानवजातीचा श्वास त्यांच्याच हातात आहे.

  8. जशी अन्नाची चव जिभेला समजते, तशीच शब्दांची पारख कान करीत नाहीत का?

  9. वयस्कांमध्ये ज्ञान आढळून येते की नाही? दीर्घ आयुष्याने समज येते की नाही?

  10. “ज्ञान आणि सामर्थ्य हे परमेश्वराचे आहेत; सल्ला आणि समज त्यांचेच आहे.

  11. ते जे पाडतात, ते पुन्हा बांधता येत नाही; ते ज्याला बंदिवासात पकडतात, त्याला सुटका नाही.

  12. परमेश्वराने जर पाऊस रोखून धरला, तर दुष्काळ पडतो; आणि त्याला मोकळे सोडले, तर पृथ्वी उद्ध्वस्त होते.

  13. पराक्रम आणि शहाणपण ही त्यांची आहेत; फसणारे आणि फसविणारे दोन्हीही त्यांचेच आहेत.

  14. ते मंत्र्यांना विवस्त्र करतात आणि न्यायाधीशांना मूर्ख ठरवितात.

  15. राजांनी टाकलेली बेडी ते तोडून टाकतात आणि त्यांच्या कंबरेस लंगोट बांधतात.

  16. ते याजकांना अनवाणी चालावयास लावतात स्थिर झालेल्या अधिकार्‍यांना ते उलथून टाकतात.

  17. विश्वासू सल्लागारांची तोंडे ते बंद करतात आणि वडीलजनांचा विवेक काढून घेतात.

  18. परमेश्वर उत्तरेकडील नभोमंडळ मोकळ्या अंतरिक्षावर पसरवितात; आणि पृथ्वी निराधार टांगली आहे.

  19. आपल्या घनदाट मेघांमध्ये ते जल कोंडून ठेवतात, तरीही त्यांच्या वजनाने आभाळ फाटत नाहीत.

  20. त्यांनी आपले मेघ पसरवून, पौर्णिमेच्या चंद्राचे मुख झाकले आहे.

  21. त्यांनी जलांवर क्षितिज नेमून ठेवले आहे प्रकाश व अंधकारासाठीही सीमा आखून दिल्या आहेत.

  22. परमेश्वराच्या धमकावण्याने आकाशातील स्तंभ थरथरतात, त्यांच्या धाकाने ते भयचकित होतात.

  23. आपल्या शक्तीने ते सागर घुसळून टाकतात; आणि आपल्या बुद्धीच्या बलाने राहाबाचे तुकडे तुकडे करतात.

  24. केवळ त्यांच्या श्वासाने आकाशाला सौंदर्य लाभते; त्यांच्या हाताने वेगाने सळसळणार्‍या सर्पाला विंधले आहे.

  25. परमेश्वर करतात त्यातील या तर केवळ किरकोळ गोष्टी आहेत; आम्ही मात्र त्यांचा कानोसा घेऊ शकतो! त्यांच्या सामर्थ्याचा गडगडाट कोण समजू शकणार?”