Skip to content

God बद्दल बायबलमधील वचने

662 वचने · 46 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. परमेश्वर चूक करतील, किंवा सर्वसमर्थ न्याय विपरीत करतील हे अकल्पनीय आहे.

  2. त्यांची या पृथ्वीवर कोणाला नियुक्त केले? किंवा संपूर्ण जगाचा अधिकार त्यांना कोणी दिला?

  3. जर त्यांच्या मनास आले आणि आपला आत्मा व श्वास काढून घेतला,

  4. तर सर्व मानवजात एकदम नष्ट होईल आणि मनुष्यप्राणी परत धुळीला जाऊन मिळेल.

  5. “तुम्हाला जर समज आहे, तर हे ऐका; मला काय बोलायचे आहे ते लक्षपूर्वक ऐका.

  6. जो न्यायाचा द्वेष करतो तो अधिकार करेल काय? जो नीतिमान आणि बलवान त्याचे तू खंडन करशील काय?

  7. ‘तुम्ही मूल्यहीन आहात,’ असे राजांना सांगणारे, आणि ‘तुम्ही दुष्ट आहात’ असे सज्जनांना म्हणणारे परमेश्वरच नाही काय?

  8. जे राजपुत्रांना देखील पक्षपात दाखवित नाही आणि गरिबांपेक्षा श्रीमंतावर उपकार करत नाही, कारण ते सर्व त्यांचीच हस्तकृती नाहीत काय?

  9. मध्यरात्री, एका क्षणात त्यांचा अंत होतो; लोक डळमळतात आणि नाहीसे होतात; मानवी मदतीशिवाय बलवान काढून टाकले जातात.

  10. “मानवाच्या मार्गाकडे त्यांचे डोळे लागलेले आहेत; परमेश्वराचे त्यांच्या प्रत्येक पावलांवर लक्ष आहे.

  11. कोणतीही दाट छाया ना गडद अंधकार आहे, जिथे दुष्कर्मी लपू शकतील.

  12. लोकांची पुढे अजून परीक्षा करावी अशी परमेश्वराला गरज नाही, जेणेकरून त्यांनी न्यायासाठी त्यांच्यासमोर यावे.

  13. चौकशी न करताच ते बलवानांना छिन्नभिन्न करतात आणि त्यांच्या स्थानी दुसर्‍यास स्थापितात.

  14. कारण त्यांच्या प्रत्येक कृत्यांची ते नोंद घेतात, रात्रीच्या वेळी ते दुष्टाला उलथून टाकतात आणि ते तुडविले जातात.

  15. आणि सर्व लोक पाहू शकतील अशी शिक्षा त्यांच्या दुष्टपणामुळे परमेश्वर त्यांना करतात,

  16. कारण परमेश्वराचे अनुसरण करण्यापासून ते फिरले आहेत आणि त्यांच्या कोणत्याही मार्गाविषयी दुष्टाला आदर नाही.

  17. त्यांच्यामुळे गरिबांचे अश्रू परमेश्वरासमोर आले आहेत अशासाठी की गरजवंत लोकांचा आक्रांत ते ऐकतील.

  18. परंतु ते जर शांत राहिले, तर त्यांना कोण दोष देईल? जर त्यांनी आपले मुख लपविले, तर कोण त्यांना बघू शकेल? तरी व्यक्ती असो वा राष्ट्र, परमेश्वर त्यासर्वांच्या वर एकसारखेच आहेत,

  19. अशासाठी की देवहीन मनुष्याला अधिकार देण्यापासून आणि लोकांसाठी जाळे टाकण्यापासून प्रतिबंध करता यावा.

  20. “हे ऐकून माझे हृदय धडधडते ते आपल्याच ठिकाणी झेप घेते.

  21. ऐका! परमेश्वराच्या डरकाळीचा आवाज ऐका, ती गर्जना जी त्यांच्या मुखातून येते.

  22. संपूर्ण आकाशाच्या खालून ते लखलखीत वीज मोकळी सोडतात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत पाठवितात.

  23. त्यानंतर त्यांच्या डरकाळीचा आवाज येतो; त्यांच्या राजेशाही आवाजात ते गडगडतात. जेव्हा त्यांचा आवाज सगळीकडे घुमतो, तेव्हा ते काहीही मागे धरून ठेवीत नाहीत.

  24. परमेश्वराची वाणी आश्चर्यकारकरित्या गर्जना करते; आमच्या बुद्धीपलीकडील महान कार्य ते करतात.

  25. हिमास, ‘तू पृथ्वीवर पड,’ आणि पावसाच्या सरींना, ‘मुसळधार वृष्टी होवो’ असे सांगतात.