मुख्य मजकुरावर जा

circa 1446–1406 BC

The Wilderness Years

Forty years of wandering in the desert test Israel's faith and prepare a new generation to enter the promised land.

2,247 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. अनुवाद ९:२३सुमारे इ.स.पू. १४५१

    आणि जेव्हा याहवेहने तुम्हाला कादेश-बरनेआ येथून पाठविले, तेव्हा ते म्हणाले, “वर जा आणि जो देश मी तुम्हाला दिला आहे त्याचा ताबा घ्या.” पण तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञेविरुद्ध बंड केले. त्यांच्यावर भरवसा ठेवला नाही व त्यांची आज्ञा पाळली नाही.

  2. अनुवाद ९:२४सुमारे इ.स.पू. १४५१

    मी तुम्हाला ओळखतो, त्या दिवसापासून तुम्ही याहवेहविरुद्ध बंड करीत आहात.

  3. अनुवाद ९:२५सुमारे इ.स.पू. १४५१

    म्हणूनच मी याहवेहपुढे चाळीस दिवस व चाळीस रात्र पालथा पडून राहिलो, कारण याहवेह म्हणाले होते की, ते तुमचा नाश करतील.

  4. अनुवाद ९:२६सुमारे इ.स.पू. १४५१

    मी याहवेहला प्रार्थना केली आणि म्हणालो, “हे सार्वभौम याहवेह, तुमच्या प्रचंड शक्तीने व तुमच्या बलाढ्य हाताने इजिप्त देशातून वाचविलेल्या तुमच्या लोकांचा, तुमच्या वारसांचा संहार करू नका.

  5. अनुवाद ९:२७सुमारे इ.स.पू. १४५१

    तुमचे सेवक अब्राहाम, इसहाक व याकोब यांची आठवण करा. या लोकांचा हट्टीपणा, त्यांच्या दुष्टपणाकडे व त्यांच्या पापाकडे लक्ष देऊ नका.

  6. अनुवाद ९:२८सुमारे इ.स.पू. १४५१

    कारण जर तुम्ही यांचा नाश केला, तर ज्या देशामधून तुम्ही आम्हाला बाहेर आणले ते लोक म्हणतील, ‘वचनदत्त देशात त्यांना नेण्यास त्यांचा याहवेह असमर्थ होता आणि तो त्यांचा द्वेष करीत होता म्हणून त्याने त्यांचा नाश केला व त्यांना ठार मारण्यासाठीच त्याने त्यांना रानात नेले.’

  7. अनुवाद ९:२९सुमारे इ.स.पू. १४५१

    पण हे तुमचे लोक, तुमचे वारसदार आहेत. तुम्हीच त्यांना तुमच्या महान सामर्थ्याने आणि पसरलेल्या बाहूने इजिप्तमधून बाहेर आणले.”

  8. अनुवाद १०:१सुमारे इ.स.पू. १४९१

    त्यावेळी याहवेहने मला सांगितले, “पहिल्या पाट्यांसारख्याच आणखी दोन दगडी पाट्या तू घडव आणि त्या घेऊन पर्वतावर माझ्याकडे ये. एक लाकडी कोशही तयार कर.

  9. अनुवाद १०:२सुमारे इ.स.पू. १४९१

    तू फोडून टाकलेल्या पहिल्या पाट्यांवर जी वचने होती, ती मी त्यावर लिहेन. मग त्या पाट्या तू कोशात ठेव.”

  10. अनुवाद १०:३सुमारे इ.स.पू. १४९१

    म्हणून मी बाभळीच्या लाकडाचा एक कोश तयार केला, आणि पहिल्यासारख्या दोन दगडी पाट्या घडविल्या व त्या पाट्या माझ्या हातात घेऊन मी पर्वतावर गेलो.

  11. अनुवाद १०:४सुमारे इ.स.पू. १४९१

    याहवेहने या पाट्यांवर जे आधी लिहिले होते तेच लिहिले, ज्या दहा आज्ञा त्यांनी पर्वतावर अग्नीमधून संपूर्ण मंडळीला घोषित केल्या होत्या, त्या पुन्हा लिहिल्या आणि मला सोपवून दिल्या.

  12. अनुवाद १०:५सुमारे इ.स.पू. १४९१

    नंतर मी पर्वतावरून खाली उतरलो आणि याहवेहने मला आज्ञा दिल्याप्रमाणे त्या पाट्या मी बनविलेल्या लाकडी कोशात ठेवून दिल्या; आजपर्यंत त्या तिथेच आहेत.

  13. अनुवाद १०:६सुमारे इ.स.पू. १४९१

    (मग इस्राएली लोक बेने याकानच्या विहिरी सोडून प्रवास करीत मोसेरापर्यंत आले. तिथे अहरोन मरण पावला व त्याला मूठमाती देण्यात आली, आणि त्याचा पुत्र एलअज़ार त्याच्यानंतर याजक झाला.

  14. अनुवाद १०:७सुमारे इ.स.पू. १४९१

    नंतर ते प्रवास करीत गुदगोदाह येथे आले व तिथून पुढे याटबाथह येथे आले, ही झर्‍यांची भूमी होती.

  15. अनुवाद १०:८सुमारे इ.स.पू. १४९१

    याच ठिकाणी याहवेहने लेवीच्या गोत्रास याहवेहच्या कराराचा कोश वाहून नेण्यासाठी, त्याचप्रमाणे याहवेहच्या समोर उभे राहून त्यांची सेवा करण्यास व त्यांच्या नावाने आशीर्वाद देण्यास नेमले, जसे आजपर्यंत चालत आले आहे.

  16. अनुवाद १०:९सुमारे इ.स.पू. १४९१

    म्हणून लेवी वंशजांना वचनदत्त देशात त्यांच्या बंधुवंशजांप्रमाणे वाटा किंवा वतन मिळालेले नाही, कारण याहेवह तुमच्या परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे याहवेह स्वतःच त्यांचे वतन आहेत.)

  17. अनुवाद १०:१०सुमारे इ.स.पू. १४९१

    त्या पर्वतावर पहिल्या वेळी राहिलो होतो, त्याप्रमाणे चाळीस दिवस व चाळीस रात्र राहिलो आणि या वेळीही याहवेहने माझी विनंती मान्य केली. तुमचा नाश करण्याची त्यांची इच्छा नव्हती.

  18. अनुवाद १०:११सुमारे इ.स.पू. १४९१

    याहवेह मला म्हणाले, “जा आणि सर्व लोकांना मी त्यांच्या पूर्वजांना वचनपूर्वक देऊ केलेल्या देशाकडे जाण्यास मार्गदर्शन कर, म्हणजे ते त्या देशात प्रवेश करून तो ताब्यात घेतील.”

  19. अनुवाद १०:१२सुमारे इ.स.पू. १४९१

    आता हे इस्राएली लोकहो, याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्याजवळ मागतात ते एवढेच की तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराचे भय धरावे, त्यांच्या आज्ञा पाळाव्या, त्यांच्यावर प्रीती करावी आणि पूर्ण मनाने व पूर्ण जिवाने याहवेह तुमच्या परमेश्वराची सेवा करावी,

  20. अनुवाद १०:१३सुमारे इ.स.पू. १४९१

    आणि याहवेहच्या ज्या आज्ञा व नियम आज मी तुम्हाला देत आहे, त्या तुमच्या भल्यासाठीच आहेत, त्या तुम्ही पाळाव्या.

  21. अनुवाद १०:१४सुमारे इ.स.पू. १४९१

    आकाश, सर्वोच्च आकाश, पृथ्वी व तिच्यावरील सर्वकाही याहवेह तुमच्या परमेश्वराचे आहे.

  22. अनुवाद १०:१५सुमारे इ.स.पू. १४९१

    असे असूनही याहवेहने तुमच्या पूर्वजांवर वात्सल्यमय प्रीती केली व त्यांच्यानंतर तुम्ही इतर सर्व राष्ट्रांहून श्रेष्ठ व्हावे म्हणून त्यांच्या वंशजांची म्हणजे तुमची निवड केली—जसे आजही आहे.

  23. अनुवाद १०:१६सुमारे इ.स.पू. १४९१

    म्हणून तुम्ही तुमच्या अंतःकरणाची सुंता करा आणि आता ताठ मानेचे राहू नका.

  24. अनुवाद १०:१७सुमारे इ.स.पू. १४९१

    याहवेह तुमचे परमेश्वर, हे देवाधिदेव, प्रभूंचे प्रभू, महान परमेश्वर, पराक्रमी आणि भयावह आहेत, जे पक्षपात करीत नाहीत व लाच घेत नाहीत.

  25. अनुवाद १०:१८सुमारे इ.स.पू. १४९१

    ते अनाथांचा व विधवांचा न्याय करतात, जे परदेशीय तुम्हामध्ये राहतात त्यांच्यावर प्रीती करून त्यांना अन्न व वस्त्रे देतात.