मुख्य मजकुरावर जा

circa 1446–1406 BC

The Wilderness Years

Forty years of wandering in the desert test Israel's faith and prepare a new generation to enter the promised land.

2,247 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. अनुवाद १०:१९सुमारे इ.स.पू. १४९१

    तुम्हीदेखील परदेशीयांवर प्रीती केली पाहिजे, कारण तुम्ही स्वतः इजिप्त देशामध्ये परदेशी होता.

  2. अनुवाद १०:२०सुमारे इ.स.पू. १४९१

    याहवेह तुमच्या परमेश्वराचे तुम्ही भय बाळगा, त्यांची सेवा करा, त्यांना बिलगून राहा आणि त्यांच्याच नावाने शपथ घ्या.

  3. अनुवाद १०:२१सुमारे इ.स.पू. १४९१

    तेच तुमच्या स्तुतीचा विषय आहे; तेच तुमचे परमेश्वर आहेत, त्यांनी केलेले महान व भयावह चमत्कार तुम्ही स्वतःच्या डोळ्याने पाहिले आहेत.

  4. अनुवाद १०:२२सुमारे इ.स.पू. १४९१

    ज्यावेळी तुमचे पूर्वज इजिप्तमध्ये गेले, त्यावेळी ते केवळ सत्तर जणच होते आणि आता याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला आकाशातील तार्‍यांइतके अगणित केले आहे.

  5. अनुवाद ११:१सुमारे इ.स.पू. १४९१

    याहवेह तुमच्या परमेश्वरावर प्रीती करावी आणि नेहमी त्यांचे विधी, त्यांचे नियम आणि त्यांच्या आज्ञा पाळाव्यात.

  6. अनुवाद ११:२सुमारे इ.स.पू. १४९१

    तुम्ही आज हे स्मरणात ठेवा, तुमच्या मुलांनी याहवेह तुमच्या परमेश्वराचे अनुशासन पाहिले नाही आणि त्याचा अनुभव केला नाही—त्यांचे गौरव, सामर्थ्यशाली हात व पसरलेल्या भुजांचा;

  7. अनुवाद ११:३सुमारे इ.स.पू. १४९१

    इजिप्तचा राजा फारोह व त्याच्या सर्व देशाच्या समक्षतेत याहवेहने केलेली चिन्हे आणि केलेल्या गोष्टी;

  8. अनुवाद ११:४सुमारे इ.स.पू. १४९१

    इजिप्तचे सैन्य, त्यांचे रथ आणि घोडे जेव्हा तुमचा पाठलाग करीत आले, तेव्हा याहवेहने त्या सैन्याला तांबड्या समुद्रामध्ये कसे बुडवून टाकले व त्यांची कशी दुर्दशा केली.

  9. अनुवाद ११:५सुमारे इ.स.पू. १४९१

    तुम्ही या ठिकाणी येईपर्यंत त्यांनी तुमच्यासाठी रानात काय केले,

  10. अनुवाद ११:६सुमारे इ.स.पू. १४९१

    रऊबेनाचा वंशज एलियाब, याचे पुत्र दाथान व अबीराम यांचे त्यांनी काय केले, जेव्हा पृथ्वीने सर्व इस्राएली छावणीच्या मध्यभागी आपले तोंड उघडले आणि तिने त्यांना, त्यांच्या घरादारांना, त्यांच्या डेर्‍यांना आणि त्यांच्या सर्व मालकीचे सर्व जिवंत प्राणी कसे गिळून टाकले हे तुमच्या मुलांनी पाहिले नाही.

  11. अनुवाद ११:७सुमारे इ.स.पू. १४९१

    परंतु याहवेहने केलेले हे सर्व महान कार्य तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे.

  12. अनुवाद ११:८सुमारे इ.स.पू. १४९१

    म्हणून मी तुम्हाला आज देत असलेल्या सर्व आज्ञा पाळाव्या, म्हणजे यार्देन ओलांडून ज्या देशात तुम्ही प्रवेश करणार आहात, तो हस्तगत करण्यास तुम्हाला सामर्थ्य मिळेल.

  13. अनुवाद ११:९सुमारे इ.स.पू. १४९१

    म्हणजे जो देश त्यांना व त्यांच्या वंशजांना देण्याविषयी याहवेहने तुमच्या पूर्वजांना वचन दिले होते, त्या दुधामधाच्या सुंदर देशात तुम्ही चिरकाल राहाल.

  14. अनुवाद ११:१०सुमारे इ.स.पू. १४९१

    कारण ज्या देशात तुम्ही प्रवेश करणार आहात व तो ताब्यात घेणार आहात, तो देश तुम्ही सोडून आलेल्या इजिप्त देशातील भूमीसारखा नाही. तिथे तुम्ही पेरणी केली व भाज्यांचे मळे लावण्यासाठी जलसिंचन केले.

  15. अनुवाद ११:११सुमारे इ.स.पू. १४९१

    परंतु यार्देन ओलांडून जो देश ताब्यात घेण्यासाठी तुम्ही जात आहात, तो देश डोंगराचा व दर्‍याखोर्‍यांचा आहे, जो आकाशातून पडणारा पाऊस पितो.

  16. अनुवाद ११:१२सुमारे इ.स.पू. १४९१

    याहवेह तुमचे परमेश्वर स्वतः त्या भूमीची काळजी घेतात; वर्षाच्या आरंभापासून अखेरपर्यंत याहवेह तुमच्या परमेश्वराची नजर सतत त्या देशावर असते.

  17. अनुवाद ११:१३सुमारे इ.स.पू. १४९१

    आज मी तुम्हाला देत असलेल्या या सर्व आज्ञा जर तुम्ही अगदी विश्वासूपणे पाळाल—तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वरावर पूर्ण अंतःकरणाने व पूर्ण जिवाने प्रीती कराल व त्यांची सेवा कराल—

  18. अनुवाद ११:१४सुमारे इ.स.पू. १४९१

    तर मी आगोठीचा आणि वळवाचा पाऊस योग्य समयी पाठवेन, म्हणजे तुम्हाला धान्य, नवीन द्राक्षे व तेलासाठी जैतुनाच्या तेलाचा साठा करता येईल.

  19. अनुवाद ११:१५सुमारे इ.स.पू. १४९१

    मी तुमच्या गुरांसाठी हिरवीगार कुरणे देईन आणि तुम्हीही खाल आणि तृप्त व्हाल.

  20. अनुवाद ११:१६सुमारे इ.स.पू. १४९१

    पण सावध असावे, तुम्ही इतर दैवतांची उपासना व त्यांना नमन करण्याकडे बहकून जाऊ नये.

  21. अनुवाद ११:१७सुमारे इ.स.पू. १४९१

    तसे केल्यास याहवेहचा क्रोध तुम्हावर भडकेल आणि ते आकाशकपाटे बंद करतील, मग पाऊस पडणार नाही, भूमी आपला हंगामही देणार नाही आणि याहवेहने तुम्हाला दिलेल्या या उत्तम देशातून तुम्ही त्वरित नाश पावाल.

  22. अनुवाद ११:१८सुमारे इ.स.पू. १४९१

    यास्तव माझ्या या आज्ञा काळजीपूर्वक आपल्या मनात आणि अंतःकरणात साठवून ठेवा; त्या तुम्ही आपल्या हातावर चिन्ह म्हणून बांधून ठेवा आणि आपल्या कपाळपट्टीवर बांधा.

  23. अनुवाद ११:१९सुमारे इ.स.पू. १४९१

    त्या आपल्या मुलांना शिकवा. घरी बसलेले असताना, वाटेवर चालत असताना, झोपण्याच्या वेळी व झोपेतून उठल्यानंतर त्याबद्दल बोलत राहा.

  24. अनुवाद ११:२०सुमारे इ.स.पू. १४९१

    त्या तुमच्या घरातील दाराच्या चौकटीवर व तुमच्या फाटकांवर लिहाव्या,

  25. अनुवाद ११:२१सुमारे इ.स.पू. १४९१

    म्हणजे जितके दिवस पृथ्वीवर आकाश स्थित आहे, तितके तुमच्या पूर्वजांना याहवेहने देऊ केलेल्या वचनदत्त देशात तुमचे आणि तुमच्या मुलाबाळांचे दिवस असतील.