- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1446–1406 BC
The Wilderness Years
Forty years of wandering in the desert test Israel's faith and prepare a new generation to enter the promised land.
या कालखंडातील वचने
- अनुवाद १२:१५सुमारे इ.स.पू. १४५१
तरीसुद्धा, याहवेह तुमचे परमेश्वर देत असलेल्या आशीर्वादाप्रमाणे तुम्ही तुमच्या नगरात तुमचे पशू ज्याप्रमाणे सांबर व हरिण मारून खाता त्याप्रमाणे पाहिजे तेवढे खा. विधिनियमानुसार अशुद्ध आणि शुद्ध असे दोघेही ते खाऊ शकतात.
- अनुवाद १२:१६सुमारे इ.स.पू. १४५१
पण तुम्ही रक्ताचे सेवन कधीही करू नये; तर ते जमिनीवर पाण्यासारखे ओतून द्यावे.
- अनुवाद १२:१७सुमारे इ.स.पू. १४५१
धान्य, द्राक्षारस व तेलाचे दशांश, गुरांचे प्रथमवत्स, नवसफेडीच्या वस्तू, स्वेच्छार्पणे व इतर अर्पणे या परमेश्वराला वाहिलेल्या अर्पणातून काहीही आपल्या नगरात खाऊ नये.
- अनुवाद १२:१८सुमारे इ.स.पू. १४५१
पण ही सर्व अर्पणे याहवेह तुमचे परमेश्वर निवडील त्या ठिकाणी तुमचे पुत्र, कन्या, तुमचे दास व दासी व तुमच्या शहरात राहणारे लेवी, या सर्वांसह तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वरासमोर खावीत. तुम्ही जे करता त्या प्रत्येक सेवेबद्दल परमेश्वरापुढे आनंद करावा.
- अनुवाद १२:१९सुमारे इ.स.पू. १४५१
जेव्हापर्यंत तुमचे या भूमीवर वास्तव्य असेल तेव्हापर्यंत लेवी वंशजांकडे दुर्लक्ष न करण्याची काळजी घ्यावी.
- अनुवाद १२:२०सुमारे इ.स.पू. १४५१
याहवेह तुमच्या परमेश्वराने आपल्या वचनाप्रमाणे तुमच्या देशाची सीमा वाढविल्यावर, तुम्हाला मांस खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही म्हणाल, “मला मांस खावयाचे आहे,” तेव्हा तुम्ही मनसोक्त मांस खावे.
- अनुवाद १२:२१सुमारे इ.स.पू. १४५१
याहवेह तुमच्या परमेश्वराने आपल्या नावासाठी निवडलेले स्थान तुमच्या घरापासून खूप दूर असेल, तर तुम्हाला जेव्हा इच्छा होईल, तेव्हा याहवेहने तुम्हाला दिलेल्या पशूंमधून किंवा मेंढरांमधून तुम्ही काहीही मारून खावे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ते मांस तुम्ही तुमच्या शहरात तुम्हाला हवे तेवढे खावे.
- अनुवाद १२:२२सुमारे इ.स.पू. १४५१
जो कोणी विधिनियमानुसार शुद्ध किंवा अशुद्ध असेल त्यानेही हे मांस, हरणाचे किंवा सांबराचे मांस खातात, त्याप्रमाणे खावे.
- अनुवाद १२:२३सुमारे इ.स.पू. १४५१
परंतु रक्त सेवन न करण्याची तुम्ही खबरदारी घ्यावी, कारण रक्त हे जीवन आहे, म्हणून तुम्ही मांसाबरोबर जीवन सेवन करू नये.
- अनुवाद १२:२४सुमारे इ.स.पू. १४५१
तुम्ही रक्ताचे सेवन करू नये; त्याऐवजी ते पाण्याप्रमाणे जमिनीवर ओतून टाकावे.
- अनुवाद १२:२५सुमारे इ.स.पू. १४५१
त्याचे सेवन करू नये, तर त्याने तुमचे आणि तुमच्यानंतर तुमच्या संततीचे सर्व बाबतींत कल्याण होईल, कारण याहवेहच्या दृष्टीने योग्य वाटणार्या गोष्टीच तुम्ही कराल.
- अनुवाद १२:२६सुमारे इ.स.पू. १४५१
परंतु जी पवित्र अर्पणे करावयाची असतील व नवसाची दाने द्यावयाची असतील, ती घेऊन तुम्ही याहवेह जे स्थान निवडील, त्या स्थानी जावे.
- अनुवाद १२:२७सुमारे इ.स.पू. १४५१
तिथे आपल्या होमबलीचे मांस व रक्त याहवेह तुमच्या परमेश्वराच्या वेदीवर अर्पण करावे. तुमच्या यज्ञपशूंचे रक्त याहेवह तुमच्या परमेश्वराच्या वेदीवर ओतावे आणि मांस खावे.
- अनुवाद १२:२८सुमारे इ.स.पू. १४५१
या सर्व आज्ञा पाळण्याची तुम्ही खबरदारी घ्यावी. याहवेह तुमच्या परमेश्वराच्या दृष्टीने जे उत्तम आणि योग्य ते तुम्ही केले, तर तुमचे आणि तुमच्या मुलाबाळांचे निरंतर कल्याण होईल.
- अनुवाद १२:२९सुमारे इ.स.पू. १४५१
ज्या भूमीत तुम्ही राहणार आहात तेथील राष्ट्रांचा याहवेह तुमचे परमेश्वर नाश करतील. मग त्यांना तिथून घालवून दिल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी वस्ती करावी,
- अनुवाद १२:३०सुमारे इ.स.पू. १४५१
आणि तुमच्यासमोर ते नष्ट झाल्यानंतर, तुम्ही त्यांच्या दैवतांची चौकशी कराल “ही राष्ट्रे त्यांच्या दैवतांची उपासना कशी करीत होती? आपणही तसेच करावे,” तसे करण्याचा तुम्हाला मोह होईल, तेव्हा त्यांच्या दैवतांच्या मोहात अडकू नये याची खबरदारी घ्या.
- अनुवाद १२:३१सुमारे इ.स.पू. १४५१
त्यांच्या पद्धतीप्रमाणे तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराची उपासना कदापि करू नये, कारण त्यांच्या दैवतांच्या उपासनेमध्ये ते अशी घृणित कृत्ये करतात, ज्यांचा याहवेह तिरस्कार करतात. ते आपल्या पुत्रांना जाळतात आणि कन्यांचा त्यांच्या दैवतांना होम करतात.
- अनुवाद १२:३२सुमारे इ.स.पू. १४५१
मी देत असलेल्या सर्व आज्ञांचे तुम्ही पालन करावे; त्यात काहीही भर घालू नये किंवा त्यातून काही कमी करू नये.
- अनुवाद १३:१सुमारे इ.स.पू. १४५१
जर तुम्हामध्ये कोणी ज्योतिषी किंवा स्वप्नांच्या आधाराने भविष्य सांगणारा असेल व त्याने दैवी चिन्ह आणि चमत्कारांची घोषणा केली,
- अनुवाद १३:२सुमारे इ.स.पू. १४५१
आणि जर त्याची चिन्हे आणि भविष्ये खरी ठरली आणि तो ज्योतिषी म्हणेल, “चला, आपण इतर दैवतांचे अनुसरण करू आणि त्यांची उपासना करू.” (अशी दैवते ज्यांची तुम्हाला ओळख नसेल)
- अनुवाद १३:३सुमारे इ.स.पू. १४५१
तर तुम्ही त्या ज्योतिष्याचे किंवा स्वप्नदर्शीचे शब्द ऐकू नका. कारण तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वरावर मनापासून प्रीती करता की नाही, हे पाहण्यासाठी परमेश्वर तुमची परीक्षा घेत आहेत.
- अनुवाद १३:४सुमारे इ.स.पू. १४५१
याहवेह तुमच्या परमेश्वराचेच तुम्ही अनुसरण करावे व त्यांचेच भय बाळगावे. त्यांच्या आज्ञा पाळाव्यात, त्यांची वाणी ऐकावी; त्यांची सेवा करावी व त्यांनाच बिलगून राहावे.
- अनुवाद १३:५सुमारे इ.स.पू. १४५१
जो संदेष्टा किंवा स्वप्नदर्शी तुम्हाला बहकवील त्याला अवश्य जिवे मारावे, कारण ज्या याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला इजिप्त देशातील गुलामगिरीतून बाहेर काढले, त्यांच्याविरुद्ध बंड करण्यास त्याने तुम्हाला प्रवृत्त केले. तुम्ही स्वतःला या दुष्टाईपासून मुक्त केले पाहिजे.
- अनुवाद १३:६सुमारे इ.स.पू. १४५१
जर तुमचा स्वतःचा बंधू किंवा तुमचे पुत्र किंवा कन्या किंवा तुमची प्रिय पत्नी किंवा जिवलग मित्र तुम्हाला गुप्तपणे भुरळ पाडेल व म्हणेल, “चल, आपण जाऊ आणि इतर दैवतांची उपासना करू” (ज्यांना तुम्ही वा तुमचे पूर्वज ओळखत नाहीत,
- अनुवाद १३:७सुमारे इ.स.पू. १४५१
जे तुमच्या शेजार्यांचे देव आहेत, ते जवळ असो वा दूर, त्या भूमीच्या एका टोकापासून असो वा दुसर्या टोकापर्यंत),