मुख्य मजकुरावर जा

circa 1446–1406 BC

The Wilderness Years

Forty years of wandering in the desert test Israel's faith and prepare a new generation to enter the promised land.

2,247 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. अनुवाद १३:८सुमारे इ.स.पू. १४५१

    तर त्यांना संमती देऊ नका किंवा त्यांचे ऐकू नका. त्यांची गयही करू नका. त्यांना वाचवू नका किंवा संरक्षण देऊ नका.

  2. अनुवाद १३:९सुमारे इ.स.पू. १४५१

    तर त्यांना अवश्य जिवे मारावे. त्यांना मृत्युदंड देत असताना, त्यांच्यावर तुमचा हात सर्वप्रथम पडला पाहिजे आणि त्यानंतर इतर लोकांचे हात पडावेत.

  3. अनुवाद १३:१०सुमारे इ.स.पू. १४५१

    त्यांना मरेपर्यंत धोंडमार करावी, कारण ज्यांनी तुम्हाला इजिप्त देशाच्या गुलामगिरीतून बाहेर काढले, त्या याहवेह तुमच्या परमेश्वरापासून तुम्हाला फूस लावून दूर नेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.

  4. अनुवाद १३:११सुमारे इ.स.पू. १४५१

    तेव्हा संपूर्ण इस्राएल ऐकेल व भयभीत होईल आणि तुमच्यामध्ये असा दुष्टपणा करण्यास कोणी धजणार नाही.

  5. अनुवाद १३:१२सुमारे इ.स.पू. १४५१

    याहवेह तुमचे परमेश्वर वस्ती करण्यास देत असलेल्या एखाद्या शहरातून तुमच्या कानावर आले की,

  6. अनुवाद १३:१३सुमारे इ.स.पू. १४५१

    तुमच्यापैकी काही अधम पुरुष निघाले आहेत आणि त्यांनी त्यांच्या नगरातील लोकांना हे बोलून बहकविले, “चला आपण जाऊ आणि इतर दैवतांची उपासना करू” (अशी दैवते ज्यांना तुम्ही ओळखत नाहीत),

  7. अनुवाद १३:१४सुमारे इ.स.पू. १४५१

    तर तुम्ही त्याची चौकशी करावी, शोध करावा आणि सखोल तपासणी करावी आणि जर हे सत्य असेल की तुमच्यामध्ये असे घृणित कृत्य घडले आहे,

  8. अनुवाद १३:१५सुमारे इ.स.पू. १४५१

    तर तुम्ही त्या नगरातील लोकांना तलवारीने निश्चित मारून टाकावे. त्यातील सर्व रहिवाशांचा आणि गुरांचा समूळ नाश करावा.

  9. अनुवाद १३:१६सुमारे इ.स.पू. १४५१

    त्यानंतर युद्धात मिळालेल्या लुटीचा नगरातील रस्त्याच्या मधोमध ढीग करून त्याला आग लावावी आणि ते संपूर्ण नगर होमार्पण म्हणून याहवेह तुमच्या परमेश्वराला अर्पण करावे. हे नगर म्हणजे एक उजाड ठिकाण म्हणून कायम राहील. ते पुन्हा कधीही बांधले जाणार नाही,

  10. अनुवाद १३:१७सुमारे इ.स.पू. १४५१

    आणि निषिद्ध वस्तूंपैकी ज्या विनाशासाठी ठरविलेल्या आहेत त्यातील काहीही तुमच्या हातात राहू नये. मग याहवेहचा तीव्र क्रोध शमेल, ते तुमच्यावर दया करतील आणि तुम्हावर करुणा करतील. तुमच्या पूर्वजांना वचन दिल्याप्रमाणे ते तुम्हाला बहुगुणित करतील—

  11. अनुवाद १३:१८सुमारे इ.स.पू. १४५१

    कारण तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराची वाणी ऐकून, आज मी तुम्हाला ज्या आज्ञा देत आहे त्या पाळल्या आणि त्यांच्या दृष्टीने जे योग्य तेच केले आहे.

  12. अनुवाद १४:१सुमारे इ.स.पू. १४५१

    याहवेह तुमच्या परमेश्वराची तुम्ही संतती आहात. मृतांसाठी स्वतःला जखमा करून घेऊ नका किंवा डोक्याचे मुंडण करून घेऊ नका,

  13. अनुवाद १४:२सुमारे इ.स.पू. १४५१

    कारण तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराचे पवित्रजन आहात. पृथ्वीवरील इतर सर्व राष्ट्रांमधून तुम्हीच त्यांचा मौल्यवान ठेवा असावे म्हणूनच याहवेहने तुम्हाला निवडले आहे.

  14. अनुवाद १४:३सुमारे इ.स.पू. १४५१

    कोणतेही निषिद्ध ठरविण्यात आलेले अन्न तुम्ही खाऊ नये.

  15. अनुवाद १४:४सुमारे इ.स.पू. १४५१

    तुम्ही हे प्राणी खाऊ शकता: बैल, मेंढरे व शेरडे,

  16. अनुवाद १४:५सुमारे इ.स.पू. १४५१

    सांबर, हरिण, भेकर, रानबोकड, रोही, गवा व डोंगरी मेंढा.

  17. अनुवाद १४:६सुमारे इ.स.पू. १४५१

    ज्यांचे खूर दुभागलेले आहेत आणि जे प्राणी रवंथ करतात असे कोणतेही प्राणी तुम्ही खाऊ शकता.

  18. अनुवाद १४:७सुमारे इ.स.पू. १४५१

    तरी, जे प्राणी फक्त रवंथ करतात अथवा ज्यांचे फक्त खूर दुभागलेले असतात, हे प्राणी तुम्ही खाऊ नयेत: उंट, ससा आणि रानससा; कारण हे प्राणी रवंथ करतात, परंतु त्यांचे खूर दुभागलेले नसतात; ते प्राणी तुमच्यासाठी विधिनियमानुसार अशुद्ध आहेत.

  19. अनुवाद १४:८सुमारे इ.स.पू. १४५१

    डुकरे देखील अशुद्ध आहेत; त्यांचे खूर जरी दुभागलेले आहेत, तरी ते रवंथ करीत नाहीत, त्यांचे मांस तुम्ही खाऊ नये किंवा त्यांच्या मृतशरीरांना स्पर्श करू नये.

  20. अनुवाद १४:९सुमारे इ.स.पू. १४५१

    पाण्यात राहणार्‍या सर्व प्राण्यांपैकी ज्यांना कल्ले व खवले आहेत, त्यांना तुम्ही खाऊ शकता.

  21. अनुवाद १४:१०सुमारे इ.स.पू. १४५१

    परंतु ज्यांना कल्ले व खवले नाहीत ते तुम्ही खाऊ नये; तुमच्यासाठी ते अशुद्ध आहे.

  22. अनुवाद १४:११सुमारे इ.स.पू. १४५१

    कोणतेही शुद्ध पक्षी खाण्यास योग्य आहेत.

  23. अनुवाद १४:१२सुमारे इ.स.पू. १४५१

    परंतु हे पक्षी तुम्ही खाऊ नये: गरुड, गिधाड, काळे गिधाड,

  24. अनुवाद १४:१३सुमारे इ.स.पू. १४५१

    लाल पतंग, काळे पतंग, निरनिराळ्या जातीच्या घारी,

  25. अनुवाद १४:१४सुमारे इ.स.पू. १४५१

    कोणत्याही जातीचे कावळे,