मुख्य मजकुरावर जा

circa 1446–1406 BC

The Wilderness Years

Forty years of wandering in the desert test Israel's faith and prepare a new generation to enter the promised land.

2,247 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. अनुवाद १४:१५सुमारे इ.स.पू. १४५१

    शिंग असलेले घुबड, किंचाळणारे घुबड, समुद्रपक्षी, सर्व जातीचे बहिरी ससाणे,

  2. अनुवाद १४:१६सुमारे इ.स.पू. १४५१

    लहान घुबड, पिंगळा, मोठे घुबड, पांढरे घुबड,

  3. अनुवाद १४:१७सुमारे इ.स.पू. १४५१

    वाळवंटी घुबड, कुरर, करढोक,

  4. अनुवाद १४:१८सुमारे इ.स.पू. १४५१

    करकोचा, कोणत्याही प्रकारचे बगळे, टिटवी आणि वटवाघूळ.

  5. अनुवाद १४:१९सुमारे इ.स.पू. १४५१

    सर्वप्रकारचे उडणारे कीटक तुमच्यासाठी अशुद्ध आहेत; ते तुम्ही खाऊ नये.

  6. अनुवाद १४:२०सुमारे इ.स.पू. १४५१

    पण पंख असलेले कोणतेही पक्षी जे शुद्ध आहेत ते तुम्ही खाऊ शकता.

  7. अनुवाद १४:२१सुमारे इ.स.पू. १४५१

    आधीच मृत्यू पावलेले असे काहीही तुम्ही खाऊ नये. तुमच्या नगरात राहणार्‍या एखाद्या परकियाने ते खाण्यास हरकत नाही. किंवा परकियाला विकत द्यावा, परंतु तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराचे पवित्रजन आहात. त्याच्या आईच्या दुधात करडाला कधीही शिजवू नये.

  8. अनुवाद १४:२२सुमारे इ.स.पू. १४५१

    तुमच्या शेतात प्रत्येक वर्षी होणार्‍या उत्पन्नाचा दशांश भाग वेगळा ठेवण्याची खात्री करा.

  9. अनुवाद १४:२३सुमारे इ.स.पू. १४५१

    धान्याचा, नवीन द्राक्षारसाचा व जैतुनाच्या तेलाचा दशांश आणि तुमच्या गुरांच्या व शेरडामेंढरांच्या प्रथम वत्सांनाही याहवेह तुमच्या परमेश्वरासमोर त्यांच्या नावाप्रित्यर्थ खाण्यासाठी, ते जे पवित्रस्थान निवडतील त्या ठिकाणी खा, म्हणजे तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराचे नेहमीच आदर करण्याचे शिकाल.

  10. अनुवाद १४:२४सुमारे इ.स.पू. १४५१

    परंतु जर ते ठिकाण खूप दूर असेल आणि तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराद्वारे आशीर्वादित झाला असाल आणि तुमचा दशांश घेऊन जाणे गैरसोईचे असेल (कारण जे ठिकाण याहवेह त्यांच्या नावाच्या स्थापनेसाठी निवडतील ते खूप दूर आहे),

  11. अनुवाद १४:२५सुमारे इ.स.पू. १४५१

    तर मग तुमचे दशांश चांदीच्या मोबदल्यात घ्या, ही चांदी तुमच्याबरोबर घ्या आणि याहवेह तुमचे परमेश्वर निवडतील त्या ठिकाणी जा.

  12. अनुवाद १४:२६सुमारे इ.स.पू. १४५१

    त्या चांदीने तुम्हाला आवडेल ते विकत घ्या: गाई, बैल, मेंढी, थोडा द्राक्षारस अथवा आंबलेले पेय आणि तुम्हाला हवे असलेले काहीही. त्या ठिकाणी याहवेह तुमच्या परमेश्वरासमोर तुम्ही आणि तुमच्या कुटुंबासह खाऊन पिऊन आनंद करावा.

  13. अनुवाद १४:२७सुमारे इ.स.पू. १४५१

    आणि तुमच्या नगरात राहत असलेल्या लेवी वंशजांकडे तुम्ही कधीही दुर्लक्ष करू नये; कारण त्यांना तुमच्यासारखा वाटा अथवा वतन नाही.

  14. अनुवाद १४:२८सुमारे इ.स.पू. १४५१

    प्रत्येक तिसर्‍या वर्षाच्या शेवटी संपूर्ण उत्पन्नाचा दशांश आणावा आणि तुमच्या नगरात एकत्र साठवून ठेवावा,

  15. अनुवाद १४:२९सुमारे इ.स.पू. १४५१

    म्हणजे लेवी वंशजांना (ज्यांना स्वतःचा वाटा अथवा वतन नाही) तो दशांश द्यावा किंवा परकियांना द्यावा अथवा तुमच्या नगरात असणार्‍या विधवांना आणि अनाथांना द्यावा. म्हणजे ते खाऊन तृप्त होतील आणि मग याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला आणि तुमच्या हाताच्या कार्याला आशीर्वादित करतील.

  16. अनुवाद १५:१सुमारे इ.स.पू. १४५१

    प्रत्येक सातव्या वर्षाच्या शेवटी सर्व कर्ज माफ करावे.

  17. अनुवाद १५:२सुमारे इ.स.पू. १४५१

    कर्जमाफीची प्रक्रिया अशी असावी: प्रत्येक सावकाराने आपल्याजवळ असलेल्या कोणाही इस्राएली बंधूचे कर्ज माफ करावे. त्यांना स्वतःच्या लोकांपैकी कोणाकडूनही पैसे घ्यावे लागणार नाहीत, कारण कर्जाची फेड करण्याची वेळ याहवेहने घोषित केली आहे.

  18. अनुवाद १५:३सुमारे इ.स.पू. १४५१

    परदेशी पासून असलेले कर्ज तुम्हाला वसूल करता येईल, परंतु तुमच्याच बांधवांची देणी तुम्ही मुळीच वसूल करू नयेत.

  19. अनुवाद १५:४सुमारे इ.स.पू. १४५१

    तरीसुद्धा तुमच्यात कोणीही दरिद्री असा राहू नये, कारण याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला वतनादाखल देऊ केलेल्या या देशात भरपूर आशीर्वाद देतील,

  20. अनुवाद १५:५सुमारे इ.स.पू. १४५१

    जर तुम्ही पूर्णपणे याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञेत राहाल आणि आज मी तुम्हाला देत असलेल्या या सर्व आज्ञा काळजीपूर्वक पाळाल तरच.

  21. अनुवाद १५:६सुमारे इ.स.पू. १४५१

    कारण याहवेह तुमच्या परमेश्वराने अभिवचन दिल्याप्रमाणे ते तुम्हाला आशीर्वाद देतील आणि तुम्ही अनेक राष्ट्रांना कर्ज द्याल पण तुम्ही मात्र कर्ज घेणार नाही. तसेच तुम्ही अनेक राष्ट्रांवर राज्य कराल, पण ती राष्ट्रे तुम्हावर राज्य करणार नाहीत.

  22. अनुवाद १५:७सुमारे इ.स.पू. १४५१

    परंतु याहवेह तुमचे परमेश्वर जो देश तुम्हाला देत आहेत, त्यातील कोणत्याही नगरात कोणी इस्राएली बांधव गरीब असेल, तर त्यांच्याकरिता तुमचे हृदय कठोर करू नका किंवा तुमची मूठ बांधून ठेऊ नका.

  23. अनुवाद १५:८सुमारे इ.स.पू. १४५१

    त्यांना गरज लागेल तितके तुम्ही त्यांना उदारमनाने व निर्व्याज उसने द्यावे.

  24. अनुवाद १५:९सुमारे इ.स.पू. १४५१

    हा दुष्ट विचार मनात न आणण्याची खबरदारी घ्या: “कर्जमाफी करण्याचे सातवे वर्ष जवळ आले आहे.” म्हणून तुम्ही एखाद्या इस्राएली बांधवाबद्दल वाईट इच्छा दाखवू नका आणि मदत नाकारू नका. जर तो याहवेहकडे आपले गार्‍हाणे घेऊन गेला, तर ते तुमच्याविरुद्ध पाप असे मोजण्यात येईल.

  25. अनुवाद १५:१०सुमारे इ.स.पू. १४५१

    तुम्ही त्यांना उदारपणे दिले पाहिजे आणि त्याबद्दल तुम्ही अंतःकरणात कुरकुर करू नये; मग तुम्ही जे काही कराल आणि जे कार्य हातात घ्याल त्यात याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करतील.