- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1446–1406 BC
The Wilderness Years
Forty years of wandering in the desert test Israel's faith and prepare a new generation to enter the promised land.
या कालखंडातील वचने
- अनुवाद १६:१३सुमारे इ.स.पू. १४५१
तुमच्या खळ्यातील आणि द्राक्षकुंडातील उत्पादन तुम्ही गोळा केल्यानंतर सात दिवस मंडपाचा सण साजरा करा.
- अनुवाद १६:१४सुमारे इ.स.पू. १४५१
आनंदोत्सव साजरा करण्यास—तुम्ही, तुमचे पुत्र व कन्या, तुमचे दास व दासी, तुमच्या नगरातील लेवी, परदेशी, तुमच्यामध्ये राहणारे अनाथ आणि विधवा यांनाही उत्सवात सामील करून घ्यावे.
- अनुवाद १६:१५सुमारे इ.स.पू. १४५१
हा सण सात दिवस याहवेह तुमचे परमेश्वर जे स्थान निवडतील तिथे साजरा करावा. कारण याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला तुमच्या सर्व उत्पन्नात आणि हाती घेतलेल्या तुमच्या कामात आशीर्वादित केले यास्तव तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा.
- अनुवाद १६:१६सुमारे इ.स.पू. १४५१
वर्षातून तीन वेळा तुमच्या सर्व पुरुषांनी याहवेह तुमच्या परमेश्वरासमोर हजर व्हावे: बेखमीर भाकरीचा सण, सप्ताहांचा सण व मंडपांचा सण. या प्रत्येक प्रसंगी याहवेहसमोर रिक्तहस्ते येऊ नये:
- अनुवाद १६:१७सुमारे इ.स.पू. १४५१
याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला ज्याप्रकारे आशीर्वादित केले आहे, त्या प्रमाणात तुम्ही प्रत्येकाने भेटवस्तू आणावी.
- अनुवाद १६:१८सुमारे इ.स.पू. १४५१
याहवेह तुमचे परमेश्वर जी सर्व शहरे तुमच्या प्रत्येक गोत्राला देणार आहेत, त्या सर्व शहरांमध्ये न्यायाधीश आणि शास्ते यांची तुम्ही नेमणूक करावी व त्यांनी लोकांचा न्याय नीतीने करावा.
- अनुवाद १६:१९सुमारे इ.स.पू. १४५१
भेदभाव किंवा विपरीत असा न्याय कधीही करू नये. लाच घेऊ नये, कारण लाच ही शहाण्या माणसांना आंधळे करते आणि निरपराध्याचे शब्द विपरीत करते.
- अनुवाद १६:२०सुमारे इ.स.पू. १४५१
न्याय आणि केवळ न्यायाचीच कास तुम्ही धरावी, जेणेकरून याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला देणार असलेल्या देशाचा ताबा घेऊन तुम्ही तिथे वस्ती करू शकाल.
- अनुवाद १६:२१सुमारे इ.स.पू. १४५१
याहवेह तुमच्या परमेश्वराच्या वेदीशेजारी तुम्ही अशेरा मूर्तीचे लाकडी स्तंभ उभारू नका,
- अनुवाद १६:२२सुमारे इ.स.पू. १४५१
आणि पूजास्तंभ उभारू नयेत, कारण याहवेह तुमच्या परमेश्वराला त्यांचा अत्यंत तिटकारा आहे.
- अनुवाद १७:१सुमारे इ.स.पू. १४५१
तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराला दोष अथवा व्यंग असलेला बैल किंवा मेंढरू यांचे अर्पण कदापि करू नये; कारण त्याचा त्यांना वीट आहे.
- अनुवाद १७:२सुमारे इ.स.पू. १४५१
समजा याहवेहने तुम्हाला दिलेल्या देशातील एखाद्या नगरात तुमच्यातील कोणी पुरुष अथवा स्त्री याहवेह तुमच्या परमेश्वराच्या कराराविरुद्ध त्यांच्या दृष्टीने पातक करेल,
- अनुवाद १७:३सुमारे इ.स.पू. १४५१
आणि त्यांनी माझ्या आज्ञेच्या विरुद्ध अन्य दैवतांची उपासना केली, त्यांना किंवा सूर्य किंवा चंद्र किंवा आकाशातील तारे यांना नमन केले,
- अनुवाद १७:४सुमारे इ.स.पू. १४५१
आणि हे तुमच्या कानी आले, तर ही गोष्ट खरी आहे की नाही याची तुम्ही प्रथम काळजीपूर्वक खात्री करून घ्यावी. इस्राएलात ही घृणास्पद गोष्ट घडली आहे व हे सत्य आहे असे निश्चित झाल्यावर,
- अनुवाद १७:५सुमारे इ.स.पू. १४५१
ही घृणास्पद गोष्ट करणार्या त्या पुरुषाला अथवा स्त्रीला नगराच्या वेशीजवळ घेऊन जावे आणि त्या व्यक्तीला मरेपर्यंत धोंडमार करावा.
- अनुवाद १७:६सुमारे इ.स.पू. १४५१
दोन किंवा तीन साक्षीदारांच्या साक्षीवर एखाद्याला मृत्यू दंड द्यावे लागते, परंतु केवळ एका साक्षीदाराच्या साक्षीवर कोणालाही मृत्यू दंड देऊ नये.
- अनुवाद १७:७सुमारे इ.स.पू. १४५१
ही धोंडमार करण्यासाठी जे साक्षीदार आहेत, त्यांनी प्रथम त्या मनुष्याला दगडमार करावा आणि नंतर इतरांनी त्यात सहभागी व्हावे. अशा रीतीने तुमच्यामधून दुष्टाई घालवून तुम्ही स्वतःला शुद्ध करून घ्यावे.
- अनुवाद १७:८सुमारे इ.स.पू. १४५१
तुमच्या न्यायालयात खटले येतात, ज्यांचा निवाडा करण्याचे काम तुमच्या आवाक्याबाहेरचे असेल—मग ते रक्तपात असो, फिर्याद अथवा मारामारी असोत—याहवेह तुमच्या परमेश्वराने निवडलेल्या स्थानी तुम्ही तो वाद न्यावा.
- अनुवाद १७:९सुमारे इ.स.पू. १४५१
त्याकाळी जे लेवी याजक किंवा न्यायाधीश आपल्या पदावर असतील, त्यांच्याशी तुम्ही मसलत करावी आणि ते त्या वादाचा निर्णय तुम्हाला देतील.
- अनुवाद १७:१०सुमारे इ.स.पू. १४५१
ते आपला निर्णय देतील आणि ते सांगतील त्याप्रमाणे अगदी तंतोतंत तुम्ही करावे. याहवेहने निवडलेल्या स्थानी त्यांनी दिलेला निर्णय तुम्ही अगदी तंतोतंत पाळावा. त्यांनी तुम्हाला जे काही करण्यास सांगितले आहे ते सर्व करण्याची काळजी घ्या.
- अनुवाद १७:११सुमारे इ.स.पू. १४५१
ते तुम्हाला जे काही शिकवतील व जो निर्णय ते देतील, त्याच्या उजवीकडे वा डावीकडे न वळता, तो अंमलात आणावा.
- अनुवाद १७:१२सुमारे इ.स.पू. १४५१
याहवेह तुमच्या परमेश्वराने निवडलेला, त्यावेळी पदावर असलेल्या न्यायाधीशाचा अथवा याजकांचा निर्णय न पाळण्याचे धाडस जो कोणी करेल, त्याला मृत्यूची शिक्षा दिली जावी. अशा रीतीने इस्राएलातून तुम्हाला ही दुष्टाई काढून टाकता येईल.
- अनुवाद १७:१३सुमारे इ.स.पू. १४५१
हे सर्व लोक ऐकतील व भयभीत होतील आणि पुढे ते उन्मत्तपणा करणार नाहीत.
- अनुवाद १७:१४सुमारे इ.स.पू. १४५१
याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला देणार असलेल्या देशात तुम्ही याल व तो ताब्यात घ्याल आणि स्वतःशी म्हणाल, “इतर राष्ट्रांना जसा राजा आहे तसा आपल्यालाही असावा,”
- अनुवाद १७:१५सुमारे इ.स.पू. १४५१
तर ज्या माणसाची याहवेह तुमचे परमेश्वर निवड करतील, त्यालाच तुम्ही राजा म्हणून नेमावे. तो तुमच्या भाऊबंदांपैकी असावा; परदेशीयाला म्हणजे इस्राएली पैकी नसलेल्यास तुम्ही राजा म्हणून नेमू नये.