मुख्य मजकुरावर जा

circa 1446–1406 BC

The Wilderness Years

Forty years of wandering in the desert test Israel's faith and prepare a new generation to enter the promised land.

2,247 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. अनुवाद ११:२२सुमारे इ.स.पू. १४९१

    मी तुम्हाला देत असलेल्या या सर्व आज्ञा तुम्ही काळजीपूर्वक पाळाल—याहवेह तुमच्या परमेश्वरावर प्रीती कराल, आज्ञाधारकपणे त्यांच्या मार्गावर चालत राहाल आणि त्यांना बिलगून राहाल—

  2. अनुवाद ११:२३सुमारे इ.स.पू. १४९१

    तर याहवेह या सर्व राष्ट्रांना तुमच्यापुढून घालवून देतील आणि तुमच्यापेक्षा कितीही मोठी आणि बलवान राष्ट्र असोत, तुम्ही त्यांना आपल्या ताब्यात घ्याल.

  3. अनुवाद ११:२४सुमारे इ.स.पू. १४९१

    तुम्ही जिथे पाऊल ठेवाल, ती प्रत्येक भूमी तुमची होईल: तुमच्या देशाची सीमा दक्षिणेकडील नेगेव प्रांतापासून लबानोन देशापर्यंत व फरात नदीपासून भूमध्य समुद्रापर्यंत पसरेल.

  4. अनुवाद ११:२५सुमारे इ.स.पू. १४९१

    तुमच्याविरुद्ध कोणीही उभे राहू शकणार नाही. कारण याहवेह तुमच्या परमेश्वराने वचन दिल्याप्रमाणे, तुम्ही जाल त्या ठिकाणी तुम्हाविषयी तेथील लोकात ते भय आणि दहशत निर्माण करतील.

  5. अनुवाद ११:२६सुमारे इ.स.पू. १४९१

    पाहा, मी आज तुमच्यापुढे आशीर्वाद व शाप ठेवीत आहे—

  6. अनुवाद ११:२७सुमारे इ.स.पू. १४९१

    याहवेह तुमच्या परमेश्वराच्या ज्या आज्ञा आज मी तुम्हाला देणार आहे, त्या जर तुम्ही पाळल्या, तर तुम्हाला आशीर्वाद मिळेल;

  7. अनुवाद ११:२८सुमारे इ.स.पू. १४९१

    आणि याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञा न मानल्यास, आज मी तुम्हाला ज्या मार्गाने जाण्याची आज्ञा देत आहे त्यापासून भटकून जाल आणि जी दैवते तुम्हाला माहीत नाहीत अशांचे अनुसरण करण्यास सुरुवात कराल, तर तुम्हाला शाप मिळेल.

  8. अनुवाद ११:२९सुमारे इ.स.पू. १४९१

    याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला जेव्हा या देशाचा ताबा घेण्यासाठी आणतील, तेव्हा तुम्ही गरिज्जीम डोंगरावरून आशीर्वाद आणि एबाल डोंगरावरून शाप उच्चारावा.

  9. अनुवाद ११:३०सुमारे इ.स.पू. १४९१

    तुम्ही जाणता, हे डोंगर यार्देन नदीच्या पश्चिमेला असलेल्या कनानी लोकांच्या देशात आहेत. कनानी लोक जे अराबात गिलगाल या शहराजवळ असलेल्या ओसाड भागात राहतात. हे ठिकाण मोरेहच्या जवळील एला वृक्षांच्या राईपासून दूर नाही.

  10. अनुवाद ११:३१सुमारे इ.स.पू. १४९१

    तुम्ही यार्देन नदी ओलांडून याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला देत असलेला देश काबीज करण्यास जात आहात. तुम्ही तो ताब्यात घ्याल आणि तिथे वस्ती कराल,

  11. अनुवाद ११:३२सुमारे इ.स.पू. १४९१

    पण मी आज तुमच्यासमोर ठेवत असलेल्या सर्व विधी व नियम पाळण्याची खबरदारी तुम्ही घेतली पाहिजे.

  12. अनुवाद १२:१सुमारे इ.स.पू. १४५१

    याहवेह तुमच्या पूर्वजांच्या परमेश्वराने जो देश तुम्हाला ताब्यात घ्यावयास दिला आहे—तिथे तुम्ही या पृथ्वीवर जिवंत असेपर्यंत हे विधी व नियम काळजीपूर्वकपणे पाळावेत.

  13. अनुवाद १२:२सुमारे इ.स.पू. १४५१

    ज्या राष्ट्रांना तुम्ही ताब्यात घेणार आहात तेथील उंच पर्वतांवर, टेकड्यांवरील आणि प्रत्येक घनदाट पसरलेल्या झाडाखाली जे त्या दैवतांची उपासना करतात ती सर्व ठिकाणे पूर्णपणे नष्ट करा.

  14. अनुवाद १२:३सुमारे इ.स.पू. १४५१

    तुम्ही त्यांच्या वेद्या पाडून टाकाव्या, त्यांचे पवित्र दगड फोडून टाकावे, त्यांचे अशेरास्तंभ अग्नीत जाळून टाकावे, त्यांच्या दैवतांच्या कोरीव मूर्ती फोडून टाकाव्या आणि त्या ठिकाणातून त्यांची नावे पुसून टाकावी.

  15. अनुवाद १२:४सुमारे इ.स.पू. १४५१

    याहवेह तुमच्या परमेश्वराची उपासना त्यांच्या पद्धतीने करू नका.

  16. अनुवाद १२:५सुमारे इ.स.पू. १४५१

    उलट, तुमच्या सर्व गोत्रांच्या जागेतून याहवेह तुमचे परमेश्वर निवडील व त्या जागेला ते स्वतःचे नाव देतील, त्या ठिकाणी तुम्ही जावे;

  17. अनुवाद १२:६सुमारे इ.स.पू. १४५१

    तिथेच तुम्ही आपली होमार्पणे, यज्ञार्पणे, तुमचे दशांश व विशेष भेटी, नवस फेडण्यासाठी आणलेली अर्पणे आणि तुमची स्वेच्छार्पणे आणि तुमच्या गुरांची व शेरडामेंढरांची प्रथम वत्सांची अर्पणे आणावीत.

  18. अनुवाद १२:७सुमारे इ.स.पू. १४५१

    त्या ठिकाणी याहवेह तुमच्या परमेश्वराच्या सान्निध्यात तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाने भोजन करावे आणि तुम्ही हातात घेतलेल्या प्रत्येक गोष्टीत आनंद कराल, कारण याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला आशीर्वादित केले आहे.

  19. अनुवाद १२:८सुमारे इ.स.पू. १४५१

    आजपर्यंत तुम्ही तुमच्या मनाला योग्य वाटेल त्याप्रमाणे वागत आला आहात, पण आता तसे करता येणार नाही,

  20. अनुवाद १२:९सुमारे इ.स.पू. १४५१

    कारण याहवेह तुमच्या परमेश्वरांनी दिलेल्या विश्रामस्थानी आणि वचनदत्त ठिकाणी अजून तुम्ही पोहोचला नाही.

  21. अनुवाद १२:१०सुमारे इ.स.पू. १४५१

    पण तुम्ही यार्देन नदी पार करून याहवेह तुमच्या परमेश्वराने दिलेल्या वचनदत्त देशात राहू लागाल तेव्हा ते तुमच्या सभोवती असलेल्या सर्व शत्रूपासून सुरक्षित ठेवून तुम्हाला विश्रांती देतील.

  22. अनुवाद १२:११सुमारे इ.स.पू. १४५१

    तेव्हाच तुम्ही तुमची सर्व होमार्पणे, यज्ञार्पणे, दशांश, नवसाची अर्पणे व स्वेच्छार्पणे—याहवेह तुमचे परमेश्वर स्वतःच्या नावाचे निवासस्थान म्हणून ज्या ठिकाणाची निवड करतील तिथे आणावीत.

  23. अनुवाद १२:१२सुमारे इ.स.पू. १४५१

    आणि त्या ठिकाणी तुम्ही, तुमचे पुत्र आणि कन्या, तुमचे दास व दासी आणि तुमच्या नगरातील लेवी, ज्यांना स्वतःचा कोणताही वाटा किंवा वतन नाही, या सर्वांसह—याहवेह तुमच्या परमेश्वरासमोर आनंदोत्सव करावा.

  24. अनुवाद १२:१३सुमारे इ.स.पू. १४५१

    तुमची होमार्पणे तुम्ही इतर कुठेही अर्पण करणार नाही याची खबरदारी घ्या.

  25. अनुवाद १२:१४सुमारे इ.स.पू. १४५१

    तुमच्या एका गोत्रातील याहवेहने नेमून दिलेल्या ठिकाणीच तुमचे होमबली अर्पावेत आणि मी तुम्हाला जे आज्ञापिले ते सर्वकाही करावे.