- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1446–1406 BC
The Wilderness Years
Forty years of wandering in the desert test Israel's faith and prepare a new generation to enter the promised land.
या कालखंडातील वचने
- अनुवाद ८:१८सुमारे इ.स.पू. १४५१
परंतु याहवेह तुमच्या परमेश्वराचे स्मरण ठेवा, कारण संपत्ती निर्माण करण्याचे सामर्थ्य केवळ तेच तुम्हाला पुरवितात, आणि आजच्या प्रमाणेच ते तुमच्या पूर्वजांशी शपथपूर्वक केलेल्या कराराची पुष्टी करतात.
- अनुवाद ८:१९सुमारे इ.स.पू. १४५१
परंतु जर तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराला विसराल, त्यांना सोडून इतर दैवतांच्या मागे लागाल आणि त्यांची उपासना कराल व त्यांना नमन कराल, तर आज मी तुमच्याविरुद्ध साक्ष देतो की, तुम्ही खात्रीने नाश पावाल.
- अनुवाद ८:२०सुमारे इ.स.पू. १४५१
याहवेहने इतर राष्ट्रांचा तुमच्यापुढे जसा नाश केला, तसाच याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञांचे पालन केले नाही तर तुमचाही नाश होईल.
- अनुवाद ९:१सुमारे इ.स.पू. १४५१
हे इस्राएला, ऐक: तुम्ही आता यार्देन पार करून पलीकडे आत जाणार आहात आणि ज्यांच्या शहरांची तटबंदी आकाशापर्यंत आहेत, अशा तुमच्यापेक्षा महान आणि अधिक बलवान लोकांना हाकलून देणार आहात.
- अनुवाद ९:२सुमारे इ.स.पू. १४५१
तेथील लोक धिप्पाड व उंच आहेत—अनाकी वंशज! तुम्हाला त्यांच्याबद्दल माहीत आहे आणि तुम्ही हे ऐकले आहे: “अनाकी लोकांविरुद्ध कोण उभे राहू शकेल?”
- अनुवाद ९:३सुमारे इ.स.पू. १४५१
पण तुमची खात्री असू द्या की, याहवेह तुमचे परमेश्वर भस्म करणार्या अग्निरुपाने तुमच्यापुढे जातील. ते त्यांचा नाश करतील; त्यांना तुमच्यापुढे नमवतील आणि तुमच्यासमोर त्यांचा नायनाट करतील, मग याहवेहने दिलेल्या अभिवचनानुसार तुम्ही त्यांना लगेच संपूर्ण नष्ट कराल आणि त्यांना तिथून घालवून द्याल.
- अनुवाद ९:४सुमारे इ.स.पू. १४५१
याहवेह तुमच्या परमेश्वराने त्यांना तुमच्यापुढून घालवून दिल्यानंतर स्वतःशी म्हणू नका, “मी नीतिमान आहे, म्हणूनच याहवेहने हा देश वतन म्हणून घेण्यास मला मदत केली.” नाही! तसे मुळीच नाही, तर या राष्ट्रांच्या दुष्टपणामुळेच याहवेह त्यांना तुमच्यापुढून घालवून देत आहेत.
- अनुवाद ९:५सुमारे इ.स.पू. १४५१
तुम्ही नीतिमान आणि सरळ मनाचे लोक आहात म्हणून याहवेह तुम्हाला त्यांचा देश ताब्यात देतील असे मुळीच नाही; मी पुन्हा सांगतो की याहवेह तुमचे परमेश्वर हे केवळ त्या राष्ट्रांच्या दुष्टपणामुळेच व त्यांनी तुमचे पूर्वज अब्राहाम, इसहाक व याकोब यांना जी शपथ दिली होती, ती पूर्ण करण्यासाठीच ते त्या राष्ट्रांना तुमच्यापुढून घालवून देतील.
- अनुवाद ९:६सुमारे इ.स.पू. १४५१
आणि हे जाणून घ्या, याहवेह तुमचे परमेश्वर, तुम्ही नीतिमान आहात म्हणून हा उत्तम देश तुम्हाला वतन म्हणून देत नाहीत, खरेतर तुम्ही ताठ मानेचे लोक आहात.
- अनुवाद ९:७सुमारे इ.स.पू. १४५१
तुम्ही त्या रानात याहवेह तुमच्या परमेश्वराला राग येईल असे वागलात, हे तुम्ही विसरू नका आणि याची नेहमी आठवण ठेवा. ज्या दिवशी तुम्ही इजिप्त देश सोडला त्या दिवसापासून या ठिकाणी येईपर्यंत, तुम्ही याहवेहविरुद्ध सतत बंड केले.
- अनुवाद ९:८सुमारे इ.स.पू. १४५१
होरेब पर्वतावर तुम्ही त्यांना इतके संतप्त केले की याहवेह तुमचा नाश करणारच होते.
- अनुवाद ९:९सुमारे इ.स.पू. १४५१
याहवेहने तुमच्याशी केलेल्या कराराच्या दगडी पाट्या स्वीकारण्यासाठी मी त्या पर्वतावर चढून गेलो होतो. तिथे मी चाळीस दिवस व चाळीस रात्री होतो; त्या काळात मी भाकर खाल्ली नाही आणि पाणीदेखील प्यालो नाही.
- अनुवाद ९:१०सुमारे इ.स.पू. १४५१
याहवेहने दोन दगडी पाट्या मला दिल्या, ज्यावर परमेश्वराच्या बोटाने लिहिलेले होते. तुम्ही पर्वताच्या पायथ्याशी गोळा झालेले होता, त्यावेळी याहवेहने तुमच्याशी बोलताना पर्वतावर अग्नीतून सांगितलेल्या सर्व आज्ञा त्यावर होत्या.
- अनुवाद ९:११सुमारे इ.स.पू. १४५१
चाळीस दिवस व चाळीस रात्री लोटल्यानंतर, याहवेहने कराराच्या दोन दगडी पाट्या मला दिल्या.
- अनुवाद ९:१२सुमारे इ.स.पू. १४५१
मग याहवेह मला म्हणाले, “ताबडतोब येथून उतरून खाली जा, कारण तुझे लोक, ज्यांना तू इजिप्त देशातून बाहेर काढून आणले, ते भ्रष्ट झाले आहेत. मी त्यांना जे करण्याची आज्ञा दिलेली होती, त्यापासून बहकून त्यांनी स्वतःसाठी ओतीव मूर्ती तयार केली आहे.”
- अनुवाद ९:१३सुमारे इ.स.पू. १४५१
याहवेह मला म्हणाले, “मी या लोकांना ओळखतो, हे ताठ मानेचे लोक आहेत.
- अनुवाद ९:१४सुमारे इ.स.पू. १४५१
तू माझ्या आड येऊ नकोस, मी या लोकांचा नाश करेन आणि त्यांचे नाव पृथ्वीवरून पुसून टाकेन आणि त्यांच्याहीपेक्षा अधिक बलवान व बहुगुणित असे राष्ट्र मी तुझ्यापासून बनवीन.”
- अनुवाद ९:१५सुमारे इ.स.पू. १४५१
नंतर मी मागे वळलो आणि पर्वतावरून खाली उतरत असताना पर्वत अग्नीने जळत होता आणि त्या कराराच्या दोन पाट्या माझ्या हातात होत्या.
- अनुवाद ९:१६सुमारे इ.स.पू. १४५१
जेव्हा मी पाहिले की, याहवेह तुमच्या परमेश्वराविरुद्ध तुम्ही पाप केले आहे; तुम्ही तुमच्यासाठी वासराची ओतीव मूर्ती घडविली, असे माझ्या दृष्टीस पडले. याहवेहनी दिलेल्या आज्ञा पाळण्याचे सोडून तुम्ही किती लवकर पथभ्रष्ट झालात.
- अनुवाद ९:१७सुमारे इ.स.पू. १४५१
तेव्हा मी त्या दोन दगडी पाट्या घेतल्या आणि माझ्या हातांतून फेकून, तुमच्या डोळ्यादेखत त्यांचा चुराडा केला.
- अनुवाद ९:१८सुमारे इ.स.पू. १४५१
नंतर आणखी चाळीस दिवस व चाळीस रात्री मी याहवेहपुढे पालथा पडून राहिलो; मी भाकर खाल्ली नाही आणि पाणीदेखील प्यालो नाही, कारण याहवेहच्या दृष्टीने वाईट आहे, तेच पाप तुम्ही करून त्यांचा क्रोध भडकाविला होता.
- अनुवाद ९:१९सुमारे इ.स.पू. १४५१
मला याहवेहच्या रागाची आणि क्रोधाची भीती वाटली, कारण ते तुमचा नाश करण्याइतके रागावले होते. परंतु त्यावेळी सुद्धा याहवेहने माझे ऐकले.
- अनुवाद ९:२०सुमारे इ.स.पू. १४५१
आणि याहवेह अहरोनवर अत्यंत संतप्त झाले व त्याचा नाश करणार होते, परंतु मी त्याच्यासाठी देखील प्रार्थना केली.
- अनुवाद ९:२१सुमारे इ.स.पू. १४५१
मी तुमचे पापकृत्य, म्हणजे जे वासरू तुम्ही बनविले होते ते घेतले आणि अग्नीत जाळून त्याची कुटून धुळीसारखी बारीक पूड केली आणि ती धूळ डोंगरातून वाहणार्या ओहोळात फेकून दिली.
- अनुवाद ९:२२सुमारे इ.स.पू. १४५१
पुन्हा तबेरा येथे, मस्सा येथे आणि किब्रोथ-हत्ताव्वा येथेही तुम्ही याहवेहला संतप्त केले.