मुख्य मजकुरावर जा

circa 1446–1406 BC

The Wilderness Years

Forty years of wandering in the desert test Israel's faith and prepare a new generation to enter the promised land.

2,247 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. अनुवाद ६:१९सुमारे इ.स.पू. १४५१

    याहवेहने सांगितल्याप्रमाणे तुमच्या सर्व शत्रूंना तुमच्यापुढून घालवून द्या.

  2. अनुवाद ६:२०सुमारे इ.स.पू. १४५१

    भविष्यात जेव्हा तुमचा पुत्र तुम्हाला विचारेल, “याहवेह आपल्या परमेश्वराने या आज्ञा, ही बोधवचने, विधी व नियम तुम्हाला दिले आहेत, त्यांचा अर्थ काय?”

  3. अनुवाद ६:२१सुमारे इ.स.पू. १४५१

    तेव्हा तुम्ही त्यांना सांगा: “आम्ही इजिप्त देशात फारोहचे गुलाम होतो, परंतु याहवेहने आपल्या पराक्रमी हाताने आम्हाला इजिप्तमधून बाहेर आणले.

  4. अनुवाद ६:२२सुमारे इ.स.पू. १४५१

    आमच्या नजरेसमोर याहवेहने इजिप्त देश, फारोह राजा आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाविरुद्ध—महान व भयावह—चिन्हे दाखविली व चमत्कार केले.

  5. अनुवाद ६:२३सुमारे इ.स.पू. १४५१

    त्यांनी आम्हाला इजिप्तमधून यासाठी बाहेर आणले की, आमच्या पूर्वजांना जो देश देण्याचे त्यांनी शपथपूर्वक वचन दिले होते, त्या देशात आम्हाला आणावे.

  6. अनुवाद ६:२४सुमारे इ.स.पू. १४५१

    याहवेहने आम्हाला सर्व नियम पाळण्याची आज्ञा दिली आणि याहवेह आपल्या परमेश्वराचे भय बाळगावे, जेणेकरून आपले निरंतर कल्याण व्हावे आणि स्वतःस जिवंत राखावे, जसे आजवर आहोत.

  7. अनुवाद ६:२५सुमारे इ.स.पू. १४५१

    आणि जर आपण याहवेह आपल्या परमेश्वरासमोर दिलेल्या आज्ञेप्रमाणे या सर्व नियमांचे काळजीपूर्वक पालन केले, तर ते आपले नीतिमत्व असेल.”

  8. अनुवाद ७:१सुमारे इ.स.पू. १४५१

    जेव्हा याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला त्या देशात घेऊन जातील, ज्याचा ताबा मिळविण्यासाठी तुम्ही जात आहात आणि तुमच्यापुढून—हिथी, गिर्गाशी, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी या तुमच्यापेक्षा मोठ्या आणि बलाढ्य सात राष्ट्रांना हाकलून देतील—

  9. अनुवाद ७:२सुमारे इ.स.पू. १४५१

    आणि जेव्हा याहवेह तुमचे परमेश्वर त्यांना तुमच्या हाती देतील आणि तुम्ही त्यांचा पराभव कराल, तेव्हा तुम्ही त्यांचा समूळ नायनाट करा. त्यांच्याशी कुठलाही करार करू नका किंवा त्यांना दया दाखवू नका.

  10. अनुवाद ७:३सुमारे इ.स.पू. १४५१

    तुम्ही त्यांच्याशी आंतरविवाह करू नका, तुमच्या कन्या त्यांच्या पुत्रांसाठी देऊ नका किंवा त्यांच्या कन्या तुमच्या पुत्रांसाठी घेऊ नका,

  11. अनुवाद ७:४सुमारे इ.स.पू. १४५१

    कारण ते तुमच्या मुलांना माझे अनुसरण करण्यापासून परावृत्त करून इतर दैवतांची उपासना करण्यासाठी प्रवृत्त करतील आणि याहवेहचा क्रोध तुम्हावर भडकेल आणि ते लगेच तुमचा नाश करतील.

  12. अनुवाद ७:५सुमारे इ.स.पू. १४५१

    तुम्ही त्यांच्या बाबतीत हे करा: त्यांच्या वेद्या मोडून टाका, त्यांच्या पवित्र पाषाणांचा चुरा करा, त्यांचे अशेराचे स्तंभ तोडून टाका आणि त्यांच्या मूर्ती अग्नीत जाळून टाका.

  13. अनुवाद ७:६सुमारे इ.स.पू. १४५१

    कारण तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराचे पवित्रजन आहात. संपूर्ण पृथ्वीवरील सर्व लोकातून याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला अशासाठी निवडले आहे की, तुम्ही त्यांचा खूप मोलाचा ठेवा असावा.

  14. अनुवाद ७:७सुमारे इ.स.पू. १४५१

    तुम्ही संख्येने अधिक होता म्हणून याहवेहने तुमची निवड केली नाही व तुमच्यावर प्रीती केली नाही, कारण तुम्ही तर सर्व राष्ट्रांमध्ये संख्येने अतिशय अल्प होता.

  15. अनुवाद ७:८सुमारे इ.स.पू. १४५१

    पण याहवेहची तुमच्यावर प्रीती असल्यामुळे आणि त्यांनी तुमच्या पूर्वजांना दिलेली शपथ पाळावयाची होती, म्हणून त्यांनी तुम्हाला सामर्थ्यशाली हाताने बाहेर काढले आणि इजिप्तचा राजा फारोहच्या दास्यगृहातून तुम्हाला सोडविले.

  16. अनुवाद ७:९सुमारे इ.स.पू. १४५१

    म्हणून हे जाणून घ्या की, याहवेहच तुमचे परमेश्वर आहेत; ते विश्वासू परमेश्वर आहेत, जे त्यांच्यावर प्रीती करतात आणि त्यांच्या आज्ञा पाळतात, अशांच्या हजारो पिढ्यांपर्यंत ते आपल्या प्रीतीचा करार पाळतात.

  17. अनुवाद ७:१०सुमारे इ.स.पू. १४५१

    परंतु जे त्यांचा द्वेष करतात, त्यांना ते नष्ट करण्यास संकोच करणार नाहीत; जे त्यांची घृणा करतात, त्यांची ते परतफेड करण्यास विलंब लावणार नाही.

  18. अनुवाद ७:११सुमारे इ.स.पू. १४५१

    यास्तव, मी आज तुम्हाला देत आहे त्या सर्व आज्ञा, विधी व नियम पाळण्याची तुम्ही खबरदारी घ्या.

  19. अनुवाद ७:१२सुमारे इ.स.पू. १४५१

    तुम्ही या आज्ञा ऐकून त्या प्रामाणिकपणे पाळल्या, तर याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्या पूर्वजांना दिलेल्या अभिवचनाप्रमाणे हा प्रीतीचा करार पुढेही पाळीत राहतील.

  20. अनुवाद ७:१३सुमारे इ.स.पू. १४५१

    ते तुम्हावर प्रीती करतील, तुम्हाला आशीर्वाद देतील आणि तुम्हाला बहुगुणित करतील. तुमच्या पूर्वजांना देऊ केलेल्या वचनदत्त देशात ते तुमच्या पोटच्या फळाला, तुमच्या जमिनीतील पीक—तुमच्या धान्याला, नव्या द्राक्षारसाला, जैतुनाच्या तेलाला—तुमच्या गुरांची वासरे आणि तुमच्या कळपातील कोकरे यांनाही ते आशीर्वाद देतील.

  21. अनुवाद ७:१४सुमारे इ.स.पू. १४५१

    तुम्ही इतर लोकांपेक्षा अधिक आशीर्वादित व्हाल; तुमच्यापैकी कोणीही पुरुष वा स्त्री निःसंतान राहणार नाही किंवा तुमच्या पशूंपैकी कोणीही वांझ राहणार नाही.

  22. अनुवाद ७:१५सुमारे इ.स.पू. १४५१

    याहवेह तुमच्यातील सर्व रोग दूर करतील. इजिप्तमधील तुम्हाला माहीत असलेले भयंकर रोग ते तुमच्यावर आणणार नाहीत, तर तुमचा द्वेष करणार्‍या सर्वांवर ते रोग आणतील.

  23. अनुवाद ७:१६सुमारे इ.स.पू. १४५१

    याहवेह तुमचे परमेश्वर जे सर्व देश तुमच्या हाती देतील, त्यांचा तुम्ही पूर्णपणे संहार करावा. त्यांना दयामाया दाखवू नका व त्यांच्या दैवतांची सेवा करू नका. कराल, तर ते तुमच्यासाठी सापळा असे होईल.

  24. अनुवाद ७:१७सुमारे इ.स.पू. १४५१

    तुम्ही स्वतःशी म्हणाल, “ही राष्ट्रे आमच्यापेक्षा कितीतरी सामर्थ्यवान आहेत. आम्ही त्यांना कसे काय घालवून देऊ?”

  25. अनुवाद ७:१८सुमारे इ.स.पू. १४५१

    परंतु त्यांना भिऊ नका; याहवेह तुमच्या परमेश्वराने फारोहचे आणि संपूर्ण इजिप्त देशाचे काय केले याचे चांगले स्मरण ठेवा.