- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1446–1406 BC
The Wilderness Years
Forty years of wandering in the desert test Israel's faith and prepare a new generation to enter the promised land.
या कालखंडातील वचने
- अनुवाद ५:२७सुमारे इ.स.पू. १४५१
तेव्हा तुम्ही याहवेह आमच्या परमेश्वराजवळ जा आणि ते जे सांगतील ते सर्व ऐका. मग याहवेह आमच्या परमेश्वराने तुम्हाला जे काही सांगितले आहे ते आम्हाला सांगा. आम्ही ऐकू आणि त्याचे पालन करू.”
- अनुवाद ५:२८सुमारे इ.स.पू. १४५१
तुम्हाला माझ्याशी बोलताना याहवेहनी ऐकले आणि याहवेह मला म्हणाले, “हे लोक जे काही तुझ्याशी बोलले ते मी ऐकले आहे. त्यांनी जे सर्वकाही बोलले ते चांगले आहे.
- अनुवाद ५:२९सुमारे इ.स.पू. १४५१
त्यांचे अंतःकरण मजविषयी नेहमीच असे राहिले आणि माझ्या आज्ञा पाळण्याचे भय त्यांच्याठायी नेहमीच राहिले तर किती बरे होईल! असे झाल्यास त्यांचे व त्यांच्या मुलाबाळांचे सदासर्वकाळ कल्याण होईल!
- अनुवाद ५:३०सुमारे इ.स.पू. १४५१
“जा आणि त्यांना त्यांच्या तंबूमध्ये परत जाण्यास सांग.
- अनुवाद ५:३१सुमारे इ.स.पू. १४५१
पण तू माझ्याबरोबर इथेच थांब, म्हणजे मी तुला माझ्या सर्व आज्ञा, विधी व नियम देईन आणि ते त्यांना शिकव म्हणजे जो देश मी त्यांना वतन म्हणून देणार आहे तिथे त्यांचे पालन करावे.”
- अनुवाद ५:३२सुमारे इ.स.पू. १४५१
याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञा पाळण्याची तुम्ही खबरदारी घ्या; उजवीकडे किंवा डावीकडे वळू नका.
- अनुवाद ५:३३सुमारे इ.स.पू. १४५१
याहवेह तुमच्या परमेश्वराने ज्या मार्गावर चालण्यास आज्ञा केली आहे, त्यावर तुम्ही चला, म्हणजे तुम्ही जिवंत राहाल आणि ज्या देशाचा तुम्ही ताबा घेणार आहात, त्या देशात तुम्ही दीर्घकाल समृद्धीचे जीवन जगू शकाल.
- अनुवाद ६:१सुमारे इ.स.पू. १४५१
यार्देन ओलांडून त्या वचनदत्त देश ताब्यात घ्यायचा आहे, त्या देशात तुम्हाला पाळावयास शिकविण्यासाठी याहवेह तुमच्या परमेश्वराने मला सांगितलेल्या आज्ञा, विधी व नियम हे आहेत,
- अनुवाद ६:२सुमारे इ.स.पू. १४५१
यासाठी की तुम्ही, तुमचे पुत्र, पौत्रे यांनी याहवेह तुमच्या परमेश्वराचे भय बाळगावे. मी तुम्हाला दिलेले सर्व नियम व आज्ञा तुम्ही पाळत राहाल तर तुम्ही दीर्घायुष्याचा आनंद घ्याल.
- अनुवाद ६:३सुमारे इ.स.पू. १४५१
म्हणून इस्राएली लोकहो ऐका आणि काळजीपूर्वक आज्ञा पाळा म्हणजे तुमचे भले होईल आणि याहवेह तुमच्या पूर्वजांच्या परमेश्वरांनी तुम्हाला दिलेल्या वचनाप्रमाणे दूध व मध वाहणार्या देशात तुम्ही बहुगुणित व्हाल.
- अनुवाद ६:४सुमारे इ.स.पू. १४५१
हे इस्राएला ऐक: याहवेह आपले परमेश्वर एकच याहवेह आहेत.
- अनुवाद ६:५सुमारे इ.स.पू. १४५१
याहवेह तुमच्या परमेश्वरावर तुमच्या पूर्ण हृदयाने, तुमच्या पूर्ण जिवाने आणि तुमच्या पूर्णशक्तीने प्रीती करा.
- अनुवाद ६:६सुमारे इ.स.पू. १४५१
या ज्या आज्ञा मी आज तुम्हाला देणार आहे, त्या तुमच्या अंतःकरणात सदैव असाव्या.
- अनुवाद ६:७सुमारे इ.स.पू. १४५१
त्या तुमच्या मुलांवर बिंबवा. घरी बसले असताना, वाटेवर चालत असताना, झोपण्याच्या वेळी व झोपेतून उठल्यानंतर त्याबद्दल बोलत राहा.
- अनुवाद ६:८सुमारे इ.स.पू. १४५१
त्या तुम्ही आपल्या हातावर चिन्ह म्हणून बांधून ठेवा आणि आपल्या कपाळपट्टीवर बांधा.
- अनुवाद ६:९सुमारे इ.स.पू. १४५१
त्या तुमच्या घरातील दाराच्या चौकटीवर व तुमच्या फाटकांवर लिहा.
- अनुवाद ६:१०सुमारे इ.स.पू. १४५१
जो देश देण्याचे वचन याहवेह तुमच्या परमेश्वराने तुमचे पूर्वज अब्राहाम, इसहाक व याकोबाला दिले होते, त्या देशात जेव्हा ते तुम्हाला घेऊन जातील व जी तुम्ही स्वतः वसविलेली नाहीत—अशी मोठी व सुंदर शहरे तुम्हाला देतील,
- अनुवाद ६:११सुमारे इ.स.पू. १४५१
तुम्ही स्वतः भरले नाहीत अशा सर्व चांगल्या वस्तूंनी भरलेली घरे, तुम्ही स्वतः खोदल्या नाहीत अशा विहिरी आणि तुम्ही स्वतः लावले नाहीत असे द्राक्षमळे व जैतुनाचे वृक्ष—तुम्ही ते सर्व खाल आणि तृप्त व्हाल,
- अनुवाद ६:१२सुमारे इ.स.पू. १४५१
ज्या याहवेहने तुम्हाला इजिप्त देशातून, दास्यगृहातून बाहेर आणले त्यांना तुम्ही विसरू नये याची खबरदारी घ्या.
- अनुवाद ६:१३सुमारे इ.स.पू. १४५१
तुम्ही याहवेह आपल्या परमेश्वराचे भय बाळगावे, फक्त त्यांचीच सेवा करावी आणि त्यांच्याच नावाने शपथ वाहवी.
- अनुवाद ६:१४सुमारे इ.स.पू. १४५१
इतर दैवतांच्या, तुमच्या सभोवती असलेल्या राष्ट्रांच्या दैवतांच्या मागे लागू नका;
- अनुवाद ६:१५सुमारे इ.स.पू. १४५१
कारण याहवेह तुमचे परमेश्वर, जे तुम्हामध्ये आहेत, ते ईर्ष्यावान परमेश्वर आहेत, यामुळे त्यांचा राग भडकेल व ते तुम्हाला या पृथ्वीवरून नष्ट करून टाकतील.
- अनुवाद ६:१६सुमारे इ.स.पू. १४५१
मस्सा येथे पाहिली तशी तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराची परीक्षा पाहू नका.
- अनुवाद ६:१७सुमारे इ.स.पू. १४५१
याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञा तुम्ही काळजीपूर्वक पाळाव्या आणि त्यांची बोधवचने व नियमांचेही जपून पालन करावे.
- अनुवाद ६:१८सुमारे इ.स.पू. १४५१
याहवेहच्या दृष्टीने जे योग्य व चांगले आहे तेच करा, तर तुमचे सर्व बाबतीत कल्याण होईल आणि याहवेहने तुमच्या पूर्वजांना शपथपूर्वक देऊ केलेल्या देशात तुम्ही जाल व तो देश तुम्ही ताब्यात घ्याल.