मुख्य मजकुरावर जा

circa 1446–1406 BC

The Wilderness Years

Forty years of wandering in the desert test Israel's faith and prepare a new generation to enter the promised land.

2,247 वचने · 2 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. अनुवाद ५:२सुमारे इ.स.पू. १४५१

    याहवेह आपल्या परमेश्वराने होरेब पर्वतावर तुमच्याशी एक करार केला होता.

  2. अनुवाद ५:३सुमारे इ.स.पू. १४५१

    याहवेहने हा करार आपल्या पूर्वजांशी नव्हे तर आज येथे जिवंत असलेल्या आपल्या सर्वांशी केला आहे.

  3. अनुवाद ५:४सुमारे इ.स.पू. १४५१

    याहवेह पर्वतावर अग्नीमधून तुमच्याशी समोरासमोर बोलले.

  4. अनुवाद ५:५सुमारे इ.स.पू. १४५१

    (त्यावेळी मी तुमच्या आणि याहवेहमध्ये उभा राहिलो आणि तुम्हाला याहवेहच्या वचनाची घोषणा केली, कारण तुम्हाला अग्नीची भीती वाटत असल्यामुळे तुम्ही पर्वतावर चढून त्यांच्यापर्यंत गेला नाही.) आणि ते म्हणाले:

  5. अनुवाद ५:६सुमारे इ.स.पू. १४५१

    “ज्याने तुम्हाला इजिप्त देशातून व दास्यातून बाहेर आणले तो मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.

  6. अनुवाद ५:७सुमारे इ.स.पू. १४५१

    “माझ्यासमोर तुम्हाला इतर कोणतेही देव नसावेत.

  7. अनुवाद ५:८सुमारे इ.स.पू. १४५१

    तुम्ही स्वतःसाठी वर आकाशातील, पृथ्वीवरील व पृथ्वीच्या खाली जलातील कशाचीही प्रतिमा करू नका.

  8. अनुवाद ५:९सुमारे इ.स.पू. १४५१

    तुम्ही त्यांना नमन करू नये किंवा त्यांची उपासना करू नये; कारण मी याहवेह तुमचा परमेश्वर ईर्ष्यावान परमेश्वर आहे. जे माझा द्वेष करतात त्यांच्या लेकरांना तिसर्‍या व चौथ्या पिढीपर्यंत त्यांच्या आईवडिलांच्या पापांचे शासन करतो,

  9. अनुवाद ५:१०सुमारे इ.स.पू. १४५१

    परंतु जे माझ्यावर प्रीती करतात आणि माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो पिढ्यांपर्यंत प्रीती करतो.

  10. अनुवाद ५:११सुमारे इ.स.पू. १४५१

    याहवेह तुमच्या परमेश्वराचे नाव तुम्ही व्यर्थ घेऊ नका, कारण जे त्यांचे नाव व्यर्थ घेतात, त्यांना याहवेह शिक्षा दिल्यावाचून राहणार नाहीत.

  11. अनुवाद ५:१२सुमारे इ.स.पू. १४५१

    याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञेनुसार शब्बाथ दिवस पवित्रपणे पाळावा.

  12. अनुवाद ५:१३सुमारे इ.स.पू. १४५१

    सहा दिवस तुम्ही परिश्रम करावेत आणि आपली सर्व कामे करावी,

  13. अनुवाद ५:१४सुमारे इ.स.पू. १४५१

    परंतु सातवा दिवस याहवेह तुमच्या परमेश्वराचा शब्बाथ आहे. त्या दिवशी तुम्ही कोणतेही काम करू नये. तुम्ही किंवा तुमचा पुत्र किंवा कन्या, तुमचा दास किंवा दासी, तुमचे बैल, गाढव, तुमचे पशू किंवा तुमच्या नगरात राहणारा परदेशी, तुमचा दास आणि दासी यांनी देखील तुमच्यासह त्या दिवशी विश्रांती घ्यावी.

  14. अनुवाद ५:१५सुमारे इ.स.पू. १४५१

    तुम्ही इजिप्त देशात गुलाम होता याचे स्मरण करा. याहवेह तुमच्या परमेश्वराच्या सामर्थ्यवान व विस्तारित हातांनी तुम्हाला तिथून बाहेर काढले. यास्तव याहवेह तुमच्या परमेश्वराने शब्बाथ दिवस पाळण्याची आज्ञा केली आहे.

  15. अनुवाद ५:१६सुमारे इ.स.पू. १४५१

    याहवेह तुमच्या परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे आपल्या वडिलांचा व आपल्या आईचा सन्मान करा, म्हणजे जो देश याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला देत आहे, त्यात तुम्ही दीर्घकाळ राहाल व तुमचे कल्याण होईल.

  16. अनुवाद ५:१७सुमारे इ.स.पू. १४५१

    तुम्ही खून करू नका.

  17. अनुवाद ५:१८सुमारे इ.स.पू. १४५१

    तुम्ही व्यभिचार करू नका.

  18. अनुवाद ५:१९सुमारे इ.स.पू. १४५१

    तुम्ही चोरी करू नका.

  19. अनुवाद ५:२०सुमारे इ.स.पू. १४५१

    तुमच्या शेजार्‍याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नका.

  20. अनुवाद ५:२१सुमारे इ.स.पू. १४५१

    तुमच्या शेजार्‍याच्या पत्नीची अभिलाषा धरू नका. त्याच्या घराचा किंवा भूमीचा, त्याच्या दासाचा किंवा दासीचा, त्याच्या बैलाचा किंवा गाढवाचा किंवा शेजार्‍याच्या मालकीच्या कशाचाही लोभ करू नका.”

  21. अनुवाद ५:२२सुमारे इ.स.पू. १४५१

    याहवेहने या आज्ञा तुमच्यातील प्रत्येकाला अग्नी, मेघ व निबिड अंधकार यांनी वेष्टिलेल्या पर्वतावरून उंच आवाजात उच्चारून दिल्या; व त्यात अधिक काहीही जोडले नाही. त्यांनी त्या दोन दगडी पाट्यांवर लिहून माझ्याजवळ दिल्या.

  22. अनुवाद ५:२३सुमारे इ.स.पू. १४५१

    पण ज्यावेळी तुम्ही अंधारातून येणारा आवाज ऐकला आणि डोंगर माथ्यावरील त्या भयानक ज्वाला पाहिल्या, तेव्हा तुमचे सर्व गोत्रप्रमुख व वडील माझ्याकडे आले.

  23. अनुवाद ५:२४सुमारे इ.स.पू. १४५१

    आणि मला म्हणाले, “याहवेह आमच्या परमेश्वराने आज आम्हाला त्यांचे गौरव व थोरवी दाखविली आहे आणि अग्नीमधून येणारा त्यांचा आवाजसुद्धा आम्ही ऐकला. आम्ही आज पाहिले आहे की, परमेश्वर मानवाशी बोलले तरी मानव जिवंत राहणे शक्य आहे.

  24. अनुवाद ५:२५सुमारे इ.स.पू. १४५१

    परंतु आम्ही का मरावे? त्या भयानक ज्वाला आम्हाला भस्म करून टाकतील आणि याहवेह आमच्या परमेश्वराची वाणी आम्ही ऐकत राहू, तर खात्रीने मरून जाऊ.

  25. अनुवाद ५:२६सुमारे इ.स.पू. १४५१

    कारण जिवंत परमेश्वर अग्नीतून बोलत असताना त्यांची वाणी ऐकून जिवंत राहिला आहे, असा सर्व नश्वर मानवात आमच्याशिवाय कोण आहे?