- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1446–1406 BC
The Wilderness Years
Forty years of wandering in the desert test Israel's faith and prepare a new generation to enter the promised land.
या कालखंडातील वचने
- अनुवाद ४:२६सुमारे इ.स.पू. १४५१
तर मी सांगतो की तुमच्याविरुद्ध स्वर्ग व पृथ्वी ही दोन्हीही साक्षी असतील, मग तुम्ही यार्देन पार करून जो देश ताब्यात घ्याल, त्या देशात तुमचा लवकरच नाश होईल. तुमचे तेथील वास्तव्य अगदी अल्पकाळ असेल व तुमचा संपूर्णपणे नायनाट होईल.
- अनुवाद ४:२७सुमारे इ.स.पू. १४५१
याहवेह, तुमची इतर राष्ट्रांमध्ये पांगापांग करतील आणि ज्या राष्ट्रांमध्ये याहवेह तुम्हाला घेऊन जातील त्यांच्यापैकी फक्त काही लोकच मागे उरतील.
- अनुवाद ४:२८सुमारे इ.स.पू. १४५१
तिथे तुम्ही लाकूड आणि दगडाच्या मानवनिर्मित दैवतांची सेवा कराल, जे पाहू शकत नाहीत, ऐकू शकत नाहीत, खाऊ शकत नाहीत किंवा वासही घेऊ शकत नाहीत.
- अनुवाद ४:२९सुमारे इ.स.पू. १४५१
परंतु तिथे असताना जर तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराचा शोध घ्याल आणि संपूर्ण मनाने व जिवाने त्यांना शोधाल, तर ते तुम्हाला सापडतील.
- अनुवाद ४:३०सुमारे इ.स.पू. १४५१
तुमच्यावर यातना व अनेक दुःखाचे प्रसंग येतील, तेव्हा तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराकडे परत याल आणि त्यांचे आज्ञापालन कराल.
- अनुवाद ४:३१सुमारे इ.स.पू. १४५१
कारण याहवेह तुमचे परमेश्वर हे कनवाळू आहेत. ते तुम्हाला सोडणार वा टाकणार नाहीत किंवा त्यांनी तुमच्या पूर्वजांशी केलेला शपथपूर्वक करार ते विसरणार नाहीत.
- अनुवाद ४:३२सुमारे इ.स.पू. १४५१
परमेश्वराने पृथ्वीवर मानवाला निर्माण केले त्या दिवसापासून आतापर्यंत तुमच्या आधी होऊन गेलेल्या दिवसांना विचारा आणि आकाशाच्या एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंत विचारा की, अशा प्रकारची महान गोष्ट पूर्वी कधी घडली होती का किंवा अशी गोष्ट कुठे घडल्याचे कोणी कधी ऐकले आहे का?
- अनुवाद ४:३३सुमारे इ.स.पू. १४५१
अग्नीमधून बोलताना परमेश्वराची वाणी कोणी कधी ऐकली, ज्याप्रकारे तुम्ही ऐकली आणि जिवंत राहिले आहेत काय?
- अनुवाद ४:३४सुमारे इ.स.पू. १४५१
कोणत्या दैवताने एका राष्ट्रातून दुसर्या राष्ट्राला गुलामगिरीतून बाहेर काढण्याकरिता भयानक पीडा पाठविल्या, चिन्हे, चमत्कार केले, युद्ध व अद्भुत कृत्ये केली, जसे इजिप्त देशातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी याहवेह तुमच्या परमेश्वराने पराक्रमी बाहू आणि उगारलेल्या हाताने चमत्कार केले, असे एक तरी उदाहरण इतरत्र तुम्हाला सापडेल का?
- अनुवाद ४:३५सुमारे इ.स.पू. १४५१
त्यांनी या गोष्टी अशासाठी केल्या की, याहवेहच परमेश्वर आहेत हे तुम्हाला कळून यावे; त्यांच्यासारखा अन्य कोणीही नाही हे देखील समजावे.
- अनुवाद ४:३६सुमारे इ.स.पू. १४५१
तुम्हाला बोध करण्यासाठी स्वर्गातून आज्ञा देण्यास त्यांनी तुम्हाला आपली वाणी ऐकविली, तसेच त्यांचा महान अग्निस्तंभही तुम्हाला या पृथ्वीतलावर दाखविला; आणि तुम्ही त्या अग्नीमधून येणारे त्यांचे शब्दही ऐकले.
- अनुवाद ४:३७सुमारे इ.स.पू. १४५१
तुमच्या पूर्वजांवर त्यांची प्रीती होती आणि त्यांनी त्यांच्या वंशजांना आशीर्वाद देण्यासाठी निवडले आणि म्हणूनच त्यांनी तुम्हाला आपल्या उपस्थितीने आणि महान सामर्थ्याने इजिप्त देशामधून बाहेर आणले,
- अनुवाद ४:३८सुमारे इ.स.पू. १४५१
त्यांनी तुमच्यापेक्षाही महान आणि सामर्थ्यवान राष्ट्रांना घालवून दिले व त्यांची भूमी तुम्हाला वतनादाखल दिली, ती आजही तशीच आहे.
- अनुवाद ४:३९सुमारे इ.स.पू. १४५१
वर स्वर्गात आणि खाली पृथ्वीवर याहवेहच परमेश्वर आहेत, हे आजच स्वीकारा आणि तुमच्या अंतःकरणात ठेवा. त्यांच्याशिवाय दुसरा कोणी नाही.
- अनुवाद ४:४०सुमारे इ.स.पू. १४५१
आज जे विधी व आज्ञा मी तुम्हाला सांगणार आहे, यांचे तुम्ही पालन केले, तर तुमचे व तुमच्या वंशजांचे कल्याण होईल आणि याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला देत असलेल्या या देशामध्ये तुम्ही चिरकाल वस्ती कराल.
- अनुवाद ४:४१सुमारे इ.स.पू. १४५१
नंतर मोशेने यार्देनेच्या पूर्वेस तीन शहरे नेमली;
- अनुवाद ४:४२सुमारे इ.स.पू. १४५१
ती यासाठी की, जर कोणी चुकून एखाद्या व्यक्तीची हत्या केली, त्याने पूर्व कल्पना नसताना एखाद्या शेजार्याला अनावधानाने मारले तर त्याला सुरक्षिततेसाठी त्या शहरात पळून जाता येईल. तो यापैकी एका शहरात पळून जाऊन आपला जीव वाचवू शकतो.
- अनुवाद ४:४३सुमारे इ.स.पू. १४५१
ती शहरे ही होती: रऊबेनाच्या वंशजासाठी रानातील पठारावरील बेसेर, गाद वंशजांसाठी गिलआदातील रामोथ आणि मनश्शेहच्या वंशजांसाठी बाशानातले गोलान.
- अनुवाद ४:४४सुमारे इ.स.पू. १४५१
मोशेने इस्राएली लोकांना दिलेले नियमशास्त्र हे आहे.
- अनुवाद ४:४५सुमारे इ.स.पू. १४५१
ज्यावेळी इस्राएली लोकांनी इजिप्त देश सोडला, त्यांना मोशेने या अटी, विधी व नियम दिले
- अनुवाद ४:४६सुमारे इ.स.पू. १४५१
आणि तेव्हा ते यार्देनेच्या पूर्वेकडे बेथ-पौर शहराजवळ तळ देऊन राहिलेले होते, हीच भूमी पूर्वी अमोर्यांनी आपला राजा सीहोनच्या अधिपत्याखाली व्यापली होती आणि त्याची राजधानी हेशबोन होती; मोशे व इस्राएली लोकांनी इजिप्त देशातून बाहेर आल्यानंतर सीहोन राजा आणि त्याच्या लोकांचा पराभव केला.
- अनुवाद ४:४७सुमारे इ.स.पू. १४५१
इस्राएली लोकांनी त्यांची भूमी आणि बाशानचा राजा ओगचीही भूमी जिंकून ताब्यात घेतली. यार्देनेच्या पूर्वेस असणारे हेच दोघे अमोरी राजे होते.
- अनुवाद ४:४८सुमारे इ.स.पू. १४५१
आर्णोन नदीच्या खोर्याच्या टोकाशी वसलेल्या अरोएर शहरापासून सिर्योन पर्वतापर्यंत, ज्याला हर्मोन पर्वत असेही म्हणतात,
- अनुवाद ४:४९सुमारे इ.स.पू. १४५१
आणि तसेच यार्देनच्या पूर्वेस असलेल्या अराबाच्या संपूर्ण प्रदेशापासून पिसगा पर्वताच्या उताराखाली असलेल्या खार्या समुद्रापर्यंतचा सर्व भूभाग इस्राएली लोकांनी जिंकून घेतला.
- अनुवाद ५:१सुमारे इ.स.पू. १४५१
मोशेने सर्व इस्राएली लोकांना बोलाविले आणि म्हटले: इस्राएली लोकांनो, ज्या विधी व नियमांची आज मी घोषणा करीत आहे व तुम्हाला ऐकवीत आहे, ते शिका आणि निश्चितपणे त्याचे पालन करा.