- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 930–586 BC
The Divided Kingdom
The kingdom splits into Israel and Judah; prophets warn of judgment as both nations slowly drift into idolatry and exile.
या कालखंडातील वचने
- 2 राजे १५:२७सुमारे इ.स.पू. ७५९
यहूदीयाचा राजा अजर्याहच्या बावन्नाव्या वर्षी रमाल्याहचा पुत्र पेकह शोमरोनात इस्राएलावर राज्य करू लागला आणि त्याने वीस वर्ष राज्य केले.
- 2 राजे १५:२८सुमारे इ.स.पू. ७५९
त्याने याहवेहच्या दृष्टीने वाईट ते केले. नेबाटाचा पुत्र यरोबोअमाने जी पातके इस्राएलास करावयास लावली तो त्या पातकांपासून मागे फिरला नाही.
- 2 राजे १५:२९सुमारे इ.स.पू. ७५९
इस्राएलचा राजा पेकहच्या कारकिर्दीत अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर याने इस्राएलवर स्वारी केली आणि इय्योन, आबेल-बेथ-माकाह, यानोहा, केदेश, हासोर, गिलआद, गालील व नफतालीचा सर्व भाग जिंकला आणि लोकांना कैद करून अश्शूरास नेले.
- 2 राजे १५:३०सुमारे इ.स.पू. ७३९
नंतर एलाहचा पुत्र होशेने रमाल्याहचा पुत्र पेकहाच्या विरुद्ध कट रचला. त्याने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला ठार केले व त्याच्या ठिकाणी राज्य करू लागला. ही घटना उज्जीयाहचा पुत्र योथामाच्या कारकिर्दीच्या विसाव्या वर्षी घडली.
- 2 राजे १५:३१सुमारे इ.स.पू. ७३९
पेकहच्या राजवटीतील इतर घटना आणि त्याने जे सर्व केले ते इस्राएली राजांच्या इतिहासग्रंथात नमूद केलेले नाही काय?
- 2 राजे १५:३२सुमारे इ.स.पू. ७५८
इस्राएलाचा राजा रमाल्याहचा पुत्र पेकह याच्या दुसर्या वर्षी यहूदीयाचा राजा उज्जीयाह याचा पुत्र योथाम राज्य करू लागला.
- 2 राजे १५:३३सुमारे इ.स.पू. ७५८
तो पंचवीस वर्षांचा होता तेव्हा तो राजा झाला आणि त्याने यरुशलेमात सोळा वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यरुशा, ती सादोकची कन्या होती.
- 2 राजे १५:३४सुमारे इ.स.पू. ७५८
आपल्या पिता उज्जीयाह प्रमाणे त्यानेही याहवेहच्या दृष्टीने जे योग्य ते केले,
- 2 राजे १५:३५सुमारे इ.स.पू. ७५८
तथापि उच्च स्थाने काढली गेली नव्हती; लोकांनी त्यांची अर्पणे व धूप जाळणे सुरूच ठेवले. योथामाने याहवेहच्या मंदिराचा वरील दरवाजा पुन्हा बांधला.
- 2 राजे १५:३६सुमारे इ.स.पू. ७५८
योथामाच्या राजवटीतील इतर घटना आणि त्याने काय केले हे यहूदीयाच्या राजांच्या इतिहासग्रंथात लिहिलेले नाही काय?
- 2 राजे १५:३७सुमारे इ.स.पू. ७४२
(त्या दिवसात याहवेहने अरामचा राजा रसीन आणि रमाल्याहचा पुत्र पेकह यांना यहूदीयावर स्वारी करण्यास उद्युक्त केले.)
- 2 राजे १५:३८सुमारे इ.स.पू. ७४२
योथाम त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला त्यांच्याजवळ, त्याचा पिता दावीदाच्या नगरात पुरण्यात आले. आणि वारस म्हणून त्याचा पुत्र आहाज राजा झाला.
इस्राएलाचा राजा रमाल्याहचा पुत्र पेकहच्या कारकिर्दीच्या सतराव्या वर्षी यहूदीयाचा राजा योथामचा पुत्र आहाज राज्य करू लागला.
वयाच्या विसाव्या वर्षी आहाज राजा झाला आणि त्याने यरुशलेममध्ये सोळा वर्षे राज्य केले. त्याचे वडील दावीदाने केले त्याप्रमाणे, याहवेह त्याच्या परमेश्वराच्या दृष्टीने जे योग्य ते त्याने केले नाही.
त्याने इस्राएलच्या राजांच्या मार्गांचे अनुसरण केले आणि आपल्या पुत्राचे अग्नीत अर्पण केले, राष्ट्रांच्या ज्या अमंगळ प्रथा याहवेहने इस्राएल लोकांतून काढून टाकल्या होत्या त्यात तो गुंतला.
त्याने डोंगरावर, टेकड्यांवर आणि प्रत्येक घनदाट वृक्षाखाली यज्ञार्पणे केली आणि धूप जाळला.
- 2 राजे १६:५सुमारे इ.स.पू. ७४२
मग अरामचा राजा रसीन आणि इस्राएलाचा राजा रमाल्याहचा पुत्र पेकह यांनी यरुशलेमवर हल्ला केला आणि आहाजाला वेढा दिला, परंतु ते त्याच्यावर विजय प्राप्त करू शकले नाहीत.
- 2 राजे १६:६सुमारे इ.स.पू. ७४२
त्यावेळी अरामचा राजा रसीनने एलाथ हे शहर जिंकून घेतले आणि त्याने यहूद्यांना हुसकावून लावले. ते अरामात सामील केले. त्या शहरातून व एदोमी लोकांनी येऊन एलाथ येथे वस्ती केली आणि आजही अरामी लोक तिथे राहत आहेत.
- 2 राजे १६:७सुमारे इ.स.पू. ७४२
आहाज राजाने अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसरकडे आपले दूत पाठवून त्याला संदेश दिला, “मी तुमचा दास आणि पुत्र आहे. वर येऊन अरामी राजा आणि इस्राएली राजा यांच्यापासून माझा बचाव करा, ज्यांनी माझ्यावर आक्रमण केले आहे.”
- 2 राजे १६:८सुमारे इ.स.पू. ७४२
आणि आहाजाने याहवेहच्या मंदिरातील आणि राजवाड्यातील भांडारांतील चांदी आणि सोने घेतले आणि अश्शूरच्या राजाला भेट म्हणून दिल्या.
- 2 राजे १६:९सुमारे इ.स.पू. ७४०
अश्शूरच्या राजाने त्याची मागणी ऐकली. त्याने दिमिष्कावर हल्ला केला आणि त्याला ताब्यात घेतले. तेथील लोकांना धरून कीर येथे नेले आणि रसीनलाही ठार मारले.
- 2 राजे १६:१०सुमारे इ.स.पू. ७४०
मग आहाज राजा तिग्लथ-पिलेसर अश्शूरच्या राजाला भेटावयास दिमिष्क येथे गेला. त्याने दिमिष्क येथे एक वेदी पाहिली आणि त्याने, तिचा आकार व आराखडा तयार करून तो उरीयाह याजकाकडे पाठवून दिला.
- 2 राजे १६:११सुमारे इ.स.पू. ७४०
आहाज राजाने दिमिष्क येथून पाठविलेल्या सर्व आराखड्यानुसार उरीयाह याजकाने एक वेदी बांधली आणि राजा आहाज परत येण्यापूर्वी ती पूर्ण केली.
- 2 राजे १६:१२सुमारे इ.स.पू. ७४०
जेव्हा राजा दिमिष्क येथून परत आला आणि त्याने वेदी पाहिली, तो वेदीजवळ गेला आणि त्यावर त्याने अर्पण सादर केले.
- 2 राजे १६:१३सुमारे इ.स.पू. ७४०
त्याने वेदीवर त्याचे होमार्पण आणि अन्नार्पण अर्पण केले, त्याने आपले पेयार्पण अर्पण ओतले, आणि शांत्यर्पणाचे रक्त वेदीवर शिंपडले.