मुख्य मजकुरावर जा

circa 930–586 BC

The Divided Kingdom

The kingdom splits into Israel and Judah; prophets warn of judgment as both nations slowly drift into idolatry and exile.

1,722 वचने · 3 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. 2 राजे १४:६सुमारे इ.स.पू. ८३८

    परंतु त्याने त्यांच्या मुलांना जिवे मारले नाही, कारण नियमशास्त्रात, मोशेच्या पुस्तकात याहवेहने आज्ञा दिली होती: “आईवडिलांना त्यांच्या मुलांच्या कारणामुळे जिवे मारू नये, तसेच आईवडिलांच्या कारणामुळे त्यांच्या मुलांना जिवे मारू नये. प्रत्येकजण स्वतःच्या पापासाठी मरतील.”

  2. 2 राजे १४:७सुमारे इ.स.पू. ८२७

    त्याने क्षार खोर्‍यात दहा हजार एदोमी लोकांना ठार केले. त्याने सेला नगरावर हल्ला करून ते जिंकले व त्याचे नाव योकथएल असे ठेवले, आजही ते याच नावाने ओळखले जाते.

  3. 2 राजे १४:८सुमारे इ.स.पू. ८२६

    मग अमस्याहने इस्राएलचा राजा, येहूचा पुत्र यहोआहाजचा पुत्र यहोआशला दूतांच्या द्वारे संदेश पाठवून असे आव्हान केले, “चल ये, युद्धात एकमेकांचा सामना करू.”

  4. 2 राजे १४:९सुमारे इ.स.पू. ८२६

    परंतु इस्राएलचा राजा यहोआशने यहूदीयाचा राजा अमस्याहला उत्तर दिले: “लबानोनमधील एका काटेरी झुडूपाने लबानोनमधील एका गंधसरूला निरोप पाठवला की, ‘तुझ्या मुलीचा विवाह माझ्या मुलाशी करून दे.’ तेव्हा लबानोनमधून एका जंगली श्वापदाने येऊन त्या काटेरी झुडूपाला पायाखाली तुडविले.

  5. 2 राजे १४:१०सुमारे इ.स.पू. ८२६

    खचितच तू एदोमाचा पराभव केला आहेस आणि त्यामुळे तू उन्मत्त झाला आहेस. त्याचे गौरव करीत तू घरीच राहा! संकटांला आमंत्रण देऊन स्वतःचा आणि यहूदीयाचा नाश का करावा?”

  6. 2 राजे १४:११सुमारे इ.स.पू. ८२६

    परंतु अमस्याहने ऐकले नाही, तेव्हा इस्राएलाचा राजा यहोआशने हल्ला केला. त्याने आणि यहूदीयाच्या राजा अमस्याहने यहूदीयातील बेथ-शेमेश येथे एकमेकांचा सामना केला.

  7. 2 राजे १४:१२सुमारे इ.स.पू. ८२६

    इस्राएलने यहूदाहचा पराभव केला आणि प्रत्येकजण आपआपल्या घरी पळून गेले.

  8. 2 राजे १४:१३सुमारे इ.स.पू. ८२६

    इस्राएलाचा राजा यहोआशने यहूदीयाचा राजा अहज्याहचा पुत्र, योआशाचा पुत्र अमस्याहला बेथ-शेमेश येथे कैद केले. नंतर योआश यरुशलेमास गेला आणि यरुशलेमची एफ्राईमच्या दरवाजापासून कोपर्‍याच्या दरवाजापर्यंत भिंत त्याने पाडून टाकली; जी चारशे हात लांब होती.

  9. 2 राजे १४:१४सुमारे इ.स.पू. ८२६

    याहवेहच्या मंदिरातील आणि राजवाड्याच्या तिजोरीतून सर्व सोने, चांदी व सापडतील ती पात्रे त्याने घेतली, त्याने कैद्यांना सुद्धा घेतले आणि तो शोमरोनास परतला.

  10. 2 राजे १४:१५सुमारे इ.स.पू. ८४१

    यहोआशाचा बाकीचा इतिहास, त्याने काय केले आणि त्याचे पराक्रम, तसेच यहूदीयाच्या अमस्याह राजाबरोबर झालेले त्याचे युद्ध यांची नोंद इस्राएली राजांचा इतिहासग्रंथात नमूद केलेली नाही काय?

  11. 2 राजे १४:१६सुमारे इ.स.पू. ८२५

    यहोआश आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला आणि त्याला इस्राएली राजांसोबत शोमरोनात मूठमाती देण्यात आली. आणि त्याच्यानंतर त्याचा पुत्र यरोबोअम हा त्याच्या जागी राज्य करू लागला.

  12. 2 राजे १४:१७सुमारे इ.स.पू. ८२५

    इस्राएलचा राजा यहोआहाजचा पुत्र यहोआशच्या मृत्यूनंतर यहूदीयाचा राजा योआशचा पुत्र अमस्याह पंधरा वर्षे जगला.

  13. 2 राजे १४:१८सुमारे इ.स.पू. ८२५

    अमस्याहाच्या राज्यकाळातील इतर घटना, यहूदीयाच्या राजांच्या इतिहासग्रंथात लिहिलेल्या नाहीत काय?

  14. 2 राजे १४:१९सुमारे इ.स.पू. ८१०

    त्यांनी यरुशलेममध्ये त्याच्याविरुद्ध कट रचला आणि तो लाखीशकडे पळून गेला, परंतु त्यांनी त्याच्यामागे लाखीशकडे माणसे पाठवून दिली आणि त्याला तिथे मारले.

  15. 2 राजे १४:२०सुमारे इ.स.पू. ८१०

    त्याला घोड्यावरून परत आणण्यात आले आणि यरुशलेममध्ये दावीदाच्या शहरात त्याच्या पूर्वजांबरोबर पुरण्यात आले.

  16. 2 राजे १४:२१सुमारे इ.स.पू. ८१०

    मग यहूदीयाच्या सर्व लोकांनी अजर्‍याह ला घेतले, जो सोळा वर्षाचा होता आणि त्याला त्याचा पिता अमस्याहच्या जागी राजा केले.

  17. 2 राजे १४:२२सुमारे इ.स.पू. ८१०

    राजा अमस्याह आपल्या पूर्वजांना मिळाल्यानंतर अजर्‍याहाने एलाथ नगर पुन्हा वसविले व ते यहूदीयाला जोडले.

  18. 2 राजे १४:२३सुमारे इ.स.पू. ८२५

    यहूदीयाचा राजा योआशाचा पुत्र अमस्याहच्या कारकिर्दीच्या पंधराव्या वर्षी इस्राएलाचा राजा योआशचा पुत्र यरोबोअम शोमरोनात राज्य करू लागला आणि त्याने एकेचाळीस वर्षे राज्य केले.

  19. 2 राजे १४:२४सुमारे इ.स.पू. ८२५

    त्याने याहवेहच्या दृष्टीने वाईट ते केले, नेबाटाचा पुत्र यरोबोअमाने जी पातके इस्राएलास करावयास लावली तो त्या पातकांपासून मागे फिरला नाही.

  20. 2 राजे १४:२५सुमारे इ.स.पू. ८२५

    त्याने इस्राएलाची सीमा लेबो हमाथपासून अराबाच्या समुद्रापर्यंत पुनः स्थापित केली. याहवेह इस्राएलांच्या परमेश्वराच्या वचनाप्रमाणे गथ-हेफेर येथील संदेष्टा अमित्तयाचा पुत्र योनाहद्वारे हे भविष्य केले होते.

  21. 2 राजे १४:२६सुमारे इ.स.पू. ८२५

    इस्राएलातील प्रत्येकजण, मग तो गुलाम असो वा स्वतंत्र असो, त्यांचा फार छळ होत आहे हे याहवेहने पाहिले; त्यांना साहाय्य करणारे कोणीही नव्हते.

  22. 2 राजे १४:२७सुमारे इ.स.पू. ८२५

    आणि इस्राएलचे नाव पृथ्वीवरून पुसून टाकीन असे याहवेहने कधीच म्हटले नाही, मग याहवेहने योआशाचा पुत्र यरोबोअमद्वारे त्यांची सुटका केली.

  23. 2 राजे १४:२८सुमारे इ.स.पू. ८२५

    यरोबोअमचे बाकीचे जीवनचरित्र, त्याने केलेली कृत्ये, त्याचे थोर सामर्थ्य, त्याचे युद्ध आणि त्याने पूर्वी यहूदीयाने काबीज केलेले दिमिष्क व हमाथ परत कसे मिळविले या सर्व हकिकतीचे वर्णन, इस्राएली राजांच्या इतिहासग्रंथात लिहून ठेवले नाही काय?

  24. 2 राजे १४:२९सुमारे इ.स.पू. ७८४

    यरोबोअम त्याचे पूर्वज इस्राएली राजांना मिळाला. आणि त्याच्यानंतर त्याचा पुत्र जखर्‍याह त्याच्या जागी इस्राएलावर राज्य करू लागला.

  25. 2 राजे १५:१सुमारे इ.स.पू. ८१०

    इस्राएलाचा राजा यरोबोअमच्या कारकिर्दीच्या सत्ताविसाव्या वर्षी यहूदीयाचा राजा अमस्याहाचा पुत्र अजर्‍याह राज्य करू लागला.