मुख्य मजकुरावर जा

circa 930–586 BC

The Divided Kingdom

The kingdom splits into Israel and Judah; prophets warn of judgment as both nations slowly drift into idolatry and exile.

1,722 वचने · 3 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. याजक यहोयादाने जितकी वर्षे जे मार्गदर्शन केले होते तितकी वर्षे याहवेहच्या दृष्टीने योग्य ते यहोआशाने केले.

  2. तरी त्याने डोंगरावरील उच्चस्थळे नष्ट केली नाहीत आणि लोक तिथे जाऊन यज्ञ करीत व धूप जाळीत असत.

  3. 2 राजे १२:४सुमारे इ.स.पू. ८५६

    यहोआश याजकांना म्हणाला, “याहवेहच्या मंदिरात पवित्र अर्पण म्हणून आणलेले सर्व पैसे, शिरगणतीत जमा केलेले पैसे, वैयक्तिक नवसातून मिळालेले पैसे आणि मंदिरात स्वेच्छेने आणलेले सर्व पैसे जमा करा.

  4. 2 राजे १२:५सुमारे इ.स.पू. ८५६

    प्रत्येक याजकाने त्याच्या खजिनदारांपैकी एकाकडून पैसे घ्यावे आणि नंतर मंदिरात जी काही मोडतोड झाली असेल ती दुरुस्त करावी.”

  5. 2 राजे १२:६सुमारे इ.स.पू. ८५६

    परंतु यहोआश राजाच्या कारकिर्दीतील तेवीस वर्षापर्यंत याजकांनी मंदिराची डागडुजी केली नव्हती.

  6. 2 राजे १२:७सुमारे इ.स.पू. ८५६

    तेव्हा यहोआश राजाने यहोयादा याजक व इतर याजकांना बोलाविले आणि विचारले, “तुम्ही मंदिराची डागडुजी अजूनही का केली नाही? तुमच्या खजिनदारांकडून आणखी पैसे घेऊ नका, तर तो पैसा आता मंदिराच्या डागडुजीसाठी देण्यात यावा.”

  7. 2 राजे १२:८सुमारे इ.स.पू. ८५६

    मग याजकांनी सहमती दर्शविली की ते लोकांकडून आता पैसा घेणार नाही आणि तसेच ते मंदिराची डागडुजी देखील करणार नाही.

  8. 2 राजे १२:९सुमारे इ.स.पू. ८५६

    यहोयादा याजकाने एक पेटी घेतली व तिच्या झाकणाला एक छिद्र पाडले. ती पेटी त्याने याहवेहच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ वेदीच्या उजव्या बाजूला ठेवली. प्रवेशद्वाराचे पहारेकरी याजक याहवेहच्या मंदिरात आणलेले सर्व पैसे पेटीत घालू लागले.

  9. 2 राजे १२:१०सुमारे इ.स.पू. ८५६

    जेव्हाही ते पाहत की पेटीमध्ये अधिक पैसा जमा झाला आहे, तेव्हा राजाचा चिटणीस आणि प्रमुख याजक येत आणि याहवेहच्या मंदिरात आलेला पैसा मोजून पिशव्यांत भरून ठेवीत असे.

  10. 2 राजे १२:११सुमारे इ.स.पू. ८५६

    रक्कम मोजून आणि तोलून झाल्यानंतर मंदिराच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी नेमलेल्या माणसांना पैसे देण्यात येत असत. त्याद्वारे त्यांनी याहवेहच्या मंदिरावर काम करणारे सुतार आणि बांधकाम करणारे,

  11. 2 राजे १२:१२सुमारे इ.स.पू. ८५६

    गवंडी आणि दगड फोडणारे यांना पैसे दिले. त्यांनी याहवेहच्या मंदिराच्या दुरुस्तीसाठी लाकूड आणि दगड घडविणे केले आणि मंदिराच्या दुरुस्तीचे इतर सर्व खर्च पूर्ण केले.

  12. 2 राजे १२:१३सुमारे इ.स.पू. ८५६

    जो पैसा मंदिरामध्ये आणत होते याच्यात याहवेहच्या मंदिरात वापरण्यात येणारे चांदीचे पेले, कातऱ्या, वाट्या, कर्णे किंवा सोन्या-चांदीच्या इतर साहित्य यावर खर्च करण्यात आला नाही;

  13. 2 राजे १२:१४सुमारे इ.स.पू. ८५६

    तर हा पैसा कामगारांना पुरविला जात होता जे याहवेहच्या मंदिराची डागडुजी करीत होते.

  14. 2 राजे १२:१५सुमारे इ.स.पू. ८५६

    ज्याच्या स्वाधीन हा पैसा कामगारांना देण्यासाठी होता त्यांच्याकडून पैशाचा हिशोब घेण्याची गरज नव्हती, कारण त्यांनी पूर्ण प्रामाणिकपणे काम केले.

  15. 2 राजे १२:१६सुमारे इ.स.पू. ८५६

    त्याचप्रमाणे दोषार्पणाचा आणि पापार्पणाचा पैसा याहवेहच्या मंदिरात आणला नाही; तो याजकांचा होता.

  16. 2 राजे १२:१७सुमारे इ.स.पू. ८४०

    या वेळेला अरामचा राजा हजाएलाने गथ शहरावर स्वारी केली आणि ते काबीज केले. मग यरुशलेमावर स्वारी करण्यासाठी त्याने कूच केले.

  17. 2 राजे १२:१८सुमारे इ.स.पू. ८४०

    तेव्हा यहूदीयाचा राजा यहोआशने आपले पूर्वज म्हणजे—यहोशाफाट, यहोराम, अहज्याह या यहूदीयाच्या राजांनी—आणि त्याने स्वतः समर्पित केलेल्या भेटवस्तू आणि याहवेहच्या मंदिरातील राजवाड्याच्या खजिन्यातील सर्व सोने त्याने अरामचा राजा हजाएलकडे पाठवून दिले. मग तो यरुशलेममधून निघून गेला.

  18. 2 राजे १२:१९सुमारे इ.स.पू. ८४०

    योआशाचा बाकीचा इतिहास, यहूदीयाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात नमूद केला नाही काय?

  19. 2 राजे १२:२०सुमारे इ.स.पू. ८४०

    योआशाच्या अधिकार्‍यांनीच त्याच्याविरुद्ध कट रचला आणि सिल्लाकडे खाली जाणार्‍या रस्त्यावर बेथ मिल्लो येथे त्याचा वध केला.

  20. 2 राजे १२:२१सुमारे इ.स.पू. ८४०

    ज्या अधिकार्‍यांनी त्याचा वध केला ते शिमाथाचा पुत्र योजाखार व शोमेराचा पुत्र यहोजाबाद हे होते. तो मरण पावला आणि त्याला दावीदनगरीत पूर्वजांच्या सोबत मूठमाती देण्यात आली. त्याचा पुत्र अमस्याह हा त्याच्या जागी राजा झाला.

  21. यहूदीयाचा राजा अहज्याहचा पुत्र योआशच्या कारकिर्दीच्या तेविसाव्या वर्षी येहूचा पुत्र यहोआहाज शोमरोनमध्ये इस्राएलावर राज्य करू लागला आणि त्याने सतरा वर्षे राज्य केले.

  22. 2 राजे १३:२सुमारे इ.स.पू. ८५६

    पण त्याने याहवेहच्या दृष्टीने वाईट ते केले. नेबाटाचा पुत्र यरोबोअमने इस्राएलांकडून जी पातके करविली ती त्याने अनुसरली आणि त्यापासून तो मागे फिरला नाही.

  23. 2 राजे १३:३सुमारे इ.स.पू. ८५६

    त्याच्या पातकांमुळे याहवेहचा क्रोध इस्राएलावर भडकला आणि त्यांनी त्याला अरामचा राजा हजाएल आणि त्याचा पुत्र बेन-हदादच्या अधीनतेमध्ये बराच काळ ठेवले.

  24. 2 राजे १३:४सुमारे इ.स.पू. ८५६

    तेव्हा यहोआहाजाने याहवेहकडे विनवणी केली आणि याहवेहने त्याचे ऐकले, कारण अरामचा राजा इस्राएलाचा अत्यंत क्रूरपणे छळ करीत होता हे त्यांनी पाहिले.

  25. 2 राजे १३:५सुमारे इ.स.पू. ८५६

    याहवेहने इस्राएली लोकांना सोडविणारा पाठविला आणि त्यांची अरामी लोकांपासून सुटका झाली. त्यानंतर इस्राएली लोक पूर्वीप्रमाणेच आपआपल्या घरात राहू लागले.