- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 930–586 BC
The Divided Kingdom
The kingdom splits into Israel and Judah; prophets warn of judgment as both nations slowly drift into idolatry and exile.
या कालखंडातील वचने
- 2 राजे १३:६सुमारे इ.स.पू. ८५६
परंतु ते यरोबोअमाच्या घराण्याने इस्राएली लोकांना जी पातके करण्यास लावली होती, त्या पातकांपासून मागे फिरले नाहीत. शोमरोनात अशेरा मूर्तीचे स्तंभ देखील उभे होते.
- 2 राजे १३:७सुमारे इ.स.पू. ८५६
यहोआहाजाकडे पन्नास घोडेस्वार, दहा रथ आणि दहा हजार पायदळ याशिवाय काही शिल्लक राहिले नाही, कारण अरामी राजाने त्याच्या बाकीच्या सैन्याचा पायांखालील धुळीच्या कणांप्रमाणे संहार केला होता.
- 2 राजे १३:८सुमारे इ.स.पू. ८५६
यहोआहाजाच्या कारकिर्दीच्या इतर घटना, त्याने जे सर्व केले आणि त्याचे पराक्रम इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात नमूद केलेले नाहीत काय?
- 2 राजे १३:९सुमारे इ.स.पू. ८३९
यहोआहाज आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला आणि त्याला शोमरोनात मूठमाती देण्यात आली. त्याच्यानंतर त्याचा पुत्र योआश त्याच्या जागी राज्य करू लागला.
- 2 राजे १३:१०सुमारे इ.स.पू. ८३९
यहूदीयाचा राजा यहोआशच्या कारकिर्दीच्या सदतिसाव्या वर्षी यहोआहाजाचा पुत्र योआश शोमरोनात इस्राएलावर राज्य करू लागला आणि त्याने सोळा वर्षे राज्य केले.
- 2 राजे १३:११सुमारे इ.स.पू. ८३९
त्याने याहवेहच्या दृष्टीने वाईट ते केले आणि नेबाटाचा पुत्र यरोबोअमच्या पातकांपासून मागे फिरला नाही; जी पातके त्याने इस्राएली लोकांना करण्यास लावली होती, ती तो करत राहिला.
- 2 राजे १३:१२सुमारे इ.स.पू. ८४१
योआशाच्या कारकिर्दीचा बाकीचा इतिहास आणि यहूदीयाचा राजा अमस्याहबरोबर झालेले त्याचे युद्ध व त्याचे पराक्रम यांची नोंद इस्राएली राजांचा इतिहास या ग्रंथात केला नाही काय?
- 2 राजे १३:१३सुमारे इ.स.पू. ८४१
योआश आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला आणि यरोबोअम त्याच्या राजासनावर बसला. योआशाला शोमरोनात इस्राएलांच्या राजांसोबत मूठमाती देण्यात आली.
- 2 राजे १३:१४सुमारे इ.स.पू. ८३८
आता अलीशा ज्या आजाराने मरणार होता त्या आजाराने तो ग्रस्त झाला. इस्राएलाचा राजा योआश त्याला भेटावयाला खाली आला आणि त्याच्यासाठी रडला. तो रडत म्हणाला, “माझ्या पित्या! माझ्या पित्या! तुम्ही इस्राएलचे रथ आणि त्याचे स्वार!”
- 2 राजे १३:१५सुमारे इ.स.पू. ८३८
अलीशा म्हणाला, “एक धनुष्य व काही बाण घे.” आणि त्याने तसेच केले.
- 2 राजे १३:१६सुमारे इ.स.पू. ८३८
“आपल्या हातात धनुष्य घे,” तो इस्राएलाच्या राजाला म्हणाला. जेव्हा त्याने ते आपल्या हातात घेतले, तेव्हा अलीशाने आपला हात राजाच्या हातावर ठेवला.
- 2 राजे १३:१७सुमारे इ.स.पू. ८३८
“पूर्वेकडील खिडकी उघड.” असे अलीशाने म्हटले आणि त्याने ती उघडली. तेव्हा अलीशा म्हणाला, “बाण सोड!” आणि त्याने बाण सोडला. तेव्हा अलीशाने जाहीर केले, “हा याहवेहचा विजयी बाण, अरामावर विजय मिळवून देणारा बाण आहे. तू अफेक येथे अरामी लोकांचा संपूर्ण नाश करशील.”
- 2 राजे १३:१८सुमारे इ.स.पू. ८३८
नंतर त्याने म्हटले, “बाण घे,” आणि राजाने बाण घेतले. अलीशा इस्राएलच्या राजाला म्हणाला, “ते बाण जमिनीवर मार.” त्याने ते बाण तीन वेळा जमिनीवर मारले आणि थांबला.
- 2 राजे १३:१९सुमारे इ.स.पू. ८३८
परमेश्वराचा मनुष्य त्याच्यावर रागावला आणि म्हणाला, “तू पाच किंवा सहा बाण जमिनीवर सोडावयास हवे होतेस; तेव्हा तू अरामचा पराभव आणि पूर्ण नाश केला असतास. परंतु आता तू फक्त तीन वेळाच त्यांचा पराभव करशील.”
- 2 राजे १३:२०सुमारे इ.स.पू. ८३७
अलीशा मरण पावला व त्याला मूठमाती देण्यात आली. मोआबातील लुटारूंच्या टोळ्या प्रत्येक वसंतॠतूत देशावर हल्ला करीत असत.
- 2 राजे १३:२१सुमारे इ.स.पू. ८३७
एके दिवशी काही इस्राएली लोक एका व्यक्तीला मूठमाती देत असताना त्यांनी लुटारूंची टोळी पाहिली; म्हणून त्यांनी त्या मनुष्याचा मृतदेह अलीशाच्या कबरेत लोटून दिला. त्या मृत शरीराला अलीशाच्या अस्थींचा स्पर्श होताच, तो मृत मनुष्य जिवंत झाला आणि आपल्या पायांवर उभा राहिला.
- 2 राजे १३:२२सुमारे इ.स.पू. ८५६
यहोआहाज राजाच्या संपूर्ण कारकिर्दीत अरामचा राजा हजाएल इस्राएली लोकांचा छळ करीत राहिला.
- 2 राजे १३:२३सुमारे इ.स.पू. ८५६
परंतु याहवेहची कृपा इस्राएली लोकांवर होती आणि अब्राहाम, इसहाक व याकोब यांच्याशी केलेल्या करारामुळे त्यांनी त्यांच्यावर दया केली आणि त्यांची काळजी घेतली. आजपर्यंत त्यांचा नाश करण्याची किंवा त्यांना त्यांच्या उपस्थितीतून घालवून देण्याची त्यांची इच्छा नव्हती.
- 2 राजे १३:२४सुमारे इ.स.पू. ८५६
अरामचा राजा हजाएल मरण पावला आणि त्याचा पुत्र बेन-हदाद त्याच्या जागी राज्य करू लागला.
- 2 राजे १३:२५सुमारे इ.स.पू. ८३६
मग यहोआहाजचा पुत्र यहोआशने हजाएलचा पुत्र बेन-हदादच्या हातून त्याचा पिता यहोआहाजशी केलेल्या युद्धात घेतलेली नगरे परत हस्तगत केली. योआशाने त्याचा तीनदा पराभव केला आणि इस्राएलाची नगरे परत घेतली.
- 2 राजे १४:१सुमारे इ.स.पू. ८३९
यहोआहाजचा पुत्र इस्राएलाचा राजा यहोआशच्या कारकिर्दीच्या दुसर्या वर्षी यहूदीयाचा राजा योआशचा पुत्र अमस्याह राज्य करू लागला.
- 2 राजे १४:२सुमारे इ.स.पू. ८३९
वयाच्या पंचवीसाव्या वर्षी तो राजा झाला, त्याने यरुशलेमात एकोणतीस वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यहोअदान होते; ती यरुशलेमची होती.
- 2 राजे १४:३सुमारे इ.स.पू. ८३९
त्याने याहवेहच्या दृष्टीने योग्य ते केले, परंतु त्याचा पिता दावीदासारखे नव्हे. त्याने प्रत्येक गोष्टीत त्याचा पिता योआशचे अनुकरण केले.
- 2 राजे १४:४सुमारे इ.स.पू. ८३९
तरी त्याने डोंगरावरील उच्चस्थळे नष्ट केली नाहीत आणि लोक तिथे जाऊन यज्ञ करीत व धूप जाळीत असत.
- 2 राजे १४:५सुमारे इ.स.पू. ८३८
राज्य त्याच्या पूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतर त्याने त्याचा पिता राजाचा वध करणाऱ्या अधिकाऱ्यांना मृत्युदंड दिला.