- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 930–586 BC
The Divided Kingdom
The kingdom splits into Israel and Judah; prophets warn of judgment as both nations slowly drift into idolatry and exile.
या कालखंडातील वचने
- 2 राजे १५:२सुमारे इ.स.पू. ८१०
तो वयाच्या सोळाव्या वर्षी राजा झाला आणि त्याने यरुशलेममध्ये बावन्न वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यकोल्याह. ती यरुशलेम येथील होती.
- 2 राजे १५:३सुमारे इ.स.पू. ८१०
त्याने त्याचा पिता अमस्याहप्रमाणे याहवेहच्या दृष्टीने जे योग्य ते केले.
- 2 राजे १५:४सुमारे इ.स.पू. ८१०
तरी त्याने डोंगरावरील उच्चस्थळे नष्ट केली नाहीत आणि लोक तिथे जाऊन यज्ञ करीत व धूप जाळीत असत.
- 2 राजे १५:५सुमारे इ.स.पू. ७६५
याहवेहने राजाला पीडले आणि तो मरेपर्यंत त्याला कुष्ठरोग होता. तो वेगळ्या घरात राहिला. राजाचा पुत्र योथामाकडे राजवाड्याचा कारभार होता आणि तो देशाच्या जनतेवर शासन करीत असे.
- 2 राजे १५:६सुमारे इ.स.पू. ७६५
अजर्याहच्या कारकिर्दीतील इतर घटना आणि त्याने जे काही केले ते यहूदीयाच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिलेले नाही काय?
- 2 राजे १५:७सुमारे इ.स.पू. ७५८
अजर्याह आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला त्यांच्याजवळ दावीदनगरीत पुरण्यात आले. आणि त्याचा वारस म्हणून त्याचा पुत्र योथाम राजा झाला.
- 2 राजे १५:८सुमारे इ.स.पू. ७७३
यहूदीयाचा राजा अजर्याहच्या अडतिसाव्या वर्षी यरोबोअमाचा पुत्र जखर्याह शोमरोनात इस्राएलावर राजा झाला आणि त्याने सहा महिने राज्य केले.
- 2 राजे १५:९सुमारे इ.स.पू. ७७३
आपल्या पूर्वजांप्रमाणेच याहवेहच्या दृष्टीने वाईट ते त्याने केले. नेबाटाचा पुत्र यरोबोअमाने जी पातके इस्राएलास करावयास लावली तो त्या पातकांपासून मागे फिरला नाही.
- 2 राजे १५:१०सुमारे इ.स.पू. ७७२
याबेशाचा पुत्र शल्लूमाने जखर्याहविरुद्ध कट रचला. त्याने लोकांसमोर त्याच्यावर हल्ला करून ठार त्याला केले आणि तो त्याच्या ठिकाणी राज्य करू लागला.
- 2 राजे १५:११सुमारे इ.स.पू. ७७२
जखर्याहच्या कारकिर्दीतील इतर घटना इस्राएली राजांच्या इतिहासग्रंथात लिहिलेल्या नाहीत काय?
- 2 राजे १५:१२सुमारे इ.स.पू. ८८४
याहवेहने येहूला दिलेले वचन पूर्ण झाले: “चौथ्या पिढीपर्यंत तुझे वंशज इस्राएलच्या राजासनावर बसतील.”
- 2 राजे १५:१३सुमारे इ.स.पू. ७७२
यहूदीयाचा राजा उज्जीयाहच्या एकोणचाळिसाव्या वर्षी याबेशाचा पुत्र शल्लूम इस्राएलवर राज्य करू लागला आणि त्याने शोमरोनमध्ये एक महिना राज्य केले.
- 2 राजे १५:१४सुमारे इ.स.पू. ७७२
नंतर गादीचा पुत्र मनाहेम हा तिरजाहवरून शोमरोनास गेला आणि त्याने याबेशाचा पुत्र शल्लूमास ठार मारले आणि तो त्याच्या ठिकाणी राज्य करू लागला.
- 2 राजे १५:१५सुमारे इ.स.पू. ७७२
शल्लूम राजाच्या इतर घटना आणि त्याने केलेला कट यांची नोंद इस्राएली राजांचा इतिहासग्रंथात केलेली नाही काय?
- 2 राजे १५:१६सुमारे इ.स.पू. ७७२
त्यावेळी, तिरजाहपासून निघालेल्या मनाहेमाने तिफसाह आणि शहरातील आणि सीमेच्या क्षेत्रातील सर्वांवर हल्ला केला, कारण त्यांनी आपली वेस उघडण्यास नकार दिला. त्याने त्यांना मार दिला आणि सर्व गरोदर महिलांना चिरून टाकले.
- 2 राजे १५:१७सुमारे इ.स.पू. ७७२
यहूदीयाचा राजा अजर्याहच्या कारकिर्दीच्या एकोणचाळिसाव्या वर्षी गादीचा पुत्र मनाहेम हा इस्राएलाचा राजा झाला, त्याने शोमरोनात दहा वर्षे राज्य केले.
- 2 राजे १५:१८सुमारे इ.स.पू. ७७२
याहवेहच्या दृष्टीने वाईट ते त्याने केले. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत नेबाटाचा पुत्र यरोबोअमाने जी पातके इस्राएलास करावयास लावली, त्या पातकांपासून तो मागे फिरला नाही.
- 2 राजे १५:१९सुमारे इ.स.पू. ७७१
तेव्हा अश्शूरचा राजा पूल ने देशावर हल्ला केला आणि मनाहेमने त्याचा पाठिंबा मिळावा आणि आपले राज्य स्थिर व्हावे यासाठी त्याला चांदीचे हजार तालांत दिले.
- 2 राजे १५:२०सुमारे इ.स.पू. ७७१
मनाहेमाने हा पैसा इस्राएलमधून वसूल केला. अश्शूरच्या राजाला द्यायला प्रत्येक श्रीमंत व्यक्तीने पन्नास चांदीचे शेकेल द्यायचे होते. मग अश्शूरचा राजा मागे फिरला आणि देशात राहिला नाही.
- 2 राजे १५:२१सुमारे इ.स.पू. ७७२
मनाहेमाच्या राजवटीतील इतर घटना आणि त्याने जे सर्व केले हे इस्राएली राजांचा इतिहासाग्रंथात नमूद करून ठेवलेले नाही काय?
- 2 राजे १५:२२सुमारे इ.स.पू. ७७२
मनाहेम आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला. आणि त्याच्या जागी त्याचा पुत्र पेकाहियाह हा राज्य करू लागला.
- 2 राजे १५:२३सुमारे इ.स.पू. ७६१
यहूदीयाचा राजा अजर्याहाच्या कारकिर्दीच्या पन्नासाव्या वर्षी मनाहेमचा पुत्र पेकाहियाह शोमरोनात इस्राएलवर राज्य करू लागला, त्याने दोन वर्षे राज्य केले.
- 2 राजे १५:२४सुमारे इ.स.पू. ७६१
पेकाहियाहने याहवेहच्या दृष्टीने वाईट ते केले. नेबाटाचा पुत्र यरोबोअमाने जी पातके इस्राएलास करावयास लावली होती, तो त्या पातकांपासून मागे फिरला नाही.
- 2 राजे १५:२५सुमारे इ.स.पू. ७५९
त्याचा एक मुख्य अधिकारी, रमाल्याहचा पुत्र पेकहने त्याच्याविरुद्ध कट रचला. गिलआदी लोकांपैकी पन्नास लोकांना बरोबर घेऊन त्याने पेकाहियाहला, अर्गोब आणि अरये यांच्यासह शोमरोन येथील राजवाड्याच्या वाड्यात मारले. पेकहने पेकाहियाहयाचा वध केला आणि त्याच्या जागी राजा झाला.
- 2 राजे १५:२६सुमारे इ.स.पू. ७५९
पेकाहियाह राजाच्या राजवटीतील इतर घटना आणि त्याने जे काही केले ते इस्राएली राजांचा इतिहासाग्रंथात लिहून ठेवलेले नाही काय?