- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 930–586 BC
The Divided Kingdom
The kingdom splits into Israel and Judah; prophets warn of judgment as both nations slowly drift into idolatry and exile.
या कालखंडातील वचने
- 2 राजे १६:१४सुमारे इ.स.पू. ७४०
मग त्याने कास्य वेदी जी याहवेहच्या समोर होती, ती त्याने मंदिराच्या पुढून आणली—नवीन वेदी आणि याहवेहच्या मंदिराच्या मधून आणली—आणि नवीन वेदीच्या उत्तरेस ठेवली.
- 2 राजे १६:१५सुमारे इ.स.पू. ७४०
मग आहाज राजाने उरीयाह याजकाला हे आदेश दिले: “या नव्या मोठ्या वेदीवर सकाळचे होमार्पण, संध्याकाळचे अन्नार्पण, राजाची होमार्पण, अन्नार्पण आणि देशातील सर्व लोकांची होमार्पण, आणि त्यांची पेयार्पण ही अर्पण करीत जा. होमार्पणाचे सर्व रक्त आणि यज्ञाचे सर्व रक्त या वेदीवर शिंपडावे. कास्याची जुनी वेदी माझ्यासाठी शकुन पाहण्यासाठी असावी.”
- 2 राजे १६:१६सुमारे इ.स.पू. ७४०
आहाज राजाने आदेश दिल्याप्रमाणे उरीयाह याजकाने केले.
- 2 राजे १६:१७सुमारे इ.स.पू. ७३९
आहाज राजाने बैठकीवरचे नक्षीकाम काढून टाकले आणि त्यावरील पाण्याची टाकी आणि त्यांचे आधार काढून टाकले. कास्याच्या बैलांच्या पाठीवर बसविलेले हौदही त्याने काढले आणि ते दगडाच्या ओट्यावर ठेवले.
- 2 राजे १६:१८सुमारे इ.स.पू. ७३९
अश्शूरच्या राजामुळे त्याने शब्बाथ दिवशी वापरल्या जाणाऱ्या याहवेहच्या मंदिरातील द्वारमंडप आणि राजासाठी बाहेरचा दरवाजा काढून टाकला.
- 2 राजे १६:१९सुमारे इ.स.पू. ७४२
आहाजाच्या कारकिर्दीतील इतर घटना आणि त्याने काय केले हे यहूदीयाच्या राजांच्या इतिहासग्रंथात लिहिलेले नाही काय?
- 2 राजे १६:२०सुमारे इ.स.पू. ७२६
आहाज आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला त्यांच्याजवळ दावीदाच्या नगरात पुरण्यात आले. त्याचा पुत्र हिज्कीयाह वारस म्हणून राजा झाला.
- 2 राजे १७:१सुमारे इ.स.पू. ७३०
यहूदीयाचा राजा आहाजच्या राजवटीच्या बाराव्या वर्षी एलाहचा पुत्र होशे शोमरोनात इस्राएलावर राज्य करू लागला, त्याने नऊ वर्षे राज्य केले.
- 2 राजे १७:२सुमारे इ.स.पू. ७३०
त्याने याहवेहच्या दृष्टीत वाईट ते केले, परंतु त्याच्यापूर्वी जे इस्राएलचे राजा होऊन गेले त्यांच्याइतके केले नाही.
- 2 राजे १७:३सुमारे इ.स.पू. ७३०
अश्शूरचा राजा शल्मनेसरने होशेवर हल्ला करून, त्याला जहागीरदार केले आणि त्याला कर द्यावा लागला.
- 2 राजे १७:४सुमारे इ.स.पू. ७२५
परंतु अश्शूरच्या राजाला होशे फितूर झाल्याचे कळले, कारण त्याने इजिप्त देशाचा राजा सो याच्याकडे दूत पाठविले होते, आणि राजाला निरोप दिला आणि त्याने अश्शूरच्या राजाला दरवर्षीप्रमाणे कर देण्याचे नाकारले. म्हणून अश्शूरचा राजा शल्मनेसरने त्याला कैद केले आणि त्याला तुरुंगात डांबले.
- 2 राजे १७:५सुमारे इ.स.पू. ७२३
आता अश्शूरच्या राजाने संपूर्ण देशावर आक्रमण केले आणि शोमरोनवर चालून गेला आणि तीन वर्षे त्याला वेढा घातला.
- 2 राजे १७:६सुमारे इ.स.पू. ७२१
होशेच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षी अश्शूरच्या राजाने शोमरोन ताब्यात घेतले आणि इस्राएली लोकांना बंदिवान करून अश्शूरला नेले आणि तिथे हलह आणि हाबोर नदीच्या काठावर वसलेल्या गोजान भागात तसेच मेदिया प्रदेशातील नगरांमध्ये वसविले.
- 2 राजे १७:७सुमारे इ.स.पू. ७२१
हे सर्व यासाठी घडले की इस्राएलने याहवेह त्यांच्या परमेश्वराविरुद्ध पाप केले, ज्यांनी त्यांना इजिप्तचा राजा फारोहच्या हातून इजिप्तच्या गुलामगिरीतून सोडवून बाहेर आणले होते, त्यांनी इतर दैवतांची उपासना केली
- 2 राजे १७:८सुमारे इ.स.पू. ७२१
आणि जी राष्ट्रे याहवेहने त्यांच्यापुढून घालवून दिली होती, त्यांच्या चालीरीतींचे, त्याचप्रमाणे इस्राएली राजांनी घातलेल्या चालीरीतींचे अनुसरण केले.
- 2 राजे १७:९सुमारे इ.स.पू. ७२१
इस्राएली लोकांनी त्यांचे याहवेह परमेश्वराविरुद्ध गुप्तपणे, जे अयोग्य होते ते केले. त्यांनी स्वतःसाठी सर्व नगरामध्ये पहारेकऱ्यांच्या बुरुजापासून तर तटबंदीच्या सर्वठिकाणी उच्च स्थाने बांधली.
- 2 राजे १७:१०सुमारे इ.स.पू. ७२१
त्यांनी प्रत्येक डोंगरावर आणि प्रत्येक घनदाट वृक्षाखाली मूर्ति स्थापिल्या आणि अशेरा मूर्तीचे स्तंभ उभारले.
- 2 राजे १७:११सुमारे इ.स.पू. ७२१
ज्या राष्ट्रांना याहवेहने त्यांच्यापुढून घालवून दिले होते, त्यांच्याप्रमाणे त्यांनी प्रत्येक उंचस्थानी धूप जाळले. याहवेहला क्रोध येईल अशी वाईट कृत्ये केली.
- 2 राजे १७:१२सुमारे इ.स.पू. ७२१
याहवेहने त्यांना सांगितले होते, “तुम्ही असे करू नये” तरी त्यांनी मूर्तींची उपासना केली.
- 2 राजे १७:१३सुमारे इ.स.पू. ७२१
याहवेहने इस्राएल आणि यहूदीयाला सर्व संदेष्टे आणि द्रष्टे यांच्याद्वारे चेतावणी दिली होती: “तुमच्या दुष्ट मार्गापासून परावृत्त व्हा. मी तुमच्या पूर्वजांना आज्ञा दिलेल्या आणि माझ्या सेवक संदेष्ट्यांद्वारे तुमच्यापर्यंत पाठविलेल्या संपूर्ण नियमानुसार माझ्या आज्ञा व विधीचे पालन करा.”
- 2 राजे १७:१४सुमारे इ.स.पू. ७२१
परंतु त्यांनी याहवेहचे ऐकले नाही आणि ज्यांनी याहवेह आपल्या परमेश्वरावर विश्वास ठेवला नाही, अशा आपल्या पूर्वजांप्रमाणे ते ताठ मानेचे राहिले,
- 2 राजे १७:१५सुमारे इ.स.पू. ७२१
त्यांनी याहवेहचे विधी आणि त्यांच्या पूर्वजांबरोबर केलेला करार व त्यांचे नियम पाळण्याचा इशारा दिला होता तो त्यांनी नाकारला. ते निरर्थक मूर्तींच्या मागे लागले आणि स्वतःही निरर्थक झाले. जरी परमेश्वराने त्यांना आदेश दिला होता, “ते जसे करतात तसे करू नका,” तरी त्यांनी त्यांच्या सभोवतालच्या राष्ट्रांचे अनुकरण केले.
- 2 राजे १७:१६सुमारे इ.स.पू. ७२१
त्यांनी याहवेह त्यांच्या परमेश्वराच्या, सर्व आज्ञांचा त्याग केला आणि स्वतःसाठी दोन वासरांच्या मूर्ती घडविल्याआणि अशेरास्तंभ घडविले. सर्व नक्षत्रगणांची आणि बआल दैवताची उपासना केली.
- 2 राजे १७:१७सुमारे इ.स.पू. ७२१
त्यांनी आपल्या पुत्रकन्यांचे अग्नीत अर्पण केले. ज्योतिष्यांचा सल्ला घेतला. शकुनविद्येचा उपयोग केला व याहवेहच्या दृष्टीने जे वाईट त्याकरिता त्यांनी स्वतःला विकून त्यांचा क्रोध आपल्यावर भडकविला.
- 2 राजे १७:१८सुमारे इ.स.पू. ७२१
म्हणून याहवेह इस्राएलावर फार संतापले आणि त्यांना आपल्या उपस्थितीतून घालवून दिले. फक्त यहूदाहचे गोत्र तेवढेच राहिले,