मुख्य मजकुरावर जा

circa 930–586 BC

The Divided Kingdom

The kingdom splits into Israel and Judah; prophets warn of judgment as both nations slowly drift into idolatry and exile.

1,722 वचने · 3 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. 2 राजे १८:३सुमारे इ.स.पू. ७२६

    त्याने आपला पिता दावीदाप्रमाणे याहवेहच्या दृष्टीने जे योग्य ते केले.

  2. 2 राजे १८:४सुमारे इ.स.पू. ७२६

    त्याने उच्च स्थाने काढून टाकली, पूजास्तंभ फोडून टाकले, अशेराचे स्तंभ नष्ट करून टाकले. त्याने मोशेने तयार केलेला कास्याच्या सापाचे तुकडे केले, कारण तोपर्यंत इस्राएली लोक त्याच्यापुढे धूप जाळत होते. (त्याला नहुशतान असे म्हणत होते.)

  3. 2 राजे १८:५सुमारे इ.स.पू. ७२६

    हिज्कीयाहचा याहवेह इस्राएलांच्या परमेश्वरावर भरवसा होता. म्हणून यहूदीयाच्या सर्व राजांमध्ये त्याच्यासारखा कोणीही त्याच्या आधी किंवा त्याच्यानंतर झाला नाही.

  4. 2 राजे १८:६सुमारे इ.स.पू. ७२६

    तो याहवेहला धरून राहिला आणि त्यांचे अनुसरण करण्यापासून मागे फिरला नाही; याहवेहने मोशेला दिलेल्या सर्व आज्ञांचे तो पालन करीत राहिला.

  5. 2 राजे १८:७सुमारे इ.स.पू. ७२६

    आणि याहवेह त्याच्याबरोबर होते; त्याने जे काही हाती घेतले त्यात तो यशस्वी झाला. त्याने अश्शूरच्या राजाविरुद्ध बंड पुकारले आणि त्याची सेवा केली नाही.

  6. 2 राजे १८:८सुमारे इ.स.पू. ७२६

    त्याने गाझा आणि त्याच्या सीमेपर्यंत पलिष्ट्यांना पराभूत केले, त्याने पहारेकऱ्यांच्या बुरुजापासून तटबंदीच्या नगरापर्यंत त्यांना मारले.

  7. 2 राजे १८:९सुमारे इ.स.पू. ७२३

    हिज्कीयाह राजाच्या कारकिर्दीच्या चवथ्या वर्षी, म्हणजे इस्राएलाचा राजा एलाहचा पुत्र होशेच्या कारकिर्दीच्या सातव्या वर्षी, अश्शूरच्या शल्मनेसर राजाने शोमरोनवर आक्रमण केले आणि त्याला वेढा घातला.

  8. 2 राजे १८:१०सुमारे इ.स.पू. ७२१

    तिसर्‍या वर्षांच्या शेवटी अश्शूरच्या लोकांनी ते घेतले. शोमरोन हे हिज्कीयाह राजाच्या कारकिर्दीच्या सहाव्या वर्षी आणि इस्राएलचा राजा होशेच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षी ताब्यात घेण्यात आले.

  9. 2 राजे १८:११सुमारे इ.स.पू. ७२१

    मग अश्शूरच्या राजाने इस्राएली लोकांना अश्शूरमध्ये नेले व त्यांना हलह येथे, गोजानातील हाबोर नदीकिनारी व मेदिया लोकांच्या नगरात ठेवले.

  10. 2 राजे १८:१२सुमारे इ.स.पू. ७२१

    हे अशासाठी झाले कारण त्यांनी याहवेह त्यांच्या परमेश्वराची आज्ञा पाळली नाही व त्यांचा करार मोडला; याहवेहचा सेवक मोशेने जे सर्व आज्ञापिले होते, ते त्यांनी ऐकले नाही किंवा त्याचे पालन केले नाही.

  11. 2 राजे १८:१३सुमारे इ.स.पू. ७१३

    हिज्कीयाह राजाच्या कारकिर्दीच्या चौदाव्या वर्षी, अश्शूरचा राजा सन्हेरीबने यहूदीयाच्या सर्व तटबंदीच्या नगरांवर हल्ला केला आणि ती ताब्यात घेतली

  12. 2 राजे १८:१४सुमारे इ.स.पू. ७१३

    म्हणून यहूदीयाचा राजा हिज्कीयाहने लाखीश येथे अश्शूरच्या राजाला हा संदेश पाठविला: “माझ्याकडून चूक झाली आहे. माझ्यापासून परत जा, आणि तुम्ही जी काही खंडणी मागाल ती मी देईल.” अश्शूरच्या राजाने तडजोडीसाठी यहूदीयाचा राजा हिज्कीयाहकडून चांदीचे तीनशे तालांत आणि सोन्याचे तीस तालांत यांची मागणी केली.

  13. 2 राजे १८:१५सुमारे इ.स.पू. ७१३

    तेव्हा हिज्कीयाह राजाने याहवेहच्या मंदिरातील आणि राजवाड्यातील तिजोरीत असलेली सर्व चांदी त्याला दिली.

  14. 2 राजे १८:१६सुमारे इ.स.पू. ७१३

    यावेळी यहूदीयाचा राजा हिज्कीयाहने याहवेहच्या मंदिराची दारे व खांबावर मढविलेले सोने काढले व ते अश्शूरच्या राजाला दिले.

  15. 2 राजे १८:१७सुमारे इ.स.पू. ७१०

    अश्शूरच्या राजाने आपला सेनाप्रमुख, त्याचा प्रमुख अधिकारी आणि त्याचा सरसेनापतीसह मोठ्या सैन्यास लाखीशहून यरुशलेमला हिज्कीयाह राजाकडे पाठविले. ते यरुशलेमजवळ आले आणि वरच्या हौदाच्या पाटाजवळ परिटाच्या शेताच्या मार्गात उभे राहिले.

  16. 2 राजे १८:१८सुमारे इ.स.पू. ७१०

    त्यांनी राजाला बोलाविले; तेव्हा त्याच्या राजवाड्याचा कारभारी एल्याकीम जो हिल्कियाहचा पुत्र, चिटणीस शेबना व इतिहासलेखक योवाह जो आसाफाचा पुत्र होता हे त्याच्याकडे गेले.

  17. 2 राजे १८:१९सुमारे इ.स.पू. ७१०

    तेव्हा सेनाप्रमुख त्यांना म्हणाला, “हिज्कीयाहला सांगा: “ ‘महान राजा, अश्शूरचा राजा असे म्हणतो: तुझा हा भरवसा तू कशावर ठेवला आहेस?

  18. 2 राजे १८:२०सुमारे इ.स.पू. ७१०

    तू म्हणतोस की तुझ्याजवळ युद्ध करण्याची युक्ती आणि सामर्थ्य आहे—परंतु तुम्ही फक्त पोकळ शब्द बोलता. तू कोणावर अवलंबून आहेस की तू माझ्याविरुद्ध बंड करतोस?

  19. 2 राजे १८:२१सुमारे इ.स.पू. ७१०

    पाहा, मला माहीत आहे की तू इजिप्तवर अवलंबून आहेस, पाहा, जी एक तुटलेली वेळूची काठी आहे, जो कोणी त्यावर टिकेल ती त्याच्या हाताला टोचणार! इजिप्तचा राजा फारोह, त्याच्यावर भरवसा ठेवणाऱ्या सर्वांसाठी असेच असल्याचे सिद्ध होते.

  20. 2 राजे १८:२२सुमारे इ.स.पू. ७१०

    पण जर तुम्ही मला म्हणाल, “आम्ही याहवेह आमच्या परमेश्वरावर अवलंबून आहोत.” तर हिज्कीयाहने ज्याची उच्च स्थाने आणि वेद्या काढून घेतल्या आणि यहूदाह आणि यरुशलेमला सांगितले, “तुम्ही यरुशलेममधील याच वेदीवर उपासना करा, तो तोच नाही काय”?

  21. 2 राजे १८:२३सुमारे इ.स.पू. ७१०

    “ ‘तेव्हा आता या आणि आमचा स्वामी, अश्शूरच्या राजाशी करार करा: तुमच्याकडे दोन हजार घोडेस्वार जरी असले तरी मी तुला दोन हजार घोडे देईन!

  22. 2 राजे १८:२४सुमारे इ.स.पू. ७१०

    रथ आणि घोडेस्वारांसाठी तुम्ही इजिप्तवर अवलंबून असताना माझ्या स्वामीच्या सर्वात कनिष्ठ अधिकार्‍यांपैकी एका अधिकाऱ्याचा तुम्ही कसा पराभव करणार?

  23. 2 राजे १८:२५सुमारे इ.स.पू. ७१०

    शिवाय, मी याहवेहशिवाय या ठिकाणावर हल्ला करण्यासाठी आणि नाश करण्यासाठी आलो आहे काय? याहवेहने स्वतःच मला या देशावर हल्ला करण्यास आणि त्याचा नाश करण्यास सांगितले आहे.’ ”

  24. 2 राजे १८:२६सुमारे इ.स.पू. ७१०

    तेव्हा हिल्कियाहचा पुत्र एल्याकीम, शेबना आणि योवाह हे सेनापतीला म्हणाले, “कृपया तुमच्या सेवकांशी अरामी भाषेत बोला, कारण आम्हाला ती समजते. भिंतीवर असलेले लोक ऐकत असताना आमच्याबरोबर यहूदीयाच्या हिब्रू भाषेत बोलू नका.”

  25. 2 राजे १८:२७सुमारे इ.स.पू. ७१०

    परंतु सेनापतीने उत्तर दिले, “माझ्या धन्याने मला या गोष्टी सांगावयास पाठविले होते, ते काय फक्त तुमच्या धन्याला आणि तुम्हाला सांगण्यासाठी आणि भिंतीवर बसलेल्या लोकांसाठी नाही काय; ज्यांना तुमच्यासारखीच स्वतःचीच विष्ठा खावी लागेल आणि स्वतःचेच मूत्र प्यावे लागेल?”