मुख्य मजकुरावर जा

circa 930–586 BC

The Divided Kingdom

The kingdom splits into Israel and Judah; prophets warn of judgment as both nations slowly drift into idolatry and exile.

1,722 वचने · 3 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. 2 राजे १८:२८सुमारे इ.स.पू. ७१०

    मग सेनाप्रमुख उभा राहिला आणि यहूदीयाच्या हिब्रू भाषेत मोठ्याने ओरडून म्हणाला, “महान राजा, अश्शूरच्या राजाचे ऐका!

  2. 2 राजे १८:२९सुमारे इ.स.पू. ७१०

    राजा असे म्हणतात: हिज्कीयाहस तुम्हाला फसवू देऊ नका. मूर्ख बनवू देऊ नका. तो तुम्हाला माझ्या हातून सोडवू शकणार नाही.

  3. 2 राजे १८:३०सुमारे इ.स.पू. ७१०

    ‘याहवेह आपल्याला नक्कीच सोडवतील; हे शहर अश्शूरच्या राजाच्या ताब्यात जाणार नाही.’ असे म्हणून हिज्कीयाहाला तुम्हाला याहवेहवर भरवसा ठेवण्यास प्रवृत्त करू देऊ नका.

  4. 2 राजे १८:३१सुमारे इ.स.पू. ७१०

    “हिज्कीयाहचे ऐकू नका. अश्शूरचे राजा असे म्हणतात: माझ्यासोबत शांतता प्रस्थापित करा आणि माझ्याकडे या. मग तुम्ही आपल्या प्रत्येक द्राक्षवेलीचे आणि अंजिराचे फळ खाल आणि आपल्या विहिरीचे पाणी प्याल,

  5. 2 राजे १८:३२सुमारे इ.स.पू. ७१०

    जोपर्यंत मी येऊन तुम्हाला तुमच्या देशासारख्या देशात; म्हणजेच धान्य आणि नवीन द्राक्षारसाचा देश, भाकरी आणि द्राक्षमळ्यांच्या, जैतून तेलाची झाडे आणि मधाच्या देशात नेत नाही तोपर्यंत. जीवन निवडा, मृत्यू नव्हे! “हिज्कीयाहचे ऐकू नका, कारण ‘याहवेह आम्हाला सोडवतील’ असे सांगून तो तुमची दिशाभूल करीत आहे.

  6. 2 राजे १८:३३सुमारे इ.स.पू. ७१०

    कोणत्याही राष्ट्रांच्या दैवतांनी कधीही अश्शूरच्या राजाच्या हातून आपल्या राष्ट्रांची सुटका केली आहे काय?

  7. 2 राजे १८:३४सुमारे इ.स.पू. ७१०

    हमाथ आणि अर्पादची दैवते कुठे आहेत? सफरवाईम, हेना व इव्वाहची दैवते कुठे आहेत? त्यांनी शोमरोनला माझ्या हातून सोडविले आहे काय?

  8. 2 राजे १८:३५सुमारे इ.स.पू. ७१०

    या देशातील सर्व दैवतांपैकी कोण त्याच्या देशाला माझ्यापासून वाचवू शकले? तर मग याहवेह माझ्या हातातून यरुशलेमची सुटका कशी करू शकतील?”

  9. 2 राजे १८:३६सुमारे इ.स.पू. ७१०

    परंतु लोक गप्प राहिले आणि उत्तर देण्यासाठी काहीच बोलले नाहीत, कारण राजाने आज्ञा केली होती, “त्याला उत्तर देऊ नका.”

  10. 2 राजे १८:३७सुमारे इ.स.पू. ७१०

    यानंतर हिल्कियाहचा पुत्र राजवाड्याचा कारभारी एल्याकीम, चिटणीस शेबना आणि आसाफाचा पुत्र इतिहासलेखक योवाह यांनी आपली वस्त्रे फाडली व हिज्कीयाहकडे जाऊन सेनाप्रमुखाने जे काही सांगितले होते ते त्याला सांगितले.

  11. 2 राजे १९:१सुमारे इ.स.पू. ७१०

    जेव्हा हिज्कीयाह राजाने हे ऐकले, तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडली आणि तो गोणपाट नेसून याहवेहच्या मंदिरात गेला.

  12. 2 राजे १९:२सुमारे इ.स.पू. ७१०

    त्याने राजवाड्याचा कारभारी एल्याकीम, चिटणीस शेबना आणि वडील याजक यांना गोणपाट नेसून आमोजाचा पुत्र यशायाह संदेष्ट्याकडे पाठविले.

  13. 2 राजे १९:३सुमारे इ.स.पू. ७१०

    ते त्याला म्हणाले, “हिज्कीयाह असे म्हणतो: आजचा दिवस क्लेश, शिक्षा व अपमानाचा दिवस आहे, कारण लेकरे होण्याची वेळ आली परंतु ते प्रसवण्याची शक्ती नाही.

  14. 2 राजे १९:४सुमारे इ.स.पू. ७१०

    कदाचित याहवेह तुमचे परमेश्वर सेनाप्रमुखाचे सर्व शब्द ऐकतील, त्याचा स्वामी अश्शूरच्या राजाने आपल्या जिवंत परमेश्वराची निंदा करण्यास पाठविले आहे आणि हे शब्द ऐकून याहवेह तुमचे परमेश्वर त्याचा निषेध करतील. म्हणून जे थोडके उरलेले आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करा.”

  15. 2 राजे १९:५सुमारे इ.स.पू. ७१०

    जेव्हा हिज्कीयाह राजाचे अधिकारी यशायाहकडे आले,

  16. 2 राजे १९:६सुमारे इ.स.पू. ७१०

    यशायाह त्यांना म्हणाला, “तुमच्या धन्याला सांगा, ‘याहवेह असे म्हणतात: तुम्ही जे ऐकले आहे त्यामुळे घाबरून जाऊ नका—त्या शब्दांनी अश्शूरच्या राजाच्या सेवकांनी माझी निंदा केली आहे.

  17. 2 राजे १९:७सुमारे इ.स.पू. ७१०

    ऐका! जेव्हा तो एक ठराविक अहवाल ऐकेल, तेव्हा मी त्याला त्याच्या स्वतःच्या देशात परत जाण्याची इच्छा व्हावी असे करेन आणि तिथे तो तलवारीने वधला जाईल असे मी करेन.’ ”

  18. 2 राजे १९:८सुमारे इ.स.पू. ७१०

    जेव्हा सेनाप्रमुखाने ऐकले की अश्शूरच्या राजाने लाखीश सोडले आहे, तेव्हा त्याने आपला तळ उठविला आणि राजा लिब्नाह येथे युद्ध करताना त्याला आढळला.

  19. 2 राजे १९:९सुमारे इ.स.पू. ७१०

    आता सन्हेरीबला बातमी मिळाली की कूशाचा राजा तिर्‍हाकाह त्याच्याशी युद्ध करण्याच्या तयारीत आहे. म्हणून त्याने पुन्हा हिज्कीयाहकडे असे सांगत दूत पाठवले:

  20. 2 राजे १९:१०सुमारे इ.स.पू. ७१०

    “यहूदीयाचा राजा हिज्कीयाहला हे सांगा: ‘अश्शूरच्या राजाच्या हाती यरुशलेम दिले जाणार नाही’ असे म्हणून तुम्ही ज्या देवावर अवलंबून आहात त्याला तुमची फसवणूक करू देऊ नका.

  21. 2 राजे १९:११सुमारे इ.स.पू. ७१०

    अश्शूरच्या राजाने सर्व राष्ट्रांचा नाश कसा केला, हे तुम्ही ऐकलेच आहे. मग तुमची सुटका होईल काय?

  22. 2 राजे १९:१२सुमारे इ.स.पू. ७१०

    माझ्या पूर्वीच्या राजांनी ज्या राष्ट्रांचा; म्हणजे गोजान, हारान, रेसफ तलास्सारतील एदेन यांचा नाश केला, त्यांना त्यांच्या दैवतांनी वाचविले होते काय?

  23. 2 राजे १९:१३सुमारे इ.स.पू. ७१०

    हमाथ नगरीचा राजा किंवा अर्पादचा राजा हे कुठे आहेत? सफरवाईम, हेना व इव्वाह यांचे राजे कुठे आहेत?”

  24. 2 राजे १९:१४सुमारे इ.स.पू. ७१०

    हिज्कीयाहला दूताद्वारे पत्र मिळाले आणि त्याने ते वाचले. त्यानंतर त्याने जाऊन याहवेहच्या मंदिरात याहवेहसमोर ते उघडून ठेवले.

  25. 2 राजे १९:१५सुमारे इ.स.पू. ७१०

    आणि हिज्कीयाहने याहवेहला प्रार्थना केली: “अहो याहवेह इस्राएलांचे परमेश्वर, करुबांच्या सिंहासनावर आरूढ असलेल्या परमेश्वरा, पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांचे तुम्ही एकमेव परमेश्वर आहात. स्वर्ग व पृथ्वी तुम्हीच उत्पन्न केली आहे.