- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 930–586 BC
The Divided Kingdom
The kingdom splits into Israel and Judah; prophets warn of judgment as both nations slowly drift into idolatry and exile.
या कालखंडातील वचने
- 2 राजे २०:४सुमारे इ.स.पू. ७१३
यशायाह नगरीच्या राजवाड्याच्या आवाराबाहेर जाण्यापूर्वीच याहवेहचे वचन त्याच्याकडे आले:
- 2 राजे २०:५सुमारे इ.स.पू. ७१३
“परत जा आणि माझ्या लोकांचा अधिपती हिज्कीयाहला सांग, ‘तुझे पूर्वज दावीदाचे परमेश्वर, याहवेह असे म्हणतात: मी तुझी प्रार्थना ऐकली आणि तुझे अश्रू पाहिले आहेत; आजपासून तिसर्या दिवशी तू याहवेहच्या मंदिरात जाशील. मी तुझ्या आयुष्यात पंधरा वर्षांची भर घालेन.
- 2 राजे २०:६सुमारे इ.स.पू. ७१३
आणि मी तुला आणि या शहराला अश्शूरच्या राजाच्या हातातून सोडवेन. माझ्या नावाच्या गौरवासाठी व माझा सेवक दावीदासाठी मी या शहराचे रक्षण करेन.’ ”
- 2 राजे २०:७सुमारे इ.स.पू. ७१३
तेव्हा यशायाहने म्हटले, “अंजिराचा लेप तयार करा.” त्यांनी तसे केले आणि त्याच्या गळवावर लावला आणि तो बरा झाला.
- 2 राजे २०:८सुमारे इ.स.पू. ७१३
हिज्कीयाहने यशायाहास विचारले, “याहवेह मला बरे करतील व मी आजपासून तीन दिवसांनी याहवेहच्या मंदिरात जाईन याचे चिन्ह काय असेल?”
- 2 राजे २०:९सुमारे इ.स.पू. ७१३
यशायाहने उत्तर दिले, “याहवेहचे हे चिन्ह तुझ्यासाठी आहे, जे अभिवचन याहवेहने दिले आहे त्याप्रमाणे ते करतील: तू सांग, सावली दहा पावले पुढे जावी कि दहा पावले मागे जावी?”
- 2 राजे २०:१०सुमारे इ.स.पू. ७१३
हिज्कीयाह म्हणाला, “सावली पुढेच जात असते ही साधारण गोष्ट आहे, तेव्हा ती मागे जावी असे करा!”
- 2 राजे २०:११सुमारे इ.स.पू. ७१३
मग यशायाह संदेष्ट्याने याहवेहला हाक मारली, आणि याहवेहने आहाजाच्या सूर्य घड्याळावर सावली दहा पावले मागे सरकविली.
- 2 राजे २०:१२सुमारे इ.स.पू. ७१२
त्यावेळी बाबेलचा राजा बलदानचा पुत्र मरोदख-बलादाना ने हिज्कीयाहला पत्रे आणि भेटवस्तू पाठविल्या, कारण त्याने त्याच्या आजाराबद्दल ऐकले होते.
- 2 राजे २०:१३सुमारे इ.स.पू. ७१२
हिज्कीयाहने राजदूतांचे स्वागत केले आणि त्याच्या भांडारांमध्ये काय आहे ते सर्व दाखविले—चांदी, सोने, मसाले, आणि उत्तम जैतुनाचे तेल—त्याचे संपूर्ण शस्त्रागार आणि त्याच्या खजिन्यामध्ये असलेली सर्व संपत्ती. त्याच्या राजवाड्यात किंवा त्याच्या संपूर्ण राज्यात हिज्कीयाहने त्यांना दाखविले नाही असे काहीही नव्हते.
- 2 राजे २०:१४सुमारे इ.स.पू. ७१२
तेव्हा यशायाह संदेष्टा राजा हिज्कीयाहकडे गेला आणि त्याने विचारले, “ती माणसे काय म्हणाली आणि ती कुठून आली होती?” हिज्कीयाहने उत्तर दिले, “दूरवरील देशातून, ते बाबेलहून आले आहेत.”
- 2 राजे २०:१५सुमारे इ.स.पू. ७१२
संदेष्ट्याने विचारले, “त्यांनी तुझ्या राजवाड्यात काय पाहिले?” हिज्कीयाह म्हणाला, “त्यांनी माझ्या राजवाड्यातील सर्वकाही पाहिले. माझ्या खजिन्यांमध्ये असे काहीही राहिले नाही, जे मी त्यांना दाखविले नाही.”
- 2 राजे २०:१६सुमारे इ.स.पू. ७१२
तेव्हा यशायाह हिज्कीयाहला म्हणाला, “याहवेहचे वचन ऐका:
- 2 राजे २०:१७सुमारे इ.स.पू. ७१२
अशी वेळ निश्चितच येईल जेव्हा तुमच्या राजवाड्यामधील सर्वकाही आणि तुमच्या पूर्वजांनी आजपर्यंत जे काही साठवून ठेवले आहे ते सर्व बाबेलला नेले जाईल. काहीही सोडले जाणार नाही, असे याहवेह म्हणतात.
- 2 राजे २०:१८सुमारे इ.स.पू. ७१२
आणि तुमच्या वंशजांपैकी काही, तुमच्या मांसाचे आणि तुमच्या रक्ताचे जे तुमच्यापासून जन्माला येतील, ते नेले जातील आणि ते बाबेलच्या राजाच्या राजवाड्यात खोजे करण्यात येतील.”
- 2 राजे २०:१९सुमारे इ.स.पू. ७१२
हिज्कीयाहने यशायाहास उत्तर दिले, “तुम्ही बोललेले याहवेह यांचे वचन चांगले आहे,” कारण त्याने असा विचार केला, “माझ्या आयुष्यभरात शांती आणि सुरक्षितता नसणार काय?”
- 2 राजे २०:२०सुमारे इ.स.पू. ७१२
हिज्कीयाहच्या कारकिर्दीतील इतर सर्व घटना, त्याच्या सर्व पराक्रमाबद्दल आणि त्याने तळी व पाट खणून शहरात पाणी कसे आणले ते यहूदीयाच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात नमूद केल्या नाहीत काय?
- 2 राजे २०:२१सुमारे इ.स.पू. ६९८
हिज्कीयाह आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला. आणि त्याचा वारस म्हणून त्याचा पुत्र मनश्शेह राजा झाला.
- 2 राजे २१:१सुमारे इ.स.पू. ६९८
वयाच्या बाराव्या वर्षी मनश्शेह राजा झाला आणि त्याने यरुशलेमात पंचावन्न वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव हेफसीबाह होते.
- 2 राजे २१:२सुमारे इ.स.पू. ६९८
त्याने याहवेहच्या दृष्टीने वाईट ते केले, याहवेहने इस्राएली लोकांतून काढून टाकलेल्या राष्ट्रांच्या अमंगळ प्रथांचे अनुसरण त्याने केले.
- 2 राजे २१:३सुमारे इ.स.पू. ६९८
त्याचे वडील हिज्कीयाहने नष्ट केलेली उच्च स्थाने त्याने पुन्हा बांधली; इस्राएलचा राजा अहाबने केल्याप्रमाणे त्यानेही बआल दैवतांसाठी वेद्या आणि अशेराचे स्तंभ तयार केले. त्याने सर्व तारांगणांना लवून नमन केले आणि त्यांची उपासना केली.
- 2 राजे २१:४सुमारे इ.स.पू. ६९८
त्याने याहवेहच्या मंदिरात वेद्या बांधल्या, ज्याबद्धल याहवेहने म्हटले होते, “मी यरुशलेमात माझे नाव ठेवेन.”
- 2 राजे २१:५सुमारे इ.स.पू. ६९८
याहवेहच्या मंदिराच्या दोन अंगणात त्याने सर्व तारांगणासाठी वेद्या बांधल्या.
- 2 राजे २१:६सुमारे इ.स.पू. ६८३
त्याने आपल्याच पुत्राचे अग्नीत अर्पण केले, जादूटोणा केला, शुभशकुन शोधले आणि भूतविद्यांचा सल्ला घेतला. याहवेहच्या दृष्टीने जे वाईट तसे पुष्कळ काही करून याहवेहचा राग पेटविला.
- 2 राजे २१:७सुमारे इ.स.पू. ६९८
त्याने घडविलेली कोरीव अशेराची स्तंभे घेतली व मंदिरात ठेवली. या मंदिराविषयी याहवेह, दावीद व त्याचा पुत्र शलोमोनला म्हणाले होते, “इस्राएलांच्या सर्व गोत्रांतून मी निवडलेल्या यरुशलेम शहरात व या मंदिरात माझे नाव मी सर्वकाळासाठी ठेवेन.