मुख्य मजकुरावर जा

circa 930–586 BC

The Divided Kingdom

The kingdom splits into Israel and Judah; prophets warn of judgment as both nations slowly drift into idolatry and exile.

1,722 वचने · 3 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. 2 राजे २२:७सुमारे इ.स.पू. ६४२

    परंतु ज्यांच्याजवळ पैसा देण्यात आलेला आहे त्यांचा हिशोब ठेवण्याची गरज नव्हती, कारण ते विश्वासूपणे कार्य करीत आहेत.”

  2. 2 राजे २२:८सुमारे इ.स.पू. ६४२

    मुख्य याजक हिल्कियाहने शाफान चिटणीसाला म्हटले, “मला याहवेहच्या मंदिरात नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला आहे.” त्याने तो शाफानकडे दिला, ज्याने ते वाचले.

  3. 2 राजे २२:९सुमारे इ.स.पू. ६४२

    मग शाफान चिटणीस राजाकडे गेला आणि त्याला अहवाल दिला: “तुझ्या सेवकांना जे पैसे याहवेहच्या मंदिरासाठी मिळाले, त्यांनी ते मंदिराचे कामगार व कामाची देखरेख करणार्‍यांच्या हाती दिले आहेत.”

  4. 2 राजे २२:१०सुमारे इ.स.पू. ६४२

    मग शाफान चिटणीसाने राजाला माहिती दिली, “हिल्कियाह याजकाने मला एक पुस्तक दिले आहे.” आणि शाफानाने राजाच्या उपस्थितीत त्यामधून वाचवून दाखविले.

  5. 2 राजे २२:११सुमारे इ.स.पू. ६४२

    जेव्हा राजाने नियमशास्त्रातील वचने ऐकली, तेव्हा त्याने दुःखाने आपली वस्त्रे फाडली.

  6. 2 राजे २२:१२सुमारे इ.स.पू. ६४२

    त्याने याजक हिल्कियाह, शाफानाचा पुत्र अहीकाम आणि मिखायाहचा पुत्र अकबोर आणि शाफान चिटणीस आणि राजाचा सेवक असायाह यांना हा आदेश दिला:

  7. 2 राजे २२:१३सुमारे इ.स.पू. ६४२

    “जा आणि माझ्यासाठी आणि लोकांसाठी आणि सर्व यहूदीयासाठी, त्यांच्याबद्दल या पुस्तकात लिहिलेले जे काही सापडले आहे, त्याबद्दल याहवेहकडे चौकशी करा. याहवेहचा फार मोठा क्रोध आपल्यावर पेटला आहे, कारण आपल्या पूर्वजांनी याहवेहच्या वचनाचे पालन केले नाही; या पुस्तकात जे सर्वकाही लिहिलेले आहे त्याप्रमाणे ते वागले नाहीत.”

  8. 2 राजे २२:१४सुमारे इ.स.पू. ६४२

    याजक हिल्कियाह, अहीकाम, अकबोर, शाफान आणि असायाह हे हरहसाचा पुत्र, तिकवाहचा पुत्र शल्लूम जो पोशाख भांडाराचा अधिकारी होता, याची पत्नी हुल्दाह जी संदेष्टी होती, तिच्याकडे बोलण्यास गेले. ती यरुशलेमच्या नव्या पेठेत राहत होती.

  9. 2 राजे २२:१५सुमारे इ.स.पू. ६४२

    ती त्यांना म्हणाली, “याहवेह इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ज्या मनुष्याने तुम्हाला माझ्याकडे पाठवले आहे, त्याला सांगा,

  10. 2 राजे २२:१६सुमारे इ.स.पू. ६४२

    ‘याहवेह असे म्हणतात: यहूदीयाच्या राजाने वाचलेल्या ग्रंथात जे सर्व लिहिले आहे त्यानुसार मी या ठिकाणावर आणि येथील लोकांवर संकट आणेन.

  11. 2 राजे २२:१७सुमारे इ.स.पू. ६४२

    कारण त्यांनी माझा त्याग केला आहे आणि इतर दैवतांना धूप जाळले आहेत आणि त्यांच्या हातांनी तयार केलेल्या सर्व मूर्तींमुळे त्याने माझा राग पेटविला आहे आणि माझा राग या जागेवर ओतला जाईल आणि तो शांत होणार नाही.’

  12. 2 राजे २२:१८सुमारे इ.स.पू. ६४२

    ज्याने तुम्हाला याहवेहची चौकशी करण्यासाठी पाठविले आहे त्या यहूदीयाच्या राजाला हे जाऊन सांगा, ‘जे वचन तुम्ही ऐकले त्याबद्दल याहवेह इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात:

  13. 2 राजे २२:१९सुमारे इ.स.पू. ६४२

    कारण तुझे अंतःकरण प्रतिसाद देणारे आहे आणि जेव्हा या ठिकाणाविषयी आणि येथील लोकांविरुद्ध मी जे काही बोललो ते तू ऐकले; की ते शापित होऊन ओसाड पडतील, तेव्हा तू स्वतःला नम्र केलेस आणि तू माझ्यासमोर नम्र झालास आणि तुझी वस्त्रे फाडली आणि माझ्यासमोर रडलास, म्हणून मी तुझे ऐकले आहे, असे याहवेह जाहीर करतात.

  14. 2 राजे २२:२०सुमारे इ.स.पू. ६४२

    म्हणून मी तुला तुझ्या पूर्वजांबरोबर मिळवेन आणि तुला शांतीने पुरले जाईल. या ठिकाणावर मी जे संकट आणणार आहे, ते तुझ्या डोळ्यांना दिसणार नाही.’ ” तेव्हा त्यांनी परत जाऊन तिचे उत्तर राजाला सांगितले.

  15. नंतर राजाने यहूदीया आणि यरुशलेममधील सर्व वडीलजनांना एकत्र बोलाविले.

  16. यहूदीयाचे लोक, यरुशलेम येथील रहिवासी, याजक आणि संदेष्टे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व लोकांबरोबर राजा याहवेहच्या मंदिरात गेला. याहवेहच्या मंदिरात सापडलेल्या कराराच्या ग्रंथातील सर्व शब्द त्याने त्यांना ऐकू जातील असे वाचून दाखविले.

  17. राजा त्या स्तंभाजवळ उभा राहिला आणि त्याने याहवेहसमोर याहवेहचे अनुसरण करणे आणि त्यांच्या आज्ञा, कायदा आणि नियमांचे पालन करणे आणि या ग्रंथात लिहिलेल्या शब्दांचे त्याच्या संपूर्ण अंतःकरणाने आणि संपूर्ण आत्म्याने पालन करण्याच्या कराराची पुष्टी केली. नंतर सर्व लोकांनी आपणास त्या कराराशी वचनबद्ध केले.

  18. राजाने मुख्य याजक हिल्कियाह, इतर याजक आणि मंदिराचे द्वारपाल यांना सूचना दिली की याहवेहच्या मंदिरातील, बआल व अशेरा, सूर्य, चंद्र आणि तारे यांची उपासना करण्यासाठी उपयोगात येणाऱ्या सर्व वस्तू नष्ट कराव्या. राजाने त्या सर्व वस्तू यरुशलेमा बाहेर किद्रोनच्या खोऱ्यातील एक शेतात जाळून टाकल्या आणि त्यांची राख बेथेलास नेली.

  19. यहूदीयाच्या पूर्वीच्या राजांनी नेमलेल्या मूर्तिपूजक याजकांना त्याने ठार मारले. कारण त्यांनी यहूदीया आणि यरुशलेमच्या नगरातील टेकड्यांवरील मंदिरात धूप जाळलेला होता. त्यांनी बआल, सूर्य, चंद्र, तारे व ग्रह यांनाही धूप जाळला होता.

  20. त्याने याहवेहच्या मंदिरातून अमंगळ अशेरामूर्ती काढून टाकली आणि ती यरुशलेमबाहेर किद्रोनच्या खोऱ्याजवळ नेली. तिथे त्याने ती पूर्ण जाळली आणि तिची राख केली आणि ती राख सामान्य लोकांच्या कबरांवर फेकून दिली.

  21. याहवेहच्या मंदिरासभोवती असलेल्या पुरुषगामींची घरेही त्याने पाडून टाकली. या घरातच स्त्रिया अशेराच्या मूर्तींसाठी लागणारे झगे विणीत असत.

  22. यहूदीयाच्या इतर शहरांमध्ये राहणार्‍या याजकांना योशीयाह राजाने यरुशलेमास परत आणले. पर्वतांवरील सर्व मंदिरे तसेच गेबापासून बेअर-शेबा पर्यंतची सर्व मंदिरे त्याने पाडून भ्रष्ट केली. यरुशलेम नगरवेशीजवळील डाव्या बाजूला नगराध्यक्ष यहोशुआच्या वाड्याच्या प्रवेशद्वाराशी असलेली मंदिरेही त्याने नष्ट केली.

  23. जरी उच्च स्थानांच्या मंदिराचे याजक यरुशलेमातील याहवेहच्या वेदीवर सेवा करीत नसत, तरीही ते इतर याजकांच्या बेखमीर भाकरीचे भोजन करावयास बसत असत.

  24. कोणीही आपला पुत्र अथवा कन्या यांचा मोलख दैवताला अग्नीत होम करू नये म्हणून राजाने बेन हिन्नोम खोर्‍यातील तोफेत अशुद्ध केले.

  25. त्याने याहवेहच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ यहूदीयाच्या पूर्वीच्या राजांनी सूर्याला समर्पित केलेल्या घोड्यांचे पुतळे पाडून टाकले. ते नाथान-मेलेक या खोजाच्या कोठडीजवळ होते. योशीयाहने सूर्याला समर्पित रथही अग्नीने जाळून टाकले.