- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 930–586 BC
The Divided Kingdom
The kingdom splits into Israel and Judah; prophets warn of judgment as both nations slowly drift into idolatry and exile.
या कालखंडातील वचने
- 2 राजे २३:३७सुमारे इ.स.पू. ६१०
त्याच्या पूर्वजांच्या प्रमाणे त्याने याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते केले.
यहोयाकीमच्या कारकिर्दीत, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने देशावर स्वारी केली, आणि यहोयाकीम तीन वर्षे त्याचा ताबेदार राहिला. पण नंतर तो नबुखद्नेस्सरच्या विरोधात गेला आणि त्याने बंड पुकारले.
याहवेहने यहूदाहचा नाश करण्यासाठी यहूदीयावर खास्द्यांच्या, अरामी, मोआबी व अम्मोनी यांच्या टोळ्या पाठविल्या, असे घडणार हे भविष्य याहवेहने आपल्या संदेष्ट्याद्वारे आधी केलेले होते.
निश्चितच याहवेहच्या आज्ञेनुसार त्यांनी त्यांना आपल्या उपस्थितीतून घालून द्यावे म्हणून हे संकट यहूदीयावर आले, कारण मनश्शेहचे पाप आणि त्याने जे सर्व केले,
त्यासोबत निर्दोषाचे रक्त सांडणे हे सम्मिलीत होते. त्याने यरुशलेम निर्दोषांच्या रक्ताने भरून टाकले, त्यामुळे याहवेहने त्यांना क्षमा करण्याचे नाकारले.
यहोयाकीमच्या कारकिर्दीतील इतर घटना, आणि त्याने सर्व जे केले ते यहूदीयाच्या राजांच्या इतिहासग्रंथात लिहिलेले नाही काय?
- 2 राजे २४:६सुमारे इ.स.पू. ५९९
यहोयाकीम आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला. आणि त्याचा वारस त्याचा पुत्र यहोयाखीन राजा झाला.
- 2 राजे २४:७सुमारे इ.स.पू. ५९९
इजिप्तचा राजा पुन्हा कधीही आपल्या देशातून बाहेर आला नाही, कारण बाबेलच्या राजाने इजिप्तच्या ओहोळापासून फरात नदीपर्यंतचा त्याचा सर्व प्रदेश आपल्या सत्तेखाली आणला होता.
- 2 राजे २४:८सुमारे इ.स.पू. ५९९
वयाच्या अठराव्या वर्षी यहोयाखीन राजा झाला, आणि त्याने यरुशलेमात तीन महिने राज्य केले. त्याच्या आईचे नाव नेहूष्टा होते. ती एलनाथानची कन्या असून यरुशलेमची होती.
- 2 राजे २४:९सुमारे इ.स.पू. ५९९
त्याने त्याच्या पित्याप्रमाणेच याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते केले.
- 2 राजे २४:१०सुमारे इ.स.पू. ५९९
त्याच्याच कारकिर्दीत बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरच्या सैन्याने यरुशलेमावर स्वारी करून शहरास वेढा दिला,
- 2 राजे २४:११सुमारे इ.स.पू. ५९९
आणि त्याचे अधिकारी हा वेढा घालत असताना बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर स्वतः शहरात आला.
- 2 राजे २४:१२सुमारे इ.स.पू. ५९९
यहूदीयाचा राजा यहोयाखीन, त्याची आई, त्याचे सेवक, त्याच्या राजघराण्यातील सेवक आणि त्याचे अधिकारी हे सर्व त्याला शरण गेले. बाबेलचा राजाच्या कारकिर्दीच्या आठव्या वर्षी, त्याने यहोयाखीनला कैदी बनविले.
- 2 राजे २४:१३सुमारे इ.स.पू. ५९९
याहवेहने घोषणा केल्याप्रमाणे, नबुखद्नेस्सरने याहवेहच्या मंदिरातील व राजवाड्यातील सर्व संपत्ती लुटून नेली आणि इस्राएलाच्या शलोमोन राजाने याहवेहच्या मंदिरासाठी ठेवलेले सोन्याचे कटोरे तोडून त्यांचे तुकडे केले.
- 2 राजे २४:१४सुमारे इ.स.पू. ५९९
यरुशलेम येथील लोक त्याने बंदिवासात नेले: सर्व अधिकारी आणि लढाऊ पुरुष आणि सर्व कुशल कामगार आणि कारागीर—एकूण दहा हजार. देशात फक्त सर्वात गरीब लोक उरले.
- 2 राजे २४:१५सुमारे इ.स.पू. ५९९
नबुखद्नेस्सर यहोयाखीनला बंदी करून बाबेलला घेऊन गेला. त्याने राजाची आई, त्याच्या पत्नी, त्याचे अधिकारी आणि देशातील प्रतिष्ठित लोकांना देखील यरुशलेमहून बाबेलला नेले.
- 2 राजे २४:१६सुमारे इ.स.पू. ५९९
बाबेलच्या राजाने युद्धासाठी सक्षम आणि बलवान योद्धांचे संपूर्ण सात हजार सैन्य आणि एक हजार कुशल कारागीर आणि लोहार बाबेलला नेले.
- 2 राजे २४:१७सुमारे इ.स.पू. ५९९
बाबेलच्या राजाने यहोयाखीनचा काका मत्तन्याहला त्याच्या ठिकाणी राजा केले आणि त्याने त्याचे नाव बदलून ते सिद्कीयाह असे ठेवले.
- 2 राजे २४:१८सुमारे इ.स.पू. ५९९
सिद्कीयाह एकवीस वर्षाचा असताना राजा झाला आणि त्याने यरुशलेमात अकरा वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव हमूटल असून ती लिब्नाह येथील यिर्मयाहची कन्या होती.
- 2 राजे २४:१९सुमारे इ.स.पू. ५९९
यहोयाकीमप्रमाणेच त्याने याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते केले.
- 2 राजे २४:२०सुमारे इ.स.पू. ५९९
यरुशलेम व यहूदीयामध्ये हे सर्व याहवेहच्या क्रोधामुळे घडले आणि शेवटी त्यांनी या लोकांना स्वतःच्या समक्षतेतून काढून टाकले. आता सिद्कीयाहने बाबेलच्या राजाविरुद्ध बंड केले.
- 2 राजे २५:१सुमारे इ.स.पू. ५९०
म्हणून सिद्कीयाह राजाच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षी, दहाव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने आपले सर्व सैन्य घेऊन यरुशलेमवर आक्रमण केले व त्याच्या सभोवार वेढा घालून मोर्चे बांधले.
- 2 राजे २५:२सुमारे इ.स.पू. ५९०
सिद्कीयाह राजाच्या कारकिर्दीच्या अकराव्या वर्षापर्यंत शहराला वेढा दिलेला होता.
- 2 राजे २५:३सुमारे इ.स.पू. ५८८
चौथ्या महिन्याच्या नवव्या दिवशी, शहरातील दुष्काळ इतका भयंकर झाला की लोकांना खाण्यासाठी अन्न राहिले नाही.
- 2 राजे २५:४सुमारे इ.स.पू. ५८८
तेव्हा नगराचा तट तोडण्यात आला व सर्व सैनिक पळून गेले. सभोवताली बाबिलोनी सैन्याचा वेढा असूनही त्यांनी रात्रीच्या वेळी राजाच्या बागेजवळ दोन भिंतीमध्ये असलेल्या वेशीतून अराबाहच्या दिशेने पळ काढला,