मुख्य मजकुरावर जा

circa 1406–1380 BC

Conquest of Canaan

Joshua leads Israel across the Jordan into the promised land, defeating the Canaanite kingdoms one by one.

658 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. यहोशुआ २:८सुमारे इ.स.पू. १४५१

    रात्री ते हेर झोपी जाण्यापूर्वी ती घराच्या धाब्यावर गेली

  2. यहोशुआ २:९सुमारे इ.स.पू. १४५१

    आणि त्यांना म्हणाली, “मला माहीत आहे की, हा देश याहवेहने तुम्हाला दिलेला आहे आणि तुमच्या भीतीमुळे आम्ही धास्तावून गेलो आहोत, म्हणून या देशात राहणारे सर्व लोक तुमच्या भीतीने थरथरत आहेत.

  3. यहोशुआ २:१०सुमारे इ.स.पू. १४५१

    कारण जेव्हा तुम्ही इजिप्त देशातून बाहेर पडला त्यावेळेस तुमच्यासाठी तांबड्या समुद्रातून याहवेहने मार्ग कसा तयार केला, याबद्दल आम्ही ऐकले आहे आणि यार्देनेच्या पूर्वेस असणार्‍या सीहोन व ओग या दोन अमोर्‍यांच्या राजांचा तुम्ही कसा संपूर्ण नाश केला, याबद्दल आम्ही ऐकले आहे.

  4. यहोशुआ २:११सुमारे इ.स.पू. १४५१

    जेव्हा आम्ही या गोष्टी ऐकल्या, तेव्हा आमची अंतःकरणे भीतीने थरारून गेली आणि प्रत्येकाचे धैर्य थंड पडले, कारण याहवेह जे तुमचे परमेश्वर वर स्वर्गात आहेत ते परमेश्वर पृथ्वीवर सुद्धा आहेत.

  5. यहोशुआ २:१२सुमारे इ.स.पू. १४५१

    “तर आता मला याहवेहकडून वचन द्या की तुम्ही माझ्या कुटुंबावर दया दाखवाल, कारण मी तुमच्यावर दया दाखविली आहे. मला खात्रीने एक चिन्ह द्या,

  6. यहोशुआ २:१३सुमारे इ.स.पू. १४५१

    की माझे आई आणि वडील, माझे भाऊ आणि बहिणी आणि त्यांच्या कुटुंबातील सर्वांचे प्राण वाचवाल आणि आम्हाला मृत्यूपासून सोडवाल.”

  7. यहोशुआ २:१४सुमारे इ.स.पू. १४५१

    “आम्ही तुमच्या जिवास जीव देऊ!” त्या पुरुषांनी तिला खात्री दिली. “आम्ही जे काही करीत आहोत ते जर तू सांगणार नाहीस, तर जेव्हा याहवेह हा प्रदेश आमच्या हाती देतील, आम्ही तुला दयेने वागवू आणि तुझ्याबरोबर विश्वासू राहू.”

  8. यहोशुआ २:१५सुमारे इ.स.पू. १४५१

    तेव्हा तिने खिडकीतून दोरी टाकून त्यांना खाली उतरविले कारण तिचे घर गावकुसावर होते.

  9. यहोशुआ २:१६सुमारे इ.स.पू. १४५१

    ती त्यांना म्हणाली, “तुम्ही डोंगराकडे पळून जा म्हणजे तुमचा शोध घेणार्‍यांना तुम्ही सापडणार नाही. जोपर्यंत ते परत येत नाहीत, तोपर्यंत तीन दिवस तिथेच लपून राहा आणि नंतर तुम्ही तुमच्या मार्गाने परत जा.”

  10. यहोशुआ २:१७सुमारे इ.स.पू. १४५१

    आता ते पुरुष तिला म्हणाले, “जेव्हा आम्ही या प्रदेशात प्रवेश करू त्यावेळेस किरमिजी रंगाचा हा दोर, ज्याने तू आम्हाला खाली सोडलेस तो तुझ्या खिडकीतून लोंबताना आम्हाला दिसला नाही आणि तुझे वडील आणि आई, तुझे भाऊ आणि तुझ्या सर्व कुटुंबाला तुझ्या घरात आणले नाहीस तर, तू जे वचन आमच्याकडून शपथ घालून घेतले आहेस, ते आमच्यावर बंधनकारक राहणार नाही.

  11. यहोशुआ २:१८सुमारे इ.स.पू. १४५१

    Behold, when we come into the land, thou shalt bind this line of scarlet thread in the window which thou didst let us down by: and thou shalt bring thy father, and thy mother, and thy brethren, and all thy father's household, home unto thee.

  12. यहोशुआ २:१९सुमारे इ.स.पू. १४५१

    जर त्यांच्यापैकी कोणीही घराबाहेर रस्त्यावर जातील तर त्यांचे रक्त त्यांच्याच माथ्यावर राहेल, आम्ही त्याला जबाबदार नसणार. जे तुझ्या घरात तुझ्याबरोबर आहेत जर त्यांना काही झाले तर त्यांचे रक्त आमच्या माथ्यावर असेल.

  13. यहोशुआ २:२०सुमारे इ.स.पू. १४५१

    परंतु जर तू आम्ही काय करीत आहोत हे कोणाला सांगितलेस तर, ही शपथ जी तू आमच्याकडून वाहून घेतली आहेस त्यातून आम्ही मुक्त होऊ.”

  14. यहोशुआ २:२१सुमारे इ.स.पू. १४५१

    “मला मान्य आहे,” ती म्हणाली. “तुमच्या म्हणण्याप्रमाणे होवो.” तेव्हा तिने त्यांना पाठवून दिले आणि ते निघून गेले आणि तिने किरमिजी रंगाचा दोर तिच्या खिडकीला बांधला.

  15. यहोशुआ २:२२सुमारे इ.स.पू. १४५१

    जेव्हा ते डोंगराळ भागाकडे निघून गेले आणि तीन दिवस तिथे राहिले, तोपर्यंत शोध करणार्‍यांनी सर्व रस्त्यांवर त्यांचा शोध घेतला आणि काही न सापडता ते परत आले.

  16. यहोशुआ २:२३सुमारे इ.स.पू. १४५१

    नंतर ते दोन पुरुष परत मागे निघाले. डोंगर उतरले आणि नदी पार करून नूनाचा पुत्र यहोशुआकडे आले आणि त्यांच्या बाबतीत घडलेल्या सर्व गोष्टी त्याला सांगितल्या.

  17. यहोशुआ २:२४सुमारे इ.स.पू. १४५१

    ते यहोशुआला म्हणाले, “याहवेहने तो संपूर्ण प्रदेश निश्चितच आपल्या हाती दिला आहे; तेथील सर्व लोक आपल्यामुळे भयभीत झालेले आहेत.”

  18. यहोशुआ ३:१सुमारे इ.स.पू. १४५१

    दुसर्‍या दिवशी पहाटेच यहोशुआ आणि सर्व इस्राएली लोकांनी शिट्टीम सोडले आणि ते यार्देन नदी पार करण्यापूर्वी त्यांनी काही दिवस तिथेच तळ दिला.

  19. यहोशुआ ३:२सुमारे इ.स.पू. १४५१

    मग तीन दिवसानंतर अधिकार्‍यांनी छावणीत फिरून लोकांना या सूचना दिल्या:

  20. यहोशुआ ३:३सुमारे इ.स.पू. १४५१

    “तुम्ही जेव्हा याहवेह तुमचे परमेश्वराच्या कराराचा कोश व तो वाहत असणार्‍या लेवी याजकांना पाहाल, तेव्हा तुमच्या ठिकाणातून निघून त्यांच्या पाठोपाठ जा.

  21. यहोशुआ ३:४सुमारे इ.स.पू. १४५१

    तेव्हा कोणत्या मार्गाने जावे हे तुम्हाला समजेल, कारण तुम्ही या मार्गाने पूर्वी कधी गेला नाही. परंतु तुमच्यात व कोशात अंदाजे वीस हजार हाताचे अंतर असावे; तुम्ही त्याजवळ जाऊ नये.”

  22. यहोशुआ ३:५सुमारे इ.स.पू. १४५१

    मग यहोशुआने लोकांना सांगितले, “तुम्ही शुद्ध व्हा, कारण उद्या तुम्हामध्ये याहवेह एक महान चमत्कार करणार आहेत.”

  23. यहोशुआ ३:६सुमारे इ.स.पू. १४५१

    यहोशुआने याजकांस म्हटले, “कराराचा कोश उचलून घ्या आणि लोकांच्या पुढे चला.” तेव्हा त्यांनी कोश घेतला व लोकांच्या पुढे निघाले.

  24. यहोशुआ ३:७सुमारे इ.स.पू. १४५१

    मग याहवेह यहोशुआस म्हणाले, “आज मी तुला मोठा सन्मान बहाल करणार आहे, म्हणजे सर्व इस्राएली लोकांना कळून येईल की, मी जसा मोशेबरोबर होतो, अगदी तसाच तुझ्याबरोबर देखील आहे.

  25. यहोशुआ ३:८सुमारे इ.स.पू. १४५१

    कराराचा कोश वाहून नेणार्‍या याजकांना सांग, ‘जेव्हा तुम्ही यार्देन नदीच्या पाण्याच्या काठावर पोहोचाल तेव्हा जा व नदीत उभे राहा.’ ”