- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1406–1380 BC
Conquest of Canaan
Joshua leads Israel across the Jordan into the promised land, defeating the Canaanite kingdoms one by one.
या कालखंडातील वचने
- यहोशुआ ३:९सुमारे इ.स.पू. १४५१
मग यहोशुआने इस्राएली लोकांस म्हटले, “इकडे या व याहवेह तुमच्या परमेश्वराचे शब्द ऐका.
- यहोशुआ ३:१०सुमारे इ.स.पू. १४५१
यहोशुआ म्हणाला, अशाप्रकारे तुम्हाला कळेल की जिवंत परमेश्वर तुमच्यामध्ये आहेत व कनानी, हिथी, हिव्वी, परिज्जी, गिर्गाशी, अमोरी व यबूसींना ते खचितच तुमच्या समोरून घालवून देतील.
- यहोशुआ ३:११सुमारे इ.स.पू. १४५१
पाहा, अखिल पृथ्वीच्या प्रभूच्या कराराचा कोश तुमच्यापुढे यार्देन नदीत प्रवेश करेल.
- यहोशुआ ३:१२सुमारे इ.स.पू. १४५१
तर आता इस्राएलच्या प्रत्येक गोत्रातून एक असे बारा पुरुष निवडा.
- यहोशुआ ३:१३सुमारे इ.स.पू. १४५१
याहवेह अखिल पृथ्वीच्या प्रभूच्या कराराचा कोश वाहून नेणार्या याजकांचे पाय यार्देनला लागताच, वरून वाहत येणारे पाणी थांबेल व त्याची रास उभी राहील.”
- यहोशुआ ३:१४सुमारे इ.स.पू. १४५१
जेव्हा यार्देन नदी पार करण्यासाठी लोकांनी आपली छावणी उठविली, तेव्हा कराराचा कोश वाहून नेणारे याजक त्यांच्या पुढे निघाले.
- यहोशुआ ३:१५सुमारे इ.स.पू. १४५१
तो हंगामाचा काळ होता व त्या संपूर्ण काळात यार्देन नदीला पूर आलेला असतो. तरीही कोश वाहणारे याजक यार्देनपर्यंत पोहोचताच व त्यांचे पाय पाण्याला स्पर्श करताच,
- यहोशुआ ३:१६सुमारे इ.स.पू. १४५१
वरून वाहत येणारे पाण्याचे प्रवाह थांबले. सारेथान जवळील आदाम नावाच्या गावात खूप अंतरावर पाण्याची एक रास झाली, तर अराबाच्या समुद्राकडे (म्हणजे मृत समुद्रात) वाहणारे पाणी पूर्णपणे कापले गेले. तेव्हा लोक यरीहो समोर नदीपलीकडे गेले.
- यहोशुआ ३:१७सुमारे इ.स.पू. १४५१
सर्व इस्राएली लोकांच्या संपूर्ण राष्ट्राने कोरड्या जमिनीवरून पलीकडे जाईपर्यंत, याहवेहचा कराराचा कोश वाहून नेणारे याजक यार्देनेच्या मध्यभागी थांबले आणि कोरड्या जमिनीवर उभे राहिले.
- यहोशुआ ४:१सुमारे इ.स.पू. १४५१
जेव्हा सर्व लोकांनी यार्देन नदी ओलांडली, तेव्हा याहवेह यहोशुआला म्हणाले,
- यहोशुआ ४:२सुमारे इ.स.पू. १४५१
“लोकातील प्रत्येक गोत्रातून एक अशा बारा पुरुषांची निवड कर,
- यहोशुआ ४:३सुमारे इ.स.पू. १४५१
आणि त्यांना सांग की त्यांनी यार्देनेच्या मध्यभागातून, म्हणजे जिथे याजक उभे आहेत, तिथून बारा धोंडे उचलून घ्यावे आणि ते तुमच्याबरोबर घेऊन आज रात्री ज्या ठिकाणी तुम्ही राहणार आहात त्या ठिकाणी ठेवावे.”
- यहोशुआ ४:४सुमारे इ.स.पू. १४५१
तेव्हा यहोशुआने इस्राएलच्या प्रत्येक गोत्रातून एक अशा बारा पुरुषास निवडले व त्यांना बोलाविले,
- यहोशुआ ४:५सुमारे इ.स.पू. १४५१
आणि यहोशुआ त्यांना म्हणाला, “यार्देनेच्या मध्यभागी जिथे याहवेह तुमच्या परमेश्वराचा कोश आहे त्याच्यापुढे जा. तिथून तुमच्यातील प्रत्येकाने एक धोंडा खांद्यावर वाहून आणावा. इस्राएलच्या बारा गोत्रातील प्रत्येक गोत्रामागे एक, असे एकूण बारा धोंडे तुम्ही बारा जणांनी आणावे.
- यहोशुआ ४:६सुमारे इ.स.पू. १४५१
ते आपल्यासाठी एक चिन्ह असेल, यासाठी की जेव्हा भावी काळात तुमची मुलेबाळे तुम्हाला विचारतील, ‘या धोंड्यांचा अर्थ काय आहे?’
- यहोशुआ ४:७सुमारे इ.स.पू. १४५१
तेव्हा तुम्हाला त्यांना सांगता येईल, याहवेहच्या कराराच्या कोशासमोर यार्देन नदीचा वाहता प्रवाह थांबला होता. जेव्हा त्यांनी यार्देन पार केली, तेव्हा यार्देन नदीच्या पाण्याचा प्रवाह दुभागला होता. हे धोंडे इस्राएली लोकांसाठी कायमचे स्मारक चिन्ह असावे.”
- यहोशुआ ४:८सुमारे इ.स.पू. १४५१
तेव्हा इस्राएली लोकांनी यहोशुआने सांगितल्याप्रमाणे केले. याहवेहने यहोशुआला आज्ञापिल्यानुसार प्रत्येक गोत्रामागे एक याप्रमाणे बारा धोंडे त्यांनी यार्देन नदीच्या मध्यभागातून उचलले व ज्या ठिकाणी त्यांनी छावणी दिली, त्या ठिकाणी ते धोंडे ठेवले.
- यहोशुआ ४:९सुमारे इ.स.पू. १४५१
यहोशुआने यार्देन नदीच्या मध्यभागी असलेले बारा धोंडे जिथे कराराचा कोश वाहून नेणारे याजक उभे होते तिथे उभे केले आणि आजपर्यंत ते तिथेच आहेत.
- यहोशुआ ४:१०सुमारे इ.स.पू. १४५१
मोशेने यहोशुआला सुचविल्याप्रमाणे, याहवेहने यहोशुआला ज्या आज्ञा होत्या, त्या पूर्ण होईपर्यंत कोश वाहणारे याजक यार्देन नदीच्या मध्यभागी उभे राहिले, तेव्हा लोकांनी घाईने नदी ओलांडली.
- यहोशुआ ४:११सुमारे इ.स.पू. १४५१
त्या सर्वांनी नदी पार करणे संपविताच याहवेहचा कोश व याजक सर्व लोकांच्या देखत पलीकडे गेले.
- यहोशुआ ४:१२सुमारे इ.स.पू. १४५१
मग मोशेने त्यांना सांगितल्याप्रमाणे रऊबेन, गाद आणि मनश्शेहचे अर्धे गोत्र इस्राएली लोकांपुढे युद्धासाठी सुसज्ज होऊन पुढे निघाले.
- यहोशुआ ४:१३सुमारे इ.स.पू. १४५१
युद्धासाठी सुसज्ज झालेले सुमारे चाळीस हजार पुरुष याहवेहसमोर यरीहोच्या मैदानात पलीकडे गेले.
- यहोशुआ ४:१४सुमारे इ.स.पू. १४५१
त्या दिवशी याहवेहने यहोशुआला सर्व इस्राएली लोकांच्या दृष्टीत सन्मानित केले आणि जसे त्यांनी मोशेच्या संपूर्ण आयुष्यभर त्याचा आदर केला, तसाच त्यांनी यहोशुआचाही केला.
- यहोशुआ ४:१५सुमारे इ.स.पू. १४५१
नंतर याहवेह यहोशुआला म्हणाले,
- यहोशुआ ४:१६सुमारे इ.स.पू. १४५१
“याजकांना आज्ञा दे, कराराच्या नियमांचा कोश घेऊन यार्देन नदीतून वर या.”