मुख्य मजकुरावर जा

circa 1406–1380 BC

Conquest of Canaan

Joshua leads Israel across the Jordan into the promised land, defeating the Canaanite kingdoms one by one.

658 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. यहोशुआ ४:१७सुमारे इ.स.पू. १४५१

    तेव्हा यहोशुआने याजकांना आज्ञा दिली, “यार्देन नदीतून वर या.”

  2. यहोशुआ ४:१८सुमारे इ.स.पू. १४५१

    आणि याजक याहवेहच्या कराराचा कोश घेऊन यार्देन नदीच्या पात्रातून वर आले. त्यांनी त्यांचे पाय कोरड्या जमिनीवर ठेवताच, नदीचे पाणी परत मूळ ठिकाणी आले आणि पूर्वीप्रमाणे ते भरून वाहू लागले.

  3. यहोशुआ ४:१९सुमारे इ.स.पू. १४५१

    पहिल्या महिन्याच्या दहाव्या दिवशी ते यार्देनेतून वर आले आणि यरीहोच्या पूर्व सीमेवरील गिलगाल येथे त्यांनी छावणी घातली.

  4. यहोशुआ ४:२०सुमारे इ.स.पू. १४५१

    आणि यहोशुआने गिलगाल येथे यार्देनेतून बाहेर काढलेल्या बारा धोंड्यांची रचना केली.

  5. यहोशुआ ४:२१सुमारे इ.स.पू. १४५१

    तो इस्राएली लोकांना म्हणाला, “भविष्यकाळात तुमचे वंशज त्यांच्या वडिलांना विचारतील, ‘या धोंड्यांचा अर्थ काय आहे?’

  6. यहोशुआ ४:२२सुमारे इ.स.पू. १४५१

    त्यांना सांग, ‘इस्राएली लोक यार्देन नदीतून कोरड्या जमिनीवरून पलीकडे आले.’

  7. यहोशुआ ४:२३सुमारे इ.स.पू. १४५१

    कारण याहवेह तुमच्या परमेश्वरांनी तुम्ही यार्देन नदी पार करेपर्यंत तुमच्यासमोर नदीचे पात्र कोरडे ठेवले. याहवेह तुमच्या परमेश्वरांनी यार्देन नदीचे जसे केले तसेच त्यांनी आम्ही लाल समुद्र पार करेपर्यंत तो कोरडा केला होता.

  8. यहोशुआ ४:२४सुमारे इ.स.पू. १४५१

    हे त्यांनी यासाठी केले की, पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना कळावे की याहवेह सामर्थ्यशाली आहेत आणि म्हणून तुम्ही सदैव याहवेह तुमच्या परमेश्वराचे भय बाळगावे.”

  9. यहोशुआ ५:१सुमारे इ.स.पू. १४५१

    आता जेव्हा यार्देनेच्या पश्चिमेकडील सर्व अमोरी राजांनी आणि किनार्‍यावरील सर्व कनानी राजांनी ऐकले की, याहवेहनी कशाप्रकारे इस्राएली लोकांसमोर ते पार करून जाईपर्यंत यार्देन नदी कोरडी करून दिली, त्यांची अंतःकरणे भीतीने गळून गेली आणि पुन्हा इस्राएली लोकांना सामोरे जाण्यास त्यांना धैर्य राहिले नाही.

  10. यहोशुआ ५:२सुमारे इ.स.पू. १४५१

    त्यावेळेस याहवेहनी यहोशुआस सांगितले, “गारगोटीच्या सुर्‍या तयार कर आणि ज्या इस्राएली लोकांची रानात सुंता झाली नव्हती त्यांची सुंता कर.”

  11. यहोशुआ ५:३सुमारे इ.स.पू. १४५१

    तेव्हा यहोशुआने गारगोटीच्या सुर्‍या तयार केल्या आणि गिबियाथ हारालोथ या ठिकाणी इस्राएली लोकांची सुंता केली.

  12. यहोशुआ ५:४सुमारे इ.स.पू. १४५१

    यहोशुआने सुंता यासाठी केली की: इजिप्त देश सोडून जे सर्व बाहेर आले—युद्धाचे वय असलेले सर्व पुरुष—इजिप्त सोडून येत असताना रानामध्ये मरण पावले.

  13. यहोशुआ ५:५सुमारे इ.स.पू. १४५१

    बाहेर पडलेल्या सर्व पुरुषांची सुंता झाली होती, परंतु इजिप्त सोडल्यानंतरच्या प्रवासाच्या काळात जे सर्व पुरुष जन्मले त्यांची सुंता झाली नव्हती.

  14. यहोशुआ ५:६सुमारे इ.स.पू. १४५१

    इस्राएली लोक चाळीस वर्षे संपेपर्यत रानात भ्रमण करीत राहिले होते. इजिप्त सोडताना जे पुरुष युद्ध करण्याच्या वयाचे होते, ते सर्वजण याकाळात मरण पावले होते, कारण त्यांनी याहवेहची आज्ञा पाळली नव्हती. याहवेहनी त्यांना शपथपूर्वक सांगितले होते की, जो देश इस्राएलला देण्याचे वचन मी त्यांच्या पूर्वजास दिलेले होते त्या “दुधामधाचे प्रवाह वाहणार्‍या” देशात, मी त्यांना प्रवेश करू देणार नाही.

  15. यहोशुआ ५:७सुमारे इ.स.पू. १४५१

    म्हणून जी मुले आपल्या वडिलांची जागा घेण्यायोग्य झाली होती, यहोशुआने त्यांची सुंता केली. ते अजूनही बेसुंती होते कारण वाटेत त्यांची सुंता झाली नव्हती

  16. यहोशुआ ५:८सुमारे इ.स.पू. १४५१

    सुंतेच्या विधीनंतर जखमा बर्‍या होईपर्यंत संपूर्ण इस्राएली राष्ट्राने छावणीत विश्रांती घेतली.

  17. यहोशुआ ५:९सुमारे इ.स.पू. १४५१

    मग याहवेह यहोशुआस म्हणाले, “आज मी तुमच्यापासून इजिप्तचा कलंक दूर लोटून दिला आहे,” यास्तव त्या ठिकाणाला गिलगाल असे नाव देण्यात आले आणि आज देखील ते ठिकाण त्याच नावाने ओळखले जाते.

  18. यहोशुआ ५:१०सुमारे इ.स.पू. १४५१

    यरीहोच्या मैदानावर गिलगाल येथे इस्राएली लोकांनी तळ दिलेला असताना, त्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी सायंकाळी त्यांनी वल्हांडण सण साजरा केला.

  19. यहोशुआ ५:११सुमारे इ.स.पू. १४५१

    वल्हांडणाच्या दुसर्‍या दिवशी, त्याच दिवशी त्यांनी त्या जमिनीतील काही उपज खाल्ले: बेखमीर भाकरी आणि भाजलेले धान्य.

  20. यहोशुआ ५:१२सुमारे इ.स.पू. १४५१

    त्यांनी त्या जमिनीतून उगविलेले धान्य खाल्ले त्याच्या दुसर्‍या दिवसापासून मान्ना मिळण्याचे थांबले; तिथून पुढे इस्राएली लोकांना कोणताही मान्ना मिळाला नाही, परंतु त्या वर्षी त्यांनी कनानमधील उपज खाल्ला.

  21. यहोशुआ ५:१३सुमारे इ.स.पू. १४५१

    आता यहोशुआ जेव्हा यरीहोजवळ होता, त्याने वर पाहिले आणि त्याला दिसले की त्याच्यासमोर एक पुरुष तलवार हातात घेऊन त्याच्यासमोर उभा आहे. यहोशुआ त्याच्याजवळ गेला आणि त्याला विचारले, “तू आमच्या बाजूने आहेस की आमच्या शत्रूच्या बाजूने आहेस?”

  22. यहोशुआ ५:१४सुमारे इ.स.पू. १४५१

    “कोणाच्याही बाजूचा नाही,” त्याने उत्तर दिले, “परंतु याहवेहचा सेनानायक म्हणून मी आलो आहे.” तेव्हा यहोशुआने आदराने त्याच्यासमोर लोटांगण घातले आणि त्याला विचारले, “माझ्या प्रभूकडून त्याच्या सेवकासाठी काय आदेश आहे?”

  23. यहोशुआ ५:१५सुमारे इ.स.पू. १४५१

    याहवेहच्या सेनानायकाने उत्तर दिले, “तुझ्या पायातील पायतण काढ, कारण ज्या भूमीवर तू उभा आहेस ती पवित्र आहे.” तेव्हा यहोशुआने त्याप्रमाणे केले.

  24. यहोशुआ ६:१सुमारे इ.स.पू. १४५१

    इस्राएली लोकांमुळे यरीहोच्या वेशी आता कडक बंदोबस्ताने बंद करून टाकल्या होत्या. कोणी बाहेर गेला नाही आणि कोणीही आत आला नाही.

  25. यहोशुआ ६:२सुमारे इ.स.पू. १४५१

    तेव्हा याहवेह यहोशुआला म्हणाले, “पाहा, मी यरीहो शहर, त्याचबरोबर त्यांचा राजा आणि त्यांचे योद्धे पुरुष देखील तुझ्या हाती दिले आहे.