मुख्य मजकुरावर जा

circa 1406–1380 BC

Conquest of Canaan

Joshua leads Israel across the Jordan into the promised land, defeating the Canaanite kingdoms one by one.

658 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. यहोशुआ १२:२२सुमारे इ.स.पू. १४५०

    केदेशचा राजा-एक, कर्मेलातील योकनामाचा राजा-एक,

  2. यहोशुआ १२:२३सुमारे इ.स.पू. १४५०

    नाफथ दोरचा राजा-एक, गिलगालातील गोईमाचा राजा-एक,

  3. यहोशुआ १२:२४सुमारे इ.स.पू. १४५०

    तिरजाहचा राजा-एक,

  4. यहोशुआ १३:१सुमारे इ.स.पू. १४४४

    जेव्हा यहोशुआ उतार वयाचा झाला, तेव्हा याहवेह त्याला म्हणाले, “तू आता खूप वयस्कर झाला आहेस आणि देशाचा बराच भाग ताब्यात घ्यावयाचा राहिला आहे.”

  5. यहोशुआ १३:२सुमारे इ.स.पू. १४४४

    जे प्रदेश अजूनही बाकी होते ते हे: पलिष्टी आणि गशूरींचा सर्व प्रदेश;

  6. यहोशुआ १३:३सुमारे इ.स.पू. १४४४

    पूर्व इजिप्तच्या शिहोर नदीपासून उत्तरेकडे असलेल्या एक्रोनच्या सीमेपर्यंत सर्व मिळून कनानी लोकांचा प्रदेश समजला जात असे, जरी इथे गाझा, अश्दोद, अष्कलोन, गथ आणि एक्रोन असे पाच पलिष्टी शासक होते; अव्वी लोकांचा प्रदेश:

  7. यहोशुआ १३:४सुमारे इ.स.पू. १४४४

    दक्षिणेकडे कनानी लोकांचा सर्व प्रदेश; सीदोनी लोकांचा माराह, अफेक आणि अमोर्‍यांची सीमा इथपर्यंत आहे;

  8. यहोशुआ १३:५सुमारे इ.स.पू. १४४४

    गिबली लोकांचा प्रदेश; बआल-गादपासून खाली हर्मोन पर्वत ते लेबो हमाथपर्यंत पूर्वेकडील सर्व लबानोन.

  9. यहोशुआ १३:६सुमारे इ.स.पू. १४४४

    “लबानोनपासून मिसरेफोत-मयिम डोंगराळ प्रदेशात राहणारे सर्व रहिवासी, म्हणजे सर्व सीदोन्यांना मी स्वतः इस्राएली लोकांपुढून घालवून देईन. मी तुला सूचना दिल्याप्रमाणे इस्राएली लोकांना हा देश त्यांचे वतन म्हणून विभागून देण्यात येईल याची खात्री कर.

  10. यहोशुआ १३:७सुमारे इ.स.पू. १४४४

    इस्राएलचे नऊ गोत्र आणि मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राला तो वतन म्हणून तू विभागणी करून दे.”

  11. यहोशुआ १३:८सुमारे इ.स.पू. १४४४

    मनश्शेहचे बाकीचे अर्धे गोत्र, रऊबेन आणि गाद यांच्या गोत्रांना यार्देनेच्या पूर्वेकडे आपले वतन मिळाले होते, याहवेहचा सेवक मोशेने त्यांच्याशी ठरविल्याप्रमाणे तो प्रदेश त्यांना वाटून दिला होता.

  12. यहोशुआ १३:९सुमारे इ.स.पू. १४४४

    आर्णोन नदीच्या खोर्‍याच्या सीमेवर असलेले अरोएर व खोर्‍यांमधील शहरापासून दिबोनपर्यंतचा मेदबाचा सर्व पठाराचा प्रदेश,

  13. यहोशुआ १३:१०सुमारे इ.स.पू. १४४४

    अम्मोन्यांच्या सीमेपर्यंतची हेशबोनात राज्य करणारा अमोर्‍यांचा राजा सीहोन याची सर्व नगरे.

  14. यहोशुआ १३:११सुमारे इ.स.पू. १४४४

    आणि गिलआद देश, गशूरी व माकाथी या लोकांचा सर्व प्रदेश; सर्व हर्मोन पर्वत; सलेकाहपर्यंत सर्व बाशान;

  15. यहोशुआ १३:१२सुमारे इ.स.पू. १४४४

    म्हणजे अष्टारोथ व एद्रेईवर ज्याने राज्य केले त्या ओग राजाचे बाशानातील संपूर्ण राज्य. (रेफाईम लोकांपैकी तो शेवटचा होता.) मोशेने त्यांच्यावर विजय मिळवून त्यांना वतनातून बाहेर घालवून दिले.

  16. यहोशुआ १३:१३सुमारे इ.स.पू. १४४४

    परंतु इस्राएली लोकांनी गशूरी व माकाथी लोकांना घालवून दिले नव्हते, म्हणून आज देखील ते लोक इस्राएली लोकात राहत आहेत.

  17. यहोशुआ १३:१४सुमारे इ.स.पू. १४४४

    परंतु लेवीच्या गोत्रास त्याने कोणतेही वतन दिले नाही, कारण याहवेहने त्यांना अभिवचन दिल्याप्रमाणे, इस्राएलचे परमेश्वर याहवेहना वाहिलेली अन्नार्पणे हे त्यांचे वतनभाग आहेत.

  18. यहोशुआ १३:१५सुमारे इ.स.पू. १४४४

    रऊबेन गोत्राला त्यांच्या कुळाप्रमाणे मोशेने त्यांना जी भूमी दिली ती ही:

  19. यहोशुआ १३:१६सुमारे इ.स.पू. १४४४

    आर्णोन खोर्‍यांच्या सीमेवर असलेले अरोएर शहर व खोर्‍यांच्या मध्यभागी असलेल्या नगरापासून मेदबा पलीकडील पठार,

  20. यहोशुआ १३:१७सुमारे इ.स.पू. १४४४

    हेशबोन व दिबोन, बामोथ-बआल, बेथ-बआल-मेओनसह पठारावरील त्याची सर्व इतर नगरे,

  21. यहोशुआ १३:१८सुमारे इ.स.पू. १४४४

    याहसाह, केदेमोथ, मेफाथ,

  22. यहोशुआ १३:१९सुमारे इ.स.पू. १४४४

    किर्याथाईम, सिबमाह, खोर्‍यातील टेकडीवरील जेरेथ-नगर.

  23. यहोशुआ १३:२०सुमारे इ.स.पू. १४४४

    बेथ-पौर, पिसगाची उतरण व बेथ-यशिमोथ.

  24. यहोशुआ १३:२१सुमारे इ.स.पू. १४४४

    पठारावरील सर्व शहरांचा आणि अमोर्‍यांचा राजा सीहोन, ज्याने हेशबोनात राज्य केले होते, याचे सर्व राज्य. मोशेने त्याचा आणि मिद्यानी सरदारांचा, एवी, रेकेम, सूर, हूर आणि रेबा, त्या देशात राहत असलेले व सीहोनाबरोबर मिळालेल्या राजपुत्रांचा पराभव केला.

  25. यहोशुआ १३:२२सुमारे इ.स.पू. १४४४

    या लोकांची त्यांनी युद्धात कत्तल केली होते, त्याचबरोबर इस्राएली लोकांनी शकुन पाहणारा बौराचा पुत्र बलामाला देखील तलवारीने मारून टाकले होते.