मुख्य मजकुरावर जा

circa 1406–1380 BC

Conquest of Canaan

Joshua leads Israel across the Jordan into the promised land, defeating the Canaanite kingdoms one by one.

658 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. यहोशुआ १३:२३सुमारे इ.स.पू. १४४४

    यार्देनच्या किनार्‍यापर्यंत रऊबेन गोत्राची सीमा होती. ही नगरे व त्यातील गावे रऊबेनी गोत्राचे त्यांच्या कुळानुसार वतन होते.

  2. यहोशुआ १३:२४सुमारे इ.स.पू. १४४४

    मोशेने गाद गोत्रास त्यांच्या कुळानुसार हे वतन दिले:

  3. यहोशुआ १३:२५सुमारे इ.स.पू. १४४४

    गिलआदातील सर्व नगरे आणि राब्बाह जवळील अरोएरापर्यंतचा अम्मोन्यांचा अर्धा देश, ही याजेरची सीमा होती.

  4. यहोशुआ १३:२६सुमारे इ.स.पू. १४४४

    आणि हेशबोनापासून रामाथ मिस्पेह व बेटोनीमपर्यंत आणि महनाईमपासून दबीरच्या सीमेपर्यंत;

  5. यहोशुआ १३:२७सुमारे इ.स.पू. १४४४

    व खोर्‍यातील बेथ-हाराम, बेथ-निमराह, सुक्कोथ, साफोन म्हणजे हेशबोनचा राजा सीहोनच्या राज्याचे हे उरलेले राज्य होते (यार्देन नदीच्या पूर्वबाजूपासून किन्नेरेथ समुद्रापर्यंत त्यांची सीमा होती).

  6. यहोशुआ १३:२८सुमारे इ.स.पू. १४४४

    ही नगरे व गावे गादच्या गोत्राला त्यांच्या कुळानुसार वतन म्हणून दिली होती.

  7. यहोशुआ १३:२९सुमारे इ.स.पू. १४४४

    मोशेने मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राला, म्हणजेच मनश्शेहच्या कुटुंबाच्या अर्ध्या वंशजांना त्यांच्या कुळानुसार हे प्रदेश दिले:

  8. यहोशुआ १३:३०सुमारे इ.स.पू. १४४४

    त्यांचा प्रदेश महनाईमपासून सर्व बाशान, जे बाशानचा राजा ओगच्या सर्व राज्यासह; बाशानातील याईर येथील साठ नगरे,

  9. यहोशुआ १३:३१सुमारे इ.स.पू. १४४४

    अर्धा गिलआद आणि अष्टारोथ आणि एद्रेई (बाशानातील ओग राजाची राजकीय शहरे).

  10. यहोशुआ १३:३२सुमारे इ.स.पू. १४४४

    यरीहोजवळ यार्देनेच्या पूर्वेस मोआबाच्या मैदानात मोशेने वरील वतने दिली.

  11. यहोशुआ १३:३३सुमारे इ.स.पू. १४४४

    परंतु लेवी गोत्राला मोशेने कोणतेही वतन दिले नाही, कारण त्यांना अभिवचन दिल्याप्रमाणे, याहवेह इस्राएलचे परमेश्वरच त्यांचे वतन आहेत.

  12. यहोशुआ १४:१सुमारे इ.स.पू. १४४४

    एलअज़ार याजक, नूनाचा पुत्र यहोशुआ आणि इस्राएलच्या गोत्राच्या कुलप्रमुखांनी इस्राएली लोकांना कनान देशातील हे भाग वतन म्हणून दिले.

  13. यहोशुआ १४:२सुमारे इ.स.पू. १४४४

    याहवेहने मोशेद्वारे दिलेल्या आज्ञेनुसार साडेनऊ गोत्रांना चिठ्ठ्या टाकून वतन वाटण्यात आले होते.

  14. यहोशुआ १४:३सुमारे इ.स.पू. १४४४

    अडीच गोत्रांना मोशेने यार्देनच्या पूर्वेकडे वतन दिलेले होते. परंतु लेव्यांना इतर गोत्रांमध्ये वतन देण्यात आले नव्हते.

  15. यहोशुआ १४:४सुमारे इ.स.पू. १४४४

    योसेफाचे वंशज मनश्शेह व एफ्राईम अशा दोन गोत्रांमध्ये वेगळे झाले होते. लेव्यांना कोणताही वाटा मिळाला नाही, मात्र राहण्यास नगरे आणि त्यांच्या गुरांसाठी सभोवतालची कुरणे दिली होती.

  16. यहोशुआ १४:५सुमारे इ.स.पू. १४४४

    याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणेच इस्राएली लोकांनी देशाची वाटणी केली.

  17. यहोशुआ १४:६सुमारे इ.स.पू. १४४४

    यहूदाह वंशाचे लोक गिलगाल येथे यहोशुआकडे आले. आणि कनिज्जी यफुन्नेहचा पुत्र कालेब त्याला म्हणाला, “कादेश-बरनेआमध्ये याहवेहने परमेश्वराचा सेवक मोशेला तुझ्या व माझ्याविषयी काय सांगितले हे तुला माहीत आहे.

  18. यहोशुआ १४:७सुमारे इ.स.पू. १४४४

    जेव्हा याहवेहचा सेवक मोशेने मला कादेश-बरनेआवरून हा देश हेरण्यासाठी पाठविले होते तेव्हा मी चाळीस वर्षांचा होतो. आणि मला मनापासून जे वाटले त्याप्रमाणे मी त्याला वर्तमान दिले,

  19. यहोशुआ १४:८सुमारे इ.स.पू. १४४४

    परंतु माझ्याबरोबर गेलेल्या माझ्या इस्राएली बांधवांनी लोकांचे अंतःकरण भयभीत केले. तरीही मी, याहवेह माझ्या परमेश्वराचे पूर्ण हृदयाने अनुसरण केले,

  20. यहोशुआ १४:९सुमारे इ.स.पू. १४४४

    म्हणून त्या दिवशी मोशेने मला शपथ घेऊन सांगितले, ‘देशाच्या ज्या भागात तुझे पाऊल पडेल तो भाग तुझा आणि तुझ्या वंशजांचे निरंतरचे वतन होईल, कारण तू याहवेह माझ्या परमेश्वराचे पूर्ण हृदयाने अनुसरण केले आहे.’

  21. यहोशुआ १४:१०सुमारे इ.स.पू. १४४४

    “इस्राएली लोक रानात फिरत असता याहवेहने मोशेला हे सांगितले तेव्हापासून आजपर्यंत पंचेचाळीस वर्षे याहवेहने मला जिवंत ठेवले आहे आणि आज मी पंचाऐंशी वर्षांचा आहे!

  22. यहोशुआ १४:११सुमारे इ.स.पू. १४४४

    मोशेने मला पाठविले होते, त्या दिवशी मी जेवढा बलवान होतो तेवढाच आज देखील आहे आणि तेव्हा युद्धावर जाण्यास मी जसा आवेशी होतो तसाच आज देखील आहे.

  23. यहोशुआ १४:१२सुमारे इ.स.पू. १४४४

    म्हणून त्या दिवशी याहवेहने हा डोंगराळ प्रदेश मला देण्याचे अभिवचन दिले होते, तो तू मला दे. तुला तर माहीतच आहे की, तिथे अनाकी लोक राहतात आणि त्यांची शहरे मोठी व तटबंदीची आहेत, परंतु याहवेह जर माझ्याबरोबर असतील, तर मी त्या लोकांना घालवून देईन.”

  24. यहोशुआ १४:१३सुमारे इ.स.पू. १४४४

    तेव्हा यहोशुआने यफुन्नेहचा पुत्र कालेबाला आशीर्वाद दिला आणि त्याला हेब्रोन त्याचे वतन म्हणून दिले.

  25. यहोशुआ १४:१४सुमारे इ.स.पू. १४४४

    म्हणून तेव्हापासून हेब्रोन हे कनिज्जी यफुन्नेहचा पुत्र कालेबच्या मालकीचे वतन झाले, कारण त्याने याहवेह इस्राएलच्या परमेश्वराचे पूर्ण हृदयाने अनुसरण केले.