- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1406–1380 BC
Conquest of Canaan
Joshua leads Israel across the Jordan into the promised land, defeating the Canaanite kingdoms one by one.
या कालखंडातील वचने
- यहोशुआ ११:२०सुमारे इ.स.पू. १४५०
कारण याहवेहनेच इस्राएली लोकांशी युद्ध करण्यासाठी या राजांचे हृदय कठोर केले होते, अशासाठी की याहवेहने त्यांना काहीही दयामाया न दाखविता त्यांचा समूळ नाश करावा असे मोशेला आज्ञापिले होते. याहवेहने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे काही दयामाया न दाखविता त्यांचा वध करण्यात आला.
- यहोशुआ ११:२१सुमारे इ.स.पू. १४५०
या काळामध्ये हेब्रोन, दबीर व अनाब येथील आणि यहूदीया व इस्राएलच्या सर्व डोंगराळ प्रदेशात राहणार्या अनाकाच्या सर्व वंशजांचा यहोशुआने सर्वस्वी नायनाट केला आणि त्यांची शहरे संपूर्णपणे ओसाड केली.
- यहोशुआ ११:२२सुमारे इ.स.पू. १४५०
इस्राएली लोकांच्या देशात एकही अनाकी जिवंत उरला नाही, मात्र गाझा, गथ व अश्दोद येथे काही उरले.
- यहोशुआ ११:२३सुमारे इ.स.पू. १४५०
याहवेहने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे यहोशुआने संपूर्ण प्रदेश घेतला; आणि इस्राएलाच्या गोत्रांच्या अनुसार विभागणी करून, त्यांचे वतन म्हणून तो इस्राएली लोकांस दिला. अशा रीतीने शेवटी देशास युद्धापासून विसावा मिळाला.
- यहोशुआ १२:१सुमारे इ.स.पू. १४५०
यार्देन नदीच्या पूर्वेकडे आर्णोन खोर्यापासून हर्मोन पर्वतापर्यंत व पूर्वेकडील सर्व अराबासह ज्या राजांना इस्राएली लोकांनी पराभूत करून ज्यांच्या सीमा हस्तगत केल्या ते हे:
- यहोशुआ १२:२सुमारे इ.स.पू. १४५०
हेशबोन येथे राज्य करणारा अमोर्यांचा राजा सीहोन. त्याच्या राज्याचा विस्तार आर्णोन खोर्याच्या कडेवरील अरोएर शहरापासून आणि आर्णोन खोर्याच्या मध्यभागापासून अम्मोनी लोकांच्या सीमेवरील यब्बोक नदीपर्यंत होता. यामध्ये अर्ध्या गिलआदाचा समावेश होता.
- यहोशुआ १२:३सुमारे इ.स.पू. १४५०
अराबाच्या पूर्वेकडील भागावर सुद्धा त्याने राज्य केले, तसेच किन्नेरेथ समुद्रापासून अराबाचा समुद्र (म्हणजे मृत समुद्र), बेथ-यशिमोथपर्यंत आणि दक्षिणेकडे पिसगा पर्वताच्या उतरणीपर्यंत राज्य केले.
- यहोशुआ १२:४सुमारे इ.स.पू. १४५०
बाशानचा राजा ओग, जो रेफाईम लोकांपैकी शेवटचा होता, त्याने अष्टारोथ व एद्रेई येथे राज्य केले.
- यहोशुआ १२:५सुमारे इ.स.पू. १४५०
त्याचे राज्य हर्मोन पर्वत, सलेकाह, संपूर्ण बाशानपासून गशूरी आणि माकाथी लोकांच्या सीमेपर्यंत, अर्ध्या गिलआद पासून हेशबोनचा राजा सीहोन याच्या सीमेपर्यंत विस्तृत होते.
- यहोशुआ १२:६सुमारे इ.स.पू. १४५०
याहवेहचा सेवक मोशे व इस्राएलच्या लोकांनी या लोकांवर विजय मिळविला आणि याहवेहचा सेवक मोशेने त्यांचा देश रऊबेन, गाद व मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रांना त्यांचे वतन म्हणून दिला होता.
- यहोशुआ १२:७सुमारे इ.स.पू. १४५०
यार्देनेच्या पश्चिमेस असलेल्या लबानोन खोर्यातील बआल-गादपासून व सेईरास जाणार्या हालाक डोंगरापर्यंतच्या ज्या देशांच्या राजांवर यहोशुआ व इस्राएली लोकांनी विजय मिळविला ते हे आहेत. यहोशुआने त्यांचे प्रदेश इस्राएलांच्या गोत्रांना त्या गोत्रांच्या वाट्याप्रमाणे वतन म्हणून दिला.
- यहोशुआ १२:८सुमारे इ.स.पू. १४५०
यात डोंगराळ प्रदेश, पश्चिमेकडील तळवट, अराबा, डोंगराचा उतार, अरण्याचा भाग आणि नेगेव प्रांतांचा समावेश होता. हे सर्व प्रदेश हिथी, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसीचे होते.
- यहोशुआ १२:९सुमारे इ.स.पू. १४५०
यरीहोचा राजा-एक, बेथेल जवळील आय शहराचा राजा-एक,
- यहोशुआ १२:१०सुमारे इ.स.पू. १४५०
यरुशलेमचा राजा-एक, हेब्रोनचा राजा-एक,
- यहोशुआ १२:११सुमारे इ.स.पू. १४५०
यर्मूथचा राजा-एक, लाखीशचा राजा-एक,
- यहोशुआ १२:१२सुमारे इ.स.पू. १४५०
एग्लोनाचा राजा-एक, गेजेरचा राजा-एक,
- यहोशुआ १२:१३सुमारे इ.स.पू. १४५०
दबीरचा राजा-एक, बेथ-गादेरचा राजा-एक,
- यहोशुआ १२:१४सुमारे इ.स.पू. १४५०
होरमाहचा राजा-एक, अरादचा राजा-एक,
- यहोशुआ १२:१५सुमारे इ.स.पू. १४५०
लिब्नाहचा राजा-एक, अदुल्लामचा राजा-एक,
- यहोशुआ १२:१६सुमारे इ.स.पू. १४५०
मक्केदाचा राजा-एक, बेथेलचा राजा-एक,
- यहोशुआ १२:१७सुमारे इ.स.पू. १४५०
तप्पूआहचा राजा-एक, हेफेराचा राजा-एक,
- यहोशुआ १२:१८सुमारे इ.स.पू. १४५०
अफेकाचा राजा-एक, शारोनचा राजा-एक,
- यहोशुआ १२:१९सुमारे इ.स.पू. १४५०
मादोनाचा राजा-एक, हासोरचा राजा-एक,
- यहोशुआ १२:२०सुमारे इ.स.पू. १४५०
शिम्रोन-मरोनाचा राजा-एक, अक्षाफाचा राजा-एक,
- यहोशुआ १२:२१सुमारे इ.स.पू. १४५०
तानखाचा राजा-एक, मगिद्दोचा राजा-एक,