मुख्य मजकुरावर जा

circa 1406–1380 BC

Conquest of Canaan

Joshua leads Israel across the Jordan into the promised land, defeating the Canaanite kingdoms one by one.

658 वचने · 1 पुस्तक समाविष्ट

या कालखंडातील वचने

  1. यहोशुआ १०:३८सुमारे इ.स.पू. १४५१

    मग यहोशुआ व त्याच्यासह संपूर्ण इस्राएली मागे वळून दबीरवर चालून गेले व त्यांच्याशी लढले.

  2. यहोशुआ १०:३९सुमारे इ.स.पू. १४५१

    त्यांनी ते शहर, त्याचा राजा व त्यातील गावे हस्तगत केली व त्यांना तलवारीने मारून टाकले. त्यातील प्रत्येकाचा समूळ नाश केला. त्यांनी एकही व्यक्ती जिवंत सोडली नाही. आणि लिब्नाह व त्याच्या राजाला व हेब्रोनला केले तसे त्यांनी दबीर व त्याच्या राजालाही केले.

  3. यहोशुआ १०:४०सुमारे इ.स.पू. १४५१

    अशा रीतीने यहोशुआने सर्व देश, म्हणजे डोंगराळ प्रदेश, नेगेव प्रांत, पश्चिमी तळवट, डोंगराची उतरण, तेथील राजांसह हस्तगत केला. एकही व्यक्ती जिवंत सोडली नाही. याहवेह इस्राएलच्या परमेश्वरांनी आज्ञापिल्याप्रमाणे प्रत्येक जीवधारी प्राण्यांचा नाश केला.

  4. यहोशुआ १०:४१सुमारे इ.स.पू. १४५१

    कादेश-बरनेआपासून गाझापर्यंत आणि गोशेनपासून गिबोनापर्यंतचे प्रदेश यहोशुआने हस्तगत केले.

  5. यहोशुआ १०:४२सुमारे इ.स.पू. १४५१

    यहोशुआने हे सर्व राजे व त्यांची भूमी एकाच मोहिमेत जिंकले, कारण याहवेह इस्राएलचे परमेश्वर इस्राएलसाठी लढले.

  6. यहोशुआ १०:४३सुमारे इ.स.पू. १४५१

    मग यहोशुआ सर्व इस्राएली लोकांसह गिलगालच्या छावणीकडे परतला.

  7. यहोशुआ ११:१सुमारे इ.स.पू. १४५०

    हासोराचा राजा याबीनने या घडलेल्या घटनांबद्दल ऐकले, तेव्हा त्याने मादोनाचा राजा योबाब, शिम्रोनाचे व अक्षाफाचे राजे,

  8. यहोशुआ ११:२सुमारे इ.स.पू. १४५०

    व उत्तरेकडील डोंगराळ प्रदेशांचे सर्व राजे; किन्नेरेथाच्या दक्षिणेकडील अराबात असलेले राजे; तळवटीत असलेले राजे, पश्चिमेकडील नाफथ दोराच्या प्रदेशातील राजे;

  9. यहोशुआ ११:३सुमारे इ.स.पू. १४५०

    पूर्वेकडील व पश्चिमेकडील कनानी; अमोरी, हिथी, परिज्जी आणि डोंगराळ प्रदेशातील यबूसी लोकांना; आणि मिस्पाहच्या हर्मोन डोंगराच्या तळाशी राहणारे हिव्वी या सर्व लोकांना निरोप पाठवला.

  10. यहोशुआ ११:४सुमारे इ.स.पू. १४५०

    ते त्यांचे सैनिक, मोठ्या संख्येने घोडे आणि रथ घेऊन समुद्र किनार्‍यावरील वाळूप्रमाणे एक मोठे सैन्य घेऊन बाहेर आले.

  11. यहोशुआ ११:५सुमारे इ.स.पू. १४५०

    हे सर्व राजे इस्राएलाशी लढण्यासाठी एकत्र आले व मेरोम सरोवरापाशी त्यांनी आपला तळ दिला.

  12. यहोशुआ ११:६सुमारे इ.स.पू. १४५०

    परंतु याहवेह यहोशुआला म्हणाले, “तू त्यांना भिऊ नकोस, कारण उद्या यावेळेस मी त्यांना मृत झालेले इस्राएलच्या हाती देईन. त्यांच्या घोड्यांच्या धोंडशिरा तोडून टाक व त्यांचे रथ जाळून टाक.”

  13. यहोशुआ ११:७सुमारे इ.स.पू. १४५०

    तेव्हा यहोशुआ आणि त्याचे सैन्य अकस्मात मेरोम सरोवराजवळ दाखल झाले आणि त्यांनी हल्ला केला.

  14. यहोशुआ ११:८सुमारे इ.स.पू. १४५०

    याहवेहने त्यांना इस्राएली लोकांच्या हाती दिले व त्यांनी शत्रूंचा सीदोन महानगरीपर्यंत व मिसरेफोत-मयिम या ठिकाणापर्यंत आणि पूर्वेस मिस्पेह खोर्‍यापर्यंत पाठलाग केला; अशा रीतीने या लढाईत शत्रूंचा एकही व्यक्ती जिवंत राहिला नाही.

  15. यहोशुआ ११:९सुमारे इ.स.पू. १४५०

    मग याहवेहने सूचना दिल्याप्रमाणे यहोशुआने त्यांच्या घोड्यांच्या धोंडशिरा तोडून टाकल्या आणि त्यांचे सर्व रथ जाळून टाकले.

  16. यहोशुआ ११:१०सुमारे इ.स.पू. १४५०

    परत येताना यहोशुआने हासोर शहर हस्तगत केले आणि तेथील राजाला तलवारीने ठार मारले. (हासोर शहर त्या सर्व संयुक्त राज्यांची राजधानी होती.)

  17. यहोशुआ ११:११सुमारे इ.स.पू. १४५०

    त्या शहरातील प्रत्येकाचा तलवारीने संहार करण्यात आला. त्यांनी तिथे असलेल्या प्रत्येक जिवंत व्यक्तीचा नाश केला आणि हासोर शहर जाळून टाकले.

  18. यहोशुआ ११:१२सुमारे इ.स.पू. १४५०

    मग यहोशुआने ही सर्व राजकीय शहरे व त्यांच्या राजांवर हल्ले करून त्यांचा नाश केला. याहवेहचा सेवक मोशेने आज्ञापिल्याप्रमाणे सर्व लोकांची तलवारीने कत्तल करण्यात आली.

  19. यहोशुआ ११:१३सुमारे इ.स.पू. १४५०

    इस्राएलने टेकड्यांवर वसलेल्या शहरांपैकी कोणतेही शहर जाळून टाकले नाही—फक्त हासोर, जे यहोशुआने जाळले.

  20. यहोशुआ ११:१४सुमारे इ.स.पू. १४५०

    उद्ध्वस्त केलेल्या सर्व शहरातील लूट व गुरे इस्राएली लोकांनी स्वतःसाठी घेतली; परंतु सर्व लोकांचा नाश होईपर्यंत त्यांना तलवारीने मारले. त्यांनी कोणालाही जिवंत ठेवले नाही.

  21. यहोशुआ ११:१५सुमारे इ.स.पू. १४५०

    कारण याहवेहने आपला सेवक मोशेला अशीच आज्ञा दिली होती; आणि मोशेने ही आज्ञा यहोशुआला दिली व यहोशुआने जसे सांगण्यात आले होते, त्याप्रमाणे केले; याहवेहने मोशेला दिलेल्या सर्व आज्ञांचे त्याने काळजीपूर्वक पालन केले.

  22. यहोशुआ ११:१६सुमारे इ.स.पू. १४५०

    अशा रीतीने यहोशुआने हे सर्व देश जिंकून घेतले, म्हणजे डोंगराळ प्रदेश, नेगेव प्रांत, गोशेनचा सर्व प्रांत, पश्चिमी तळवट, अराबा आणि इस्राएलचा डोंगराळ प्रदेश व त्याची तळवट,

  23. यहोशुआ ११:१७सुमारे इ.स.पू. १४५०

    सेईरच्या वाटेवरील हालाक डोंगरापासून हर्मोन पर्वताच्या पायथ्याशी लबानोनाच्या खोर्‍यात असलेल्या बआल-गादपर्यंतचा सर्व प्रदेश. त्यांच्या सर्व राजांना त्याने हस्तगत केले व त्यांना जिवे मारले.

  24. यहोशुआ ११:१८सुमारे इ.स.पू. १४५०

    या सर्व राजांशी यहोशुआने दीर्घकाळ युद्ध केले.

  25. यहोशुआ ११:१९सुमारे इ.स.पू. १४५०

    गिबोनातील हिव्वी लोकांशिवाय कोणत्याही शहराने इस्राएली लोकांशी शांतीचा करार केला नाही; इस्राएली लोकांनी बाकीच्या सर्वांना लढाईत जिंकून घेतले.