- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 1406–1380 BC
Conquest of Canaan
Joshua leads Israel across the Jordan into the promised land, defeating the Canaanite kingdoms one by one.
या कालखंडातील वचने
- यहोशुआ ९:१५सुमारे इ.स.पू. १४५१
नंतर यहोशुआने त्यांनी जगावे यासाठी त्यांच्याबरोबर शांतीचा करार केला आणि मंडळीच्या पुढार्यांनी शपथेच्याद्वारे या गोष्टीला संमती दिली.
- यहोशुआ ९:१६सुमारे इ.स.पू. १४५१
त्यांनी गिबोनी लोकांबरोबर करार केल्याच्या तीन दिवसानंतर, इस्राएली लोकांनी जेव्हा ऐकले की ते त्यांचे शेजारी होते, त्यांच्या जवळच राहत होते.
- यहोशुआ ९:१७सुमारे इ.स.पू. १४५१
तेव्हा इस्राएली लोक बाहेर पडले आणि तिसर्या दिवशी ते त्यांच्या शहरांकडे आले: गिबोन, कफीराह, बैरोथ आणि किर्याथ-यआरीम ही त्या शहरांची नावे.
- यहोशुआ ९:१८सुमारे इ.स.पू. १४५१
परंतु इस्राएली लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला नाही, कारण मंडळीच्या पुढार्यांनी याहवेह इस्राएलच्या परमेश्वराच्या नावाने त्यांना तशी शपथ दिली होती. संपूर्ण सभेने पुढार्यांविरुद्ध कुरकुर केली,
- यहोशुआ ९:१९सुमारे इ.स.पू. १४५१
परंतु सर्व पुढार्यांनी उत्तर दिले, “आपण याहवेह इस्राएलच्या परमेश्वराद्वारे त्यांना शपथ दिली आहे आणि आता आपण त्यांना स्पर्श करू शकत नाही.
- यहोशुआ ९:२०सुमारे इ.स.पू. १४५१
आपण त्यांच्यासाठी असे करू या: आपण त्यांना जिवंत राहू देऊ, म्हणजे आपण त्यांना दिलेली शपथ मोडल्याबद्दल परमेश्वराचा क्रोध आपल्यावर येणार नाही.”
- यहोशुआ ९:२१सुमारे इ.स.पू. १४५१
ते पुढे म्हणाले, “त्यांना जगू द्या, परंतु त्यांनी संपूर्ण मंडळीच्या सेवेसाठी लाकूड तोडणारे आणि पाणी वाहणारे म्हणून राहावे.” अशाप्रकारे पुढार्यांनी त्यांना दिलेल्या वचनाचे पालन केले.
- यहोशुआ ९:२२सुमारे इ.स.पू. १४५१
नंतर यहोशुआने गिबोनी लोकांना बोलावून घेतले आणि त्यांना विचारले, “आम्ही दूरच्या देशात राहतो असे सांगून तुम्ही आमची फसवणूक का केली? खरे पाहिले तर तुम्ही आमच्या जवळच राहता.
- यहोशुआ ९:२३सुमारे इ.स.पू. १४५१
तुमच्यावर आता शाप आला आहे: तुम्हाला आता माझ्या परमेश्वराच्या घरासाठी लाकडे तोडणारे आणि पाणी वाहणारे या सेवेतून कधीही सोडविले जाणार नाही.”
- यहोशुआ ९:२४सुमारे इ.स.पू. १४५१
तेव्हा त्यांनी यहोशुआला उत्तर दिले, “कारण आम्हाला असे सांगण्यात आले होते की, याहवेह तुमच्या परमेश्वरांनी आपला सेवक मोशेला हा संपूर्ण प्रदेश जिंकून घेण्याची आणि त्यात राहणार्या सर्व लोकांना नष्ट करण्याची आज्ञा दिली होती. म्हणून तुमच्यामुळे आम्हाला आमच्या जिवाबद्दल भीती वाटू लागली; म्हणूनच आम्ही हे केले.
- यहोशुआ ९:२५सुमारे इ.स.पू. १४५१
आता आम्ही सर्वस्वी तुमच्या हाती आहोत. तुम्हाला चांगले व योग्य वाटेल त्याप्रमाणे आमचे करा.”
- यहोशुआ ९:२६सुमारे इ.स.पू. १४५१
तेव्हा यहोशुआने त्यांना इस्राएली लोकांपासून वाचविले व त्यांना जिवे मारू दिले नाही.
- यहोशुआ ९:२७सुमारे इ.स.पू. १४५१
यहोशुआने त्या दिवशी इस्राएली लोकांच्या सभेकरिता आणि याहवेह निवडतील त्या ठिकाणच्या वेदीसाठी त्यांना लाकूडतोडे व पाणके म्हणून नेमले. हीच व्यवस्था आजपर्यंत आहे.
- यहोशुआ १०:१सुमारे इ.स.पू. १४५१
यरीहो येथे यहोशुआने जे केले, तसेच आय शहरात करून त्याने ते कसे हस्तगत केले, त्याचा कसा नाश केला, त्याच्या राजांचा कसा वध केला, गिबोनाच्या लोकांनी इस्राएली लोकांशी शांतीचा करार कसा केला आणि आता ते इस्राएलचे मित्र राष्ट्र म्हणून कसे बनून राहिले, या सर्व गोष्टी यरुशलेमचा राजा अदोनी-सेदेक याने ऐकल्या,
- यहोशुआ १०:२सुमारे इ.स.पू. १४५१
तेव्हा तो व त्याचे लोक अतिशय घाबरून गेले. कारण गिबोन हे एका राजेशाही शहराप्रमाणे प्रतिष्ठित शहर होते; ते आय नगरापेक्षा मोठे होते व त्यातील पुरुष उत्तम योद्धे होते.
- यहोशुआ १०:३सुमारे इ.स.पू. १४५१
म्हणून यरुशलेमचा राजा अदोनी-सेदेकाने हेब्रोनाचा राजा होहाम, यर्मूथचा राजा पिराम, लाखीशचा राजा याफीय आणि एग्लोनाचा राजा दबीरकडे आपले निवेदन पाठवले.
- यहोशुआ १०:४सुमारे इ.स.पू. १४५१
तो म्हणाला, “या आणि गिबोनावर हल्ला करण्यास मला मदत करा, कारण त्यांनी यहोशुआशी व इस्राएल लोकांशी शांतीचा करार केला आहे.”
- यहोशुआ १०:५सुमारे इ.स.पू. १४५१
तेव्हा अमोर्यांचे पाच राजे—यरुशलेम, हेब्रोन, यर्मूथ, लाखीश व एग्लोन या नगरांचे राजे एकत्र आले व आपले सैन्य एकजूट करून गिबोन विरुद्ध त्यांनी आपले स्थान घेतले व त्यांच्यावर हल्ला केला.
- यहोशुआ १०:६सुमारे इ.स.पू. १४५१
तेव्हा यहोशुआ जो गिलगालच्या छावणीत होता, त्याच्याकडे गिबोनाच्या लोकांनी निरोप पाठवून म्हटले: “आमचा त्याग करू नका. आमच्याकडे लवकर येऊन आम्हाला वाचवा! आमची मदत करा, कारण डोंगरवटीच्या सर्व अमोरी राजांनी आमच्याविरुद्ध आपले सैन्य उभारले आहे.”
- यहोशुआ १०:७सुमारे इ.स.पू. १४५१
लगेच यहोशुआ आपल्या सर्वोत्तम योद्ध्यांसह सर्व सैन्य घेऊन गिलगालहून निघाला.
- यहोशुआ १०:८सुमारे इ.स.पू. १४५१
तेव्हा याहवेह यहोशुआला म्हणाले, “त्यांना भिऊ नकोस; मी त्यांना तुझ्या हाती दिलेले आहे. त्यांच्यातील कोणीही तुझ्यापुढे टिकाव धरू शकणार नाही.”
- यहोशुआ १०:९सुमारे इ.स.पू. १४५१
गिलगालहून रात्रभर प्रवास केल्यानंतर, यहोशुआने त्यांच्यावर अचानक हल्ला केला.
- यहोशुआ १०:१०सुमारे इ.स.पू. १४५१
मग याहवेहने इस्राएली समोर शत्रू सैन्यांमध्ये गोंधळ निर्माण केला आणि यहोशुआ व इस्राएलांच्या सैन्याने गिबोनाजवळ पूर्णपणे त्यांचा पराभव केला. इस्राएली लोकांनी वर बेथ-होरोनकडे जाणार्या वाटेपर्यंत त्यांचा पाठलाग केला व अजेकाह व मक्केदापर्यंत त्यांना मारत आले.
- यहोशुआ १०:११सुमारे इ.स.पू. १४५१
ते इस्राएल पुढून बेथ-होरोन पासून अजेकाहच्या वाटेवरून पळून जात असताना, याहवेहने त्यांच्यावर गारांच्या प्रचंड वर्षाव केला आणि इस्राएली लोकांच्या तलवारीपेक्षा गारांनीच अधिक लोक मारले गेले.
- यहोशुआ १०:१२सुमारे इ.स.पू. १४५१
ज्या दिवशी याहवेहने अमोरी लोकांना इस्राएली लोकांच्या हाती दिले, तेव्हा इस्राएली लोकांच्या उपस्थितीत यहोशुआ याहवेहना म्हणाला: “सूर्या, गिबोनावर स्थिर उभा हो, आणि हे चंद्रा, तू अय्यालोनच्या खोर्यावर स्तब्ध राहा”