circa 1406–1380 BC
Conquest of Canaan
Joshua leads Israel across the Jordan into the promised land, defeating the Canaanite kingdoms one by one.
या कालखंडातील वचने
- यहोशुआ ८:२५सुमारे इ.स.पू. १४५१
आय शहराचे सर्व रहिवासी; जे पुरुष आणि स्त्रिया त्या दिवशी मारले गेले, त्यांची संख्या बारा हजार होती.
- यहोशुआ ८:२६सुमारे इ.स.पू. १४५१
कारण यहोशुआने आपल्या भाल्याचे टोक आय शहरातील सर्व लोकांचा नाश होईपर्यंत, मागे घेतले नाही.
- यहोशुआ ८:२७सुमारे इ.स.पू. १४५१
परंतु याहवेहने यहोशुआला सूचना दिली त्याप्रमाणे इस्राएली लोकांनी त्यांच्यासाठी शहराची गुरे आणि लूट जिंकून आणली.
- यहोशुआ ८:२८सुमारे इ.स.पू. १४५१
अशा रीतीने यहोशुआने आय शहर जाळून टाकले आणि ते नाश झालेल्या अवशेषांचा ढिगारा असे केले, आजपर्यंत ते ठिकाण असेच ओसाड पडलेले आहे.
- यहोशुआ ८:२९सुमारे इ.स.पू. १४५१
यहोशुआने आय शहराच्या राजाचे शव एका झाडाला टांगून ठेवले आणि संध्याकाळपर्यंत ते तसेच सोडून दिले. सूर्यास्ताच्या वेळेस यहोशुआने त्यांना हुकूम केला की, त्याचे शरीर झाडावरून काढा आणि ते खाली नगरवेशीच्या प्रवेशमार्गात फेकून द्यावे. नंतर त्यांनी त्याच्यावर धोंड्यांची एक मोठी रास रचून ठेवली, ती आजपर्यंत राहिली आहे.
- यहोशुआ ८:३०सुमारे इ.स.पू. १४५१
मग यहोशुआने याहवेह इस्राएलच्या परमेश्वरासाठी एबाल पर्वतावर वेदी बांधली,
- यहोशुआ ८:३१सुमारे इ.स.पू. १४५१
जी आज्ञा याहवेहचा सेवक मोशेने इस्राएली लोकांना दिली होती. मोशेच्या नियमशास्त्रात जसे लिहिले होते त्याप्रमाणे ज्या दगडांवर कोणतेही लोखंडी अवजार वापरलेले नाही, अशा न घडविलेल्या दगडांची त्याने वेदी बांधली. त्या वेदीवर त्यांनी याहवेहसाठी होमार्पणे व शांत्यर्पणे केली.
- यहोशुआ ८:३२सुमारे इ.स.पू. १४५१
तिथेच इस्राएली लोकांच्या उपस्थितीत यहोशुआने मोशेच्या नियमशास्त्राची एक प्रत दगडांवर लिहिली.
- यहोशुआ ८:३३सुमारे इ.स.पू. १४५१
सर्व इस्राएली लोक, त्यांच्या वडीलजनांसह, अधिकारी आणि न्यायाधीश हे सर्व याहवेहच्या कराराच्या कोशाच्या दोन्ही बाजूंना उभे होते, ज्या लेवीय याजकांनी तो वाहून आणला त्यांच्यासमोर ते होते. त्यांच्यामध्ये राहणारे परदेशी आणि तिथे जन्मलेले लोक तिथे होते. जशी आज्ञा याहवेहचा सेवक मोशेने पूर्वी दिली होती, त्याप्रमाणे अर्धे लोक गरिज्जीम पर्वतासमोर आणि अर्धे लोक एबाल पर्वतासमोर उभे राहिले, इस्राएली लोकांना आशीर्वाद देण्यासाठी त्याने या सूचना दिल्या होत्या.
- यहोशुआ ८:३४सुमारे इ.स.पू. १४५१
मग यहोशुआने त्या सर्व लोकांस नियमशास्त्राच्या पुस्तकात जशी लिहिलेली होती तशीच आशीर्वादांची आणि शापांची वचने वाचून दाखविली.
- यहोशुआ ८:३५सुमारे इ.स.पू. १४५१
यहोशुआने संपूर्ण इस्राएली मंडळी, स्त्रिया आणि मुलेबाळे आणि जे परदेशीय त्यांच्यामध्ये राहत होते यांना, मोशेने दिलेल्या सर्व आज्ञातील वाचून दाखविण्यात आल्या, एकही शब्द न वाचता सोडला नाही.
- यहोशुआ ९:१सुमारे इ.स.पू. १४५१
यार्देनेच्या पश्चिमेकडील सर्व राजांनी—डोंगराळ प्रदेशाच्या राजांनी, पश्चिमी पर्वत पायथ्यावरील राजांनी आणि लबानोन पर्यंत असलेल्या भूमध्य समुद्रकिनार्यांवरील सर्व राजांनी (हिथी, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी राजांनी) या गोष्टींबद्दल ऐकले
- यहोशुआ ९:२सुमारे इ.स.पू. १४५१
तेव्हा ते एकमताने यहोशुआ आणि इस्राएलविरुद्ध युद्ध करण्यास एकत्र आले.
- यहोशुआ ९:३सुमारे इ.स.पू. १४५१
तरीपण जेव्हा गिबोनाच्या लोकांनी ऐकले की यहोशुआने यरीहो आणि आय या शहरांचे काय केले,
- यहोशुआ ९:४सुमारे इ.स.पू. १४५१
तेव्हा त्यांनी एका युक्तीचे अवलंबन केले: ते यहोशुआकडे प्रतिनिधी म्हणून गेले, गाढवांवर जुनी गोणपाटे आणि झिजलेले, फाटलेले, ठिगळे लावलेले द्राक्षारसाचे बुधले लादले.
- यहोशुआ ९:५सुमारे इ.स.पू. १४५१
त्यांनी अंगात जीर्ण झालेले कपडे व पायात झिजलेले व ठिगळांचे जोडे घातले आणि त्यांच्या शिदोर्यांत शिळ्या वाळलेल्या व बुरशी लागलेल्या भाकरी होत्या.
- यहोशुआ ९:६सुमारे इ.स.पू. १४५१
ते गिलगाल येथील छावणीत यहोशुआकडे आले. ते यहोशुआला आणि इस्राएली लोकांना म्हणाले, “आम्ही दूरच्या देशातून आलो आहोत; तुम्ही आमच्याबरोबर शांतीचा करार करा.”
- यहोशुआ ९:७सुमारे इ.स.पू. १४५१
तेव्हा इस्राएली लोकांनी या हिव्वी लोकांस उत्तर दिले, “परंतु कदाचित तुम्ही आमच्या जवळपास राहत असाल, तेव्हा आम्ही तुमच्याशी शांतीचा करार कसा करू शकतो?”
- यहोशुआ ९:८सुमारे इ.स.पू. १४५१
ते यहोशुआला म्हणाले, “आम्ही तुमचे दास आहोत.” परंतु यहोशुआने विचारले, “परंतु तुम्ही आहात तरी कोण आणि कुठून आला आहात?”
- यहोशुआ ९:९सुमारे इ.स.पू. १४५१
त्यांनी उत्तर दिले, “तुमचे दास एका अतिशय दूर देशाहून आले आहेत, कारण आम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराची किर्ती आणि इजिप्तमध्ये त्यांनी तुमच्यासाठी जे सर्व केले त्याबद्दल ऐकले आहे.
- यहोशुआ ९:१०सुमारे इ.स.पू. १४५१
त्याचप्रमाणे तुम्ही यार्देनच्या पूर्वेकडील अमोर्यांच्या दोन राजांचे—हेशबोनचा राजा सीहोन व अष्टारोथातील बाशानचा राजा ओगचे काय केले त्यासंबंधी देखील ऐकले आहे.
- यहोशुआ ९:११सुमारे इ.स.पू. १४५१
म्हणून आमचे वडीलजन आणि आमच्या लोकांनी आम्हाला सूचना केली, ‘लांबच्या प्रवासाची तयारी करा: वाटेसाठी शिदोरी घ्या आणि इस्राएली लोकांकडे जा. आपली राष्ट्रे त्यांचे दास आहेत असे त्यांना जाहीर करा आणि शांतीच्या करारासाठी त्यांना विनंती करा.’
- यहोशुआ ९:१२सुमारे इ.स.पू. १४५१
आम्ही तुमच्याकडे येण्यास आमचे ठिकाण सोडले, तेव्हा या भाकरी गरम होत्या, परंतु आता तुम्ही पाहता की त्या वाळून त्यांना बुरशी लागली आहे.
- यहोशुआ ९:१३सुमारे इ.स.पू. १४५१
हे द्राक्षारसाचे बुधले अगदी नवीन होते, परंतु आता ते जुने झालेले आहेत व त्यांना भेगा पडलेल्या आहेत. आमचे कपडे व आमचे जोडे लांबच्या खडतर प्रवासाने जीर्ण झालेले आहेत.”
- यहोशुआ ९:१४सुमारे इ.स.पू. १४५१
इस्राएली लोकांनी त्यांच्या अन्नसामुग्रींचा नमुना पाहिला, परंतु त्यांनी याबाबतीत याहवेहला विचारले नाही.