मुख्य मजकुरावर जा

Esau

159 वचने · 11 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Edom

Esau चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मग एसाव आपल्या स्त्रिया, मुलेबाळे, आपल्या घरची सर्व नोकरमंडळी, आपली गुरे व इतर जनावरे आणि कनान देशात त्याने मिळविलेली धनसंपत्ती घेऊन याकोबापासून दूर निघून तिथे वस्ती करून राहिला.

  2. म्हणून एसावाने सेईरच्या (जे एदोम आहे) डोंगराळ प्रदेशात वस्ती केली.

  3. सेईरच्या डोंगराळ प्रदेशातील एदोमी लोकांचा मूळ पुरुष एसावच्या वंशजांची नावे अशी.

  4. एसावाच्या पुत्रांची नावे: एसावची पत्नी आदाहपासून झालेला पुत्र एलीफाज आणि एसावची पत्नी बासमाथ हिच्यापासून झालेला रऊएल.

  5. एसावाचा पुत्र एलीफाजला तिम्ना नावाची उपपत्नी होती जिच्यापासून त्याला अमालेक हा पुत्र झाला. ही एसावची पत्नी आदाह हिची नातवंडे होती.

  6. रऊएलाचे पुत्र: नहाथ, जेरह, शम्माह व मिज्जा. ही एसावाची पत्नी बासमाथ हिची नातवंडे होती.

  7. एसावाला ओहोलीबामाह नावाची आणखी एक पत्नी होती. ती अनाहची कन्या असून सिबोनाची नात होती. ओहोलीबामाहच्या पोटी एसावाला, यऊश, यालाम व कोरह हे पुत्र झाले.

  8. एसावाची नातवंडे त्यांच्या नावांनी ओळखल्या जाणार्‍या कुळांचे प्रमुख झाले: एसावाचा प्रथमपुत्र एलीफाजचे पुत्र: त्यांची नावे ही: तेमान, ओमर, सेपो, केनाज,

  9. कोरह, गाताम व अमालेक. हे सर्व एदोमातील एलीफाजचे प्रमुख वंशज होते; ते आदाहचे पौत्र होते.

  10. एसावाचा पुत्र रऊएलचे वंशज: नहाथ, जेरह, शम्माह व मिज्जा. ही कुळे एदोम देशात रऊएलापासून झाले; एसाव व त्याची पत्नी बासमाथची ही नातवंडे.

  11. एसावाला त्याची पत्नी ओहोलीबामाह हिच्याकडून: यऊश, यालाम व कोरह हे पुत्र झाले. हे पुढारी एसावाला, अनाह याची कन्या ओहोलीबामाह हिच्यापासून झाले.

  12. हे एसावाचे (अर्थात् एदोमाचे) पुत्र, जे त्यांच्या कुळाचे पुढारी होते.

  13. दिशोन, एसर व दीशान. हे एदोम देशातील सेईराचे पुत्र होरी वंशातील कुळांचे सरदार झाले.

  14. इस्राएली लोकांवर कोणत्याही राजाने राज्य करण्यापूर्वी एदोम देशावर ज्या राजांनी राज्य केले ते:

  15. बौराचा पुत्र बेला एदोमचा राजा झाला. त्याच्या शहराला दिन्हाबाह हे नाव दिले होते.

  16. एसाव हा एदोम वंशातील प्रमुखांचा मूळ पुरुष होता: तिम्ना, आल्वा, यतेथ,

  17. मग्दीएल व ईराम.

  18. एदोमाचे अधिकारी घाबरून जातील, मोआबाचे पुढारी थरथर कापू लागतील, कनानातील लोक वितळून जातील;

  19. मोशेने कादेशमधून एदोमाच्या राजाकडे निरोप्यांच्या द्वारे हा संदेश पाठविला: “तुझा भाऊ इस्राएल असे म्हणतो: आमच्यावर आलेल्या सर्व कष्टांविषयी तुला ठाऊक आहे.

  20. पण एदोम म्हणाला: “तुम्ही इथून पार जाऊ शकत नाही; जर तुम्ही प्रयत्न केला, तर आम्ही चाल करून तुमच्यावर तलवारीने हल्ला करू.”

  21. त्यांनी पुन्हा उत्तर दिले: “तुम्ही जाऊ शकत नाही.” तेव्हा एदोम मोठे व सामर्थ्यवान सैन्य घेऊन त्यांच्याविरुद्ध बाहेर आला.

  22. एदोमाने त्यांना हद्दीतून पार जाण्यास मनाई केली त्यामुळे इस्राएली त्यांच्यापासून वळून माघारी गेले.

  23. एदोमच्या सीमेवर, होर पर्वतावर याहवेह मोशे व अहरोनला म्हणाले,

  24. नंतर इस्राएली लोक होर पर्वताकडून प्रवास करीत एदोमाला वळसा घालून तांबड्या समुद्राच्या वाटेने प्रवास करीत निघाले; परंतु लोक वाटेतच अधीर झाले;

  25. एदोम जिंकला जाईल; इस्राएलचा शत्रू सेईर सुद्धा जिंकला जाईल, पण इस्राएल बलवान होईल.