मुख्य मजकुरावर जा

Esau

159 वचने · 11 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Edom

Esau चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. याकोब अग्नीसारखा आणि योसेफ ज्वालासारखे असतील; एसाव उरलेल्या भुशासारखे होतील, आणि ते त्यांना जाळून नष्ट करतील. एसावच्या वंशजांपैकी कोणीही जिवंत राहणार नाही.” याहवेहने हे म्हटले आहे.

  2. एसावाचा पर्वत दक्षिणेतील लोक ताब्यात घेतील, आणि पलिष्टी लोकांच्या देशाला डोंगराच्या पायथ्याशी राहणारे आपल्या ताब्यात घेतील. ते एफ्राईम आणि शोमरोनच्या भूमीचा ताबा घेतील आणि बिन्यामीन गिलआद प्रांत व्यापून घेतील.

  3. सुटका करणारे एसाव पर्वतावर राज्य करण्यासाठी सीयोन पर्वतावर चढतील. आणि ते याहवेहचे राज्य असेल.

  4. याहवेह म्हणतात, “मी तुमच्यावर नितांत प्रेम केले आहे.” पण यावर तुम्ही विचारता, “हे प्रेम तुम्ही कसे केले?” याहवेह जाहीर करतात, “एसाव याकोबाचा सख्खा भाऊ नव्हता काय? तरी देखील मी याकोबावर प्रीती केली.

  5. परंतु मी एसावाचा द्वेष केला आणि त्याचा डोंगराळ प्रदेश टाकाऊ भूमी केला व त्याचे वतन रानातील कोल्ह्यांकरिता सोडले.”

  6. एसावाचा वंशज, एदोमाने म्हटले, “जरी आम्ही चिरडले गेलो आहोत तरी देखील, भग्न झालेली स्थळे आम्ही पुन्हा बांधू.” परंतु सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “ते बांधतील, पण मी ते उद्ध्वस्त करेन, कारण त्या देशाचे नाव दुष्टाईचा देश आणि त्या लोकांवर नेहमीच याहवेहचा कोप राहील.

  7. जसे शास्त्रलेखात लिहिले आहे: “मी याकोबावर प्रीती केली, परंतु मी एसावाचा द्वेष केला.”

  8. विश्वासाद्वारे इसहाकाने याकोब व एसाव या आपल्या दोन पुत्रांना त्यांच्या भावी काळासाठी आशीर्वाद दिला.

  9. कोणी जारकर्मी होऊ नये किंवा ज्याने एका जेवणासाठी आपल्या ज्येष्ठत्वाच्या वतनाचा हक्क विकला, त्या एसावासारखे अनीतिमान होऊ नये, म्हणून लक्ष द्या.