मुख्य मजकुरावर जा

Esau

159 वचने · 11 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Edom

Esau चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मग एदोम, मोआब, अम्मोन, सोर व सीदोन यांच्या राजांना, यरुशलेममध्ये यहूदीयाचा राजा सिद्कीयाहकडे आलेल्या दूतांसह हा संदेश पाठव,

  2. यहूदीया प्रांतामध्ये अजून काही लोक उरले आहेत, बाबेलच्या राजाने सर्वांनाच कैद करून नेले नाही व शाफानचा नातू, अहीकामचा पुत्र गदल्याह हा राज्यपाल म्हणून नियुक्त झाला आहे, असे मोआब, अम्मोन, एदोम, या प्रांतात व आजूबाजूच्या देशात असलेल्या यहूद्यांनी ऐकले, तेव्हा

  3. एदोम्यांविषयी: सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “तेमान प्रांतात आता शहाणपणा राहिलेला नाही का? शहाण्या मनुष्यातून बोध नाहीसा झाला आहे काय? त्यांच्यातील समंजसपणा क्षय पावला आहे काय?

  4. ददान प्रदेशातील रहिवाशांनो, मागे वळा व पलायन करा, खोल गुहेत जाऊन लपा, कारण मी जेव्हा त्याला शिक्षा करेन, तेव्हा मी एसावावर अरिष्ट आणेन.

  5. परंतु मी एसावला पूर्णपणे विवस्त्र करेन; मी त्याची लपण्याची ठिकाणे उघडी करेन, म्हणजे तो स्वतःला गुप्त ठेऊ शकणार नाही. त्याचे शस्त्रधारी पुरुष, तसेच त्यांचे मित्रगण व शेजारीदेखील नष्ट झाले आहेत, म्हणून तिथे असे म्हणणारा कोणीही राहिलेला नाही,

  6. एदोम दहशतीचे ठिकाण होईल; त्याच्या जवळून जाणारा कोणीही त्याच्या सर्व जखमांमुळे भयचकित होतील आणि त्यांचा उपहास करतील.

  7. एदोमविरुद्ध याहवेहचा संकल्प काय आहे ते ऐका. तेमानमध्ये राहणार्‍या लोकांविरुद्ध त्यांची काय योजना आहे, हे ऐकून घ्या. त्यांच्या कळपातील तरुणांना फरफटत ओढत नेण्यात येईल. त्यांच्या कुरणांना या दुर्दैवाने भयंकर धक्का बसेल.

  8. पाहा! एक गरुड झेप घेऊन वेगाने खाली येईल, व बस्रावर आपले पंख पसरेल. त्या दिवशी एदोमाच्या योध्यांची अंतःकरणे वेणा देणार्‍या स्त्रीच्या अंतःकरणाप्रमाणे होतील.

  9. ऊस प्रांतात राहणार्‍या एदोम कन्ये, हर्ष कर व उल्हासित हो. परंतु तुझ्याकडे देखील तो प्याला आणल्या जाईल; तू तो पिऊन मदोन्मत्त होऊन पूर्णतः निर्वस्त्र होशील.

  10. सीयोनकन्ये, तुझी शिक्षा संपेल, ते तुझा बंदिवास वाढविणार नाहीत. पण एदोम कन्ये, तुझ्या पापांची ते तुला शिक्षा देतील, आणि तुझी दुष्टता उघडकीस आणतील.

  11. “सार्वभौम याहवेह असे म्हणतात: ‘एदोमने यहूदाहचा सूड घेतला आणि त्यामुळे तो अतिशय दोषी ठरला,

  12. म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: एदोमविरुद्ध मी माझा हात लांब करेन आणि मनुष्य व पशूंना मी मारून टाकीन. मी त्याला ओसाड करेन आणि तेमान पासून ददानपर्यंत ते तलवारीने पडतील.

  13. माझ्या इस्राएली लोकांच्या हातूनच मी एदोमवर माझा सूड घेईन, आणि माझा राग व क्रोधानुसार ते त्यांच्याशी वागतील; ते माझा सूड अनुभवतील, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’ ”

  14. “एदोम, तिचे राजे व तिचे सर्व राजपुत्र तिथे आहेत, ते बलवान असूनही, जे तलवारीने वधले आहेत ते बेसुंती लोकांबरोबर व जे खाली गर्तेत जातात त्यांच्याबरोबर पडले आहेत.

  15. तो सुंदर देशावर आक्रमण करेल. पुष्कळ देशांची उलथापालथ होईल, पण एदोम, मोआब आणि अम्मोनचे प्रमुख त्याच्या तावडीतून सुटतील.

  16. इजिप्त देश उजाड होईल आणि एदोम देश ओसाड होईल, कारण त्यांनी यहूदीयाच्या लोकांवर अत्याचार केला त्यांच्या देशात त्यांनी निर्दोष रक्त पाडले आहे.

  17. याहवेह असे म्हणतात: “गाझाच्या तीन नव्हे तर चार अपराधांसाठी शासन करण्यापासून मी अनुताप करणार नाही. कारण तिने सर्व लोकांना बंदिवासात घेतले आणि त्यांना एदोमला विकले,

  18. याहवेह असे म्हणतात: “सोरच्या तीन नव्हे तर चार अपराधांसाठी शासन करण्यापासून मी अनुताप करणार नाही. कारण बंदिवासातील सर्वांना एदोमास विकले आणि बंधुत्वाच्या कराराची अवहेलना केली आहे.

  19. याहवेह असे म्हणतात: “एदोमच्या तीन नव्हे तर चार अपराधांसाठी शासन करण्यापासून अनुताप करणार नाही. कारण त्याने तलवार घेऊन आपल्या भावाचा पाठलाग केला आणि देशातील स्त्रियांचा वध केला, कारण त्याचा क्रोध निरंतर वाढत होता, आणि त्याच्या क्रोध अनियंत्रित वाढत गेला,

  20. याहवेह असे म्हणतात, “मोआबच्या तीन नव्हे तर चार अपराधांसाठी शासन करण्यापासून मी अनुताप करणार नाही. कारण त्याने एदोम राजाची हाडे जाळून त्याची राख केली आहे.

  21. यासाठी की त्यांनी एदोमच्या अवशेषांवर व माझे नाव धारण करणार्‍या सर्व राष्ट्रांचा ताबा घ्यावा,” ही कार्ये करणारे याहवेह ही घोषणा करतात.

  22. ओबद्याहचा दृष्टान्त हा. एदोमाबद्दल सार्वभौम याहवेह असे म्हणतात; आम्ही याहवेहकडून हा संदेश ऐकला: राष्ट्रांना सांगण्यासाठी एक दूत पाठविण्यात आला होता, “उठा, आपण तिच्याविरुद्ध युद्ध करण्यास जाऊ.”

  23. परंतु एसावला लुटण्यात येईल, आणि त्याचा गुप्त खजिना हस्तगत केला जाईल!

  24. याहवेह असे जाहीर करतात, “त्या दिवशी, मी एदोमच्या ज्ञानी पुरुषांचा, एसावच्या डोंगरावर जे समजूतदार आहेत, त्यांचा नाश करणार नाही काय?

  25. तेमान, तुझे योद्धे घाबरून जातील, आणि एसावाच्या डोंगरांमध्ये असलेला प्रत्येकजण कापला जाईल.