मुख्य मजकुरावर जा

Esau

159 वचने · 11 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Edom

Esau चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आपली सेना हरविली जात आहे हे मोआबाच्या राजाने पाहिले, तेव्हा त्याने अखेरचा प्रयत्न म्हणून आपल्या सातशे धनुर्धाऱ्यांसह शत्रूंची फळी फोडून एदोमाच्या राजाकडे निसटून जाण्याचा प्रयत्न केला; पण त्याचा हा प्रयत्न निष्फळ ठरला.

  2. यहोरामाच्या काळात, एदोमाने यहूदीयाविरुद्ध बंड पुकारले आणि त्यांनी स्वतःसाठी एक राजा निवडला.

  3. तेव्हापासून आजपर्यंत एदोम यहूदीयाहविरुद्ध बंड करीत आहे. त्याचवेळेस लिब्नाहनेही बंड केले.

  4. त्याने क्षार खोर्‍यात दहा हजार एदोमी लोकांना ठार केले. त्याने सेला नगरावर हल्ला करून ते जिंकले व त्याचे नाव योकथएल असे ठेवले, आजही ते याच नावाने ओळखले जाते.

  5. खचितच तू एदोमाचा पराभव केला आहेस आणि त्यामुळे तू उन्मत्त झाला आहेस. त्याचे गौरव करीत तू घरीच राहा! संकटांला आमंत्रण देऊन स्वतःचा आणि यहूदीयाचा नाश का करावा?”

  6. अब्राहामास इसहाक झाला. इसहाकाचे पुत्र: एसाव व इस्राएल.

  7. एसावाचे पुत्र: एलीफाज, रऊएल, यऊश, यालाम व कोरह.

  8. इस्राएली लोकांवर कोणत्याही राजाने राज्य करण्यापूर्वी एदोम देशावर ज्या राजांनी राज्य केले ते हे: बौराचा पुत्र बेला; त्याच्या शहराला दिन्हाबाह हे नाव दिले होते.

  9. हदादही मरण पावला. एदोमाचे मूळ पुरुष: तिम्ना, आल्वा, यतेथ,

  10. मग्दीएल व ईराम.

  11. दावीद राजाने या वस्तू, या सर्व राष्ट्रांतून लुटून आणलेल्या चांदी सोन्याबरोबर याहवेहला समर्पित केल्या, दावीदाने ताब्यात घेतलेली राष्ट्रे ही: एदोम आणि मोआब, अम्मोनी, पलिष्टी आणि अमालेकी.

  12. त्याने एदोमात ठाणे बसविले, आणि सर्व एदोमी लोक दावीदाच्या अधीन झाले. दावीद जिथेही गेला तिथे याहवेहने त्याला विजय दिला.

  13. नंतर शलोमोन एदोम या बंदरावर असलेल्या एजिओन-गेबेर आणि एलोथ येथे गेला.

  14. परंतु अमस्याहने ऐकले नाही, कारण परमेश्वराने तसेच केले की, ते त्याला यहोआशच्या हाती सोपवून देणार होते, कारण त्यांनी एदोमाच्या दैवतांचा सल्ला घेतला होता.

  15. संगीत दिग्दर्शकासाठी. “शूशन एदूथ” कराराची कुमुदिनीच्या चालीवर आधारित. दावीदाचे मिक्ताम गाण्याची रचना. हे शिकविण्यासाठी लिहिले गेले आहे. दावीद अराम-नहराईम आणि अराम-झोबाह देशांशी युद्ध करीत असतानाच्या परिस्थितीचा हा उल्लेख आहे. त्याचवेळी सेनापती योआब, क्षार खोर्‍यात परतला, त्याने बारा हजार एदोमाच्या सैनिकांचा नाश केला. हे परमेश्वरा, तुम्ही आमचा त्याग केला, आम्हाला फोडून टाकले आहे; तुम्ही आमच्यावर कोपला आहात—आता आम्हाला पूर्वस्थितीवर आणा!

  16. मोआब माझे हात धुण्याचे गंगाळ आहे, आणि एदोमावर मी माझी पादत्राणे फेकेन; पलेशेथावर मी विजयाचा जयघोष करेन.”

  17. मला तटबंदीच्या नगरात कोण आणेल? मला एदोम प्रांतात कोण नेईल?

  18. एदोमी तथा इश्माएली, मोआबी आणि हगरी लोकांचे डेरे,

  19. मोआब माझे हात धुण्याचे पात्र, आणि एदोमावर मी माझी पादत्राणे फेकेन; पलेशेथावर मी विजयाचा जयघोष करेन.”

  20. मला तटबंदीच्या नगरात कोण आणेल? मला एदोम प्रांतात कोण नेईल?

  21. हे याहवेह, माझ्या देवा, यरुशलेमचा पाडाव झाला त्या दिवशी एदोमाच्या वंशजांनी काय केले याचे स्मरण करा. ते आरोळ्या मारत होते, “तिला जमीनदोस्त करा, तिचा पाया देखील ढासळून टाका.”

  22. ते पश्चिमेला पलिष्ट्यांच्या उतारावर झेपावतील; एकत्र मिळून ते पूर्व दिशेकडील लोकांना लुटतील. एदोम आणि मोआब या देशांना ते जिंकून घेतील, आणि अम्मोनी लोक त्यांच्या अधीन होतील.

  23. एदोमाहून व बस्रा शहराहून, किरमिजी रंगाने रंगविलेली वस्त्रे घालून, वैभवी वस्त्रे परिधान करून त्यांच्या महान सामर्थ्याने वेगाने पावले पुढे टाकत येणारे हे कोण आहेत? “विजयाची घोषणा करीत, तारण करण्यास समर्थ असलेला, हा मी आहे.”

  24. म्हणजे इजिप्ती, एदोमी, अम्मोनी, मोआबी, अरबी, आणि होय, तुम्ही यहूदीयातील लोकांना आणि ते सर्व जे वाळवंटातील दूरच्या प्रदेशात राहतात. या सर्व राष्ट्रांची सुंता झाली नाही, परंतु इस्राएलच्या हट्टी अंतःकरणाची सुंता झालेली नाही.”

  25. एदोम, मोआब व अम्मोन;